जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Vat Purnima 2023: वर्ध्याची खरी सावित्री! संसार वाचविण्यासाठी पतीला दिली किडनी, Video

Vat Purnima 2023: वर्ध्याची खरी सावित्री! संसार वाचविण्यासाठी पतीला दिली किडनी, Video

Vat Purnima 2023: वर्ध्याची खरी सावित्री! संसार वाचविण्यासाठी पतीला दिली किडनी, Video

Vat Purnima 2023: वर्ध्याची खरी सावित्री! संसार वाचविण्यासाठी पतीला दिली किडनी, Video

Vat Purnima 2023: पती सत्यवानाचा जीव वाचवणाऱ्या सावित्रीची कथा सर्वांना माहिती आहे. वर्ध्यात आधुनिक सावित्री असून पतीचा जीव वाचवण्यासाठी स्वत:ची किडनी दिली आहे.

  • -MIN READ Wardha,Maharashtra
  • Last Updated :

अमिता शिंदे, प्रतिनिधी वर्धा, 31 मे: वटपौर्णिमा हा सर्व महिलांचा सण, सर्व सुवासिनी महिला या दिवशी वडाच्या झाडाचे पूजन करतात. व्रत करतात आणि आपल्या पतीला वडाप्रमाणे दीर्घायुष्य लाभण्यासाठी कामना करतात. मात्र वर्ध्याच्या एका आधुनिक सावित्रीने आपल्या पतीसाठी केलेलं कार्य किंवा दिलेले दान हे पतीसाठी जीवनदानच ठरलं आहे. जयश्री वाकडे यांनी त्यांच्या संसाराला वाचवण्यासाठी केलेला त्याग सत्यवानाच्या सावित्री पेक्षा कमी नाही. त्यांनी स्वत:ची किडनी देऊन पतीचा जीव वाचवला आहे. नेमकं काय घडलं ? 1986 मध्ये जयश्री आणि दिलीप वाकडे यांचं हिंदू रीतीरिवाजाप्रमाने लग्न झालं. संसार अगदी सुखाचा सुरू होता. मात्र 2003 मध्ये एक दुर्दैवी वळण आलं आणि त्यातच वाकडे दाम्पत्यांमधील सत्यवानाच्या सावित्रीचा परिचय झाला. दिलीप हे न्यायालयात स्टेनो म्हणून कार्यरत होते. दरम्यान 2003 मध्ये दिलीप यांचा एक रोड अपघात झाला. अपघातामुळे त्यांच्या दोन्हीही किडनी निकामी झाल्या आणि पूर्ण कुटुंब हादरलं. मात्र जयश्री यांनी आपला संसार वाचविण्यासाठी धाडसी निर्णय घेतला आणि आपली किडनी दान केली.

News18लोकमत
News18लोकमत

ब्लड ग्रुप जुळल्याने वाचला संसार नाईलाजाने 2007 मध्ये दिलीप यांचे पुणे येथे ऑपरेशन झाले. जयश्री व दिलीप यांचे ब्लड ग्रुप सारखेच असल्याने जयश्री यांनी आपला संसार वाचवण्यासाठी पतीला किडनी देऊन धीर देण्याचं ठरवलं. त्यामुळेच त्यांचा संसारवेल अजूनही फुलेलेला असून दोघेही घरकामात एकमेकांना मदत करतात. वट सावित्रीच्या दिवशी वडाच्या झाडाप्रमाणे पतीला दीर्घायुष्य लाभण्याची प्रार्थना केली जाते. मात्र जयश्री यांनी पतीच्या दीर्घायुष्यसाठी स्वतःच्या जिवाचीही पर्वा केली नाही. बायकोसाठी 60 वर्षांच्या तरुण आजोबांनी एव्हरेस्ट केला सर, डोळ्यात पाणी आणणारी कहाणी, Video योगाभ्यास करून तब्येत स्थिर जयश्री आणि दिलीप यांनी त्यांच्या आयुष्यात आलेल्या या वळणानंतर नित्य योगाभ्यास केला. योग प्राणायमाचे फायदे अनुभवल्यानंतर ते इतरांनाही मार्गदर्शन करतात. योगामुळेच आज दोघेही ठणठणीत आहेत. जयश्री यांनी पती दिलीप यांना कठीण काळात दिलेली साथ त्यांच्या प्रेमाची पारदर्शक ओळख करून देणारा काळ होता. त्यामुळे प्रतिक्रिया व्यक्त करतानाही त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहतात. प्रत्येक सत्यवान आणि सावित्रीने कठीण काळात एकमेकांना धीर देऊन अखंड सोबत करण्याचा निश्चय वटसावित्री सणाच्या पावन पर्वावर करावा, असा आदर्श वाकडे दाम्पत्यानं घालून दिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात