मराठी बातम्या /बातम्या /religion /

जोडीदारावर भरभरून प्रेम करतात या महिला; ही जन्मतारीख असेल तर तिच्याशी बिनधास्त लग्न करा

जोडीदारावर भरभरून प्रेम करतात या महिला; ही जन्मतारीख असेल तर तिच्याशी बिनधास्त लग्न करा

अंकशास्त्र.

अंकशास्त्र.

जन्मतारखेच्या आकड्यांवरूनच तुमच्या जोडीदाराचा स्वभाव तुम्हाला ओळखता येईल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Prachi Dhole

मुंबई, 23 नोव्हेंबर : सध्या लग्नसराईचे दिवस चालू आहेत. म्हणूनच आम्ही वरपक्षासाठी आनंदाची बातमी घेऊन आलोय. जर तुमच्या ही गर्लफ्रेंडचा, होणाऱ्या बायकोचा, झालेल्या बायकोचा नंबर हा 2 असेल तर तुम्हीही खुश व्हा कारण नंबर 2 च्या महिला आपल्या जोडीदारवर भरभरून प्रेम करतात.

आता 2 नंबर म्हणजे काय तर ही तुमच्या जन्म दिवसाची बेरीज. ज्याला अंकशास्त्रात मूल्यांक म्हणतात. समजा जातकाचा जन्मदिनांक  हा 11 मे 1991 आहे तर 11 या अंकाची एक अंकी बेरीज म्हणजे या जातकाचा मूल्यांक होय.

11= 1+1 =2=मूल्यांक.

मूल्यांक 2 च्या व्यक्ती

तुमचा जन्म हा कोणत्याही  महिन्याच्या 2, 11, 20, 29  या तारखेला झालेला असेल तर त्या व्यक्तीचा मूल्यांक 2  आहे.

2  मूल्यांकाच्या लोकांची गुणवैशिष्टये

या जातकाना चंद्रापासून मिळणारी ऊर्जा जास्त असते. त्यांच्यात हळवेपणा जास्त प्रमाणात जाणवतो. त्यामुळे हे  जातक जास्त भावुक असतात. दुसऱ्यांच्या मदतीला सतत धावणारे असतात. खूप  प्रेमळ, आध्यात्मिक, शांतिप्रिय, विनम्र असतात, दुसऱ्यांचा जास्त विचार करणारे असतात. दुसऱ्याना  हसवणारे परंतु स्वतः आतून खूपदा दु:खी असणारे असतात. या व्यक्ती खूप संवेदनशील असतात.

हे वाचा - Numerology : आपणच होऊयात आपले ज्योतिषी, करावी लागेल या आकड्यांची बेरीज!

त्यांना कलेची आवड असते. छान कपडे घालायला आवडतात. खूप लाघवी ,मधुर भाषिक असतात.  त्या दिसायलाही सुंदर असतात. स्वत:च्या  व्यक्तिमत्वाने समोरच्याला आकर्षित करतात. 2 मूल्यांक महिलांचा असेल तर त्या आपल्या जोडीदारावर खूप प्रेम  करतात.

2 मूल्यांक असणाऱ्या जातकावर लोक डोळे झाकून विश्वास करतात , पण त्यांच्या याच स्वभावामुळे त्यांचा बरेचदा विश्वासघात होतो. लाजाळू असल्याने काही  कामात प्रकर्षाने पुढाकार घेत नाही. सुस्त स्वभावाचे असतात. यांनी केलेल्या कामाची फळे दुसरेच कोणीतरी घेतं.  भविष्यात घडणाऱ्या गोष्टींची  त्यांना पूर्व कल्पना असते

2 मूल्यांकाचा

ग्रह - चंद्र 

शुभ  अंक -  1,5,3,2

अशुभ  अंक - 8,4,9

शुभ वार - रविवार ,सोमवार,शुक्रवार

हे वाचा - Numerology : चमत्कारिक आहे 'हा' Mobile number; तुमचा असेल तर आयुष्यातील अनेक समस्या सुटल्याच समजा

शुभ रंग -  लाल ,सफेद ,हिरवा ,पिवळा ,क्रीम

अशुभ रंग - काळा

लाभदायी व्यवसाय - नाटक ,सामाजिक कार्य ,डेअरी ,संगीत

लाभकारी रत्ना - मोती .

उपासना –  चंद्राची उपासना .

 मूल्यांक 2 चे  प्रसिद्ध व्यक्ती -   अमिताभ बच्चन ,शाहरुख खान , थॉमस एडिसन .

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Numerology, Religion