जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / खराब झालेलं पाकिट फेकून देत असताल तर थांबा! तुम्हाला माहिती हवी ही गोष्ट

खराब झालेलं पाकिट फेकून देत असताल तर थांबा! तुम्हाला माहिती हवी ही गोष्ट

खराब झालेलं पाकिट फेकून देत असताल तर थांबा! तुम्हाला माहिती हवी ही गोष्ट

आपण कोणतीही नवीन वस्तू घेतो जुनी गोष्ट कोणाला तरी देतो किंवा फेकून देतो. पण असे करणे काही वस्तूंच्या बाबतीत योग्य नसते. त्यातील एक वस्तू म्हणजे आपले पाकीट आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 24 जुलै : ज्योतिष शास्त्रात अनेक गोष्टींच फायदे आणि तोटे सांगितले आहे. यातील अशा अनेक गोष्टींबद्दल अनेक जणांना माहिती नसते. परंतु ते जाणून घेणे खूप आवश्यक आहे. कारण त्याचा थेट आपल्या जीवनावर परिणाम होत असतो. ज्योतिष शास्त्र सांगते की कोणतेही काम करण्यापूर्वी त्याचे फायदे आणि तोटे जाणून घेतले पाहिजेत. आपण कोणतीही नवीन वस्तू घेतो जुनी गोष्ट कोणाला तरी देतो किंवा फेकून देतो. पण असे करणे काही वस्तूंच्या बाबतीत योग्य नसते. त्यातील एक वस्तू म्हणजे आपले पाकीट आहे. नवे पाकिट घेतल्यानंतर जुने पाकिट किंवा पर्सच्या फेकून द्यावी की नाही ते आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्याला एखाद्या गोष्टीला आपल्यासाठी भाग्यशाली मानतात आणि दीर्घकाळ ती वस्तू आपल्याजवळ ठेवतात. परंतु ती वस्तू जेव्हा पूर्णपणे निकामी किंवा खराब होते तिचे काय करायचे असा प्रश्न पडतो. असंच पाकिटाच्या बाबतीत ही घडंत अनेकांना आपल्या खिशातील पाकिट खूप लकी आहे असे वाटते. त्यामुळे ते खराब झाल्यानंतरही अनेक जणांना ते फेकून द्यावे वाटत नाही. परंतु त्याचे काय करणे योग्य ठरेल हे आज आपण जाणून घेणार आहोत.

पंचमुखी रुद्राक्ष धारण केल्यानं लाभते सुख-समृद्धी, मनशांतीसह या गोष्टींची येईल अनुभूती

जुन्या पाकिटाचे काय करावे? जुन्या पाकिटाविषयी ज्योतिष शास्त्र काय सांगते हे आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत. पर्स बदलताना तुमच्या जुन्या पर्समधील सर्व जुन्या वस्तू आणि पैसे नवीन पर्समध्ये ठेवा. त्यानंतर एक रुपयाचे नाणे लाल कपड्यात बांधून जुन्या पर्समध्ये ठेवा. झी न्यूज हिंदीच्या रिपोर्टनुसार, असे केल्याने तुमच्या जुन्या पर्समधील ऊर्जा अबाधित राहील आणि ती तुमच्यासाठी कायम लाभदायक ठरेल.

News18लोकमत
News18लोकमत

तुमचे पर्स तुमच्यासाठी लकी असेल तर ते फेकून देण्याची चूक कधीही करू नये. तसेच ते कधीही रिकामे ठेवू नये. नवीन पर्स किंवा पाकिट घेतल्यानंतर जुन्या पर्समध्ये तांदळाचे दाणे ठेवा आणि त्यातील दोन दाणे नवीन पर्समध्ये ठेवा. असे केल्याने तुमच्या जुन्या पर्समधील सकारात्मक ऊर्जा नवीन पर्समध्ये प्रवेश करेल. याशिवाय तुम्हाला जुनी पर्स फेकून द्यायचे नसेल तर ते व्यवस्थित ठेवा. लाल कपड्यात पाकिटासोबत थोडे पैसे आणि तांदळ बांधून ते तिजोरीत ठेवा.

Astro Tips: भाग्य उजळेल! सुपारीचे हे सोपे उपाय करून पहा, नोकरी-धंद्यात होईल प्रगती

पर्स वापरताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की तुमची लकी पर्स थोडी जरी फाटली किंवा खराब झाली तर ती पूर्णपणे दुरुस्त केल्यानंतरच वापरा. फाटलेली पर्स तुमचा राहु कमकुवत करेल आणि तुमचे आर्थिक नुकसानही होऊ शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात