जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / Vehicle Color: वाहन तुमच्यासाठी लकी ठरेल; राशीनुसार रंग निवडल्यास अपघातही टळू शकतो

Vehicle Color: वाहन तुमच्यासाठी लकी ठरेल; राशीनुसार रंग निवडल्यास अपघातही टळू शकतो

राशीनुसार कोणत्या रंगाची कार घ्यावी

राशीनुसार कोणत्या रंगाची कार घ्यावी

vehicle Color according to zodiac sign: ज्योतिषशास्त्रानुसार असे मानले जाते की, प्रत्येक ग्रहाचा स्वतःचा रंग असतो. जर एखाद्या व्यक्तीने त्या ग्रहाच्या रंगानुसार वाहन खरेदी केले तर असे केल्याने व्यक्ती आणि खरेदी केलेल्या वाहनापासून अपघात, आपत्ती दूर राहते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 13 जुलै : तुम्ही कुटुंबासाठी चारचाकी गाडी घेण्याचा विचार करत असाल आणि ज्योतिषशास्त्रावर विश्वास असेल तर, ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. राशीनुसार सामान्य जीवनात ज्या प्रकारे रंगांचे महत्त्व असते, त्याचप्रमाणे रंगांचे महत्त्व वाहन खरेदीलाही लागू होते. ज्योतिषशास्त्रानुसार असे मानले जाते की, प्रत्येक ग्रहाचा स्वतःचा रंग असतो. जर एखाद्या व्यक्तीने त्या ग्रहाच्या रंगानुसार वाहन खरेदी केले तर असे केल्याने व्यक्ती आणि खरेदी केलेल्या वाहनापासून अपघात, आपत्ती दूर राहते. करौली, राजस्थानचे ज्योतिषी अनिल शर्मा सांगतात की, जर एखाद्या व्यक्तीने आपल्या राशीवर अधिराज्य करणाऱ्या ग्रहाच्या रंगाचे वाहन खरेदी केले तर त्याला शुभ फळ मिळते, त्याचा प्रवास सुखकर राहतो आणि अपघाताची शक्यता कमी असते. राशीच्या रंगानुसार खरेदी केलेल्या वाहनातून सतत दुरुस्त्याही निघत नाहीत, असे मानले जाते. एकंदरीत ते वाहन आपल्यासाठी लकी ठरते.

News18लोकमत
News18लोकमत

ज्योतिषी अनिल शर्मा यांच्या मते, प्रत्येक ग्रहाच्या रंगात एक विशेष ऊर्जा असते. ज्याचा परिणाम व्यक्तीवर होतो आणि त्याच्या आयुष्यात रंग भरतो. ते सांगतात की, हे जग ग्रहांच्या नियंत्रणाखाली आहे. म्हणूनच ग्रहांच्या अनुषंगाने प्रिय वस्तू खरेदी कराव्यात जेणेकरुन येणाऱ्या काळात त्यांच्या वापराचे शुभ परिणाम मिळू शकतील. चला जाणून घेऊया वाहन खरेदी करताना कोणत्या राशीच्या लोकांसाठी कोणता रंग शुभ राहील. पंचक असताना मृत्यू झाल्यास 5 जणांचा होतो मृत्यू! का ठरतो अशुभ काळ मेष - या राशीच्या लोकांनी नेहमी लाल रंगाची वाहने खरेदी करावी, वापरावीत. वृषभ - या राशीच्या लोकांनी वाहन खरेदी करताना नेहमी चमकदार पांढऱ्या रंगाचे वाहन घ्यावे. मिथुन - या राशीच्या लोकांनी नेहमी हिरव्या रंगाची वाहने खरेदी करावी. किंवा वाहनावर कुठेतरी हिरवा रंग असावा. कर्क - या राशीच्या लोकांनी दुधाळ रंगाचे वाहन खरेदी करावे. सिंह - या राशीच्या लोकांनी वाहन खरेदी करताना नेहमी लाल किंवा केशरी रंगाचे वाहन घ्यावे. Pitradosh: घरात पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी ही दिशा योग्य; नाही होणार पितृदोषाचा त्रास कन्या - या राशीच्या लोकांनी हिरव्या रंगाचे वाहन खरेदी करावे. तूळ - या राशीच्या लोकांनी चमकदार पांढर्‍या रंगाचे वाहन खरेदी करावे. वृश्चिक - या राशीच्या लोकांनी लाल रंगाचे वाहन खरेदी करावे. धनु - या राशीच्या लोकांनी पिवळे वाहन खरेदी करावे. मकर - या राशीच्या लोकांनी निळ्या किंवा काळ्या रंगाचे वाहन खरेदी करावे कुंभ - या राशीच्या लोकांनी देखील मकर राशीसारखे निळे किंवा काळे वाहन घ्यावे. मीन - या राशीच्या लोकांनी निळ्या रंगाचे वाहन खरेदी करावे. ज्योतिषी अनिल शर्मा सांगतात की, वाहन खरेदी करताना राशीनुसार वाहनाचा रंग तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही पांढऱ्या रंगाचे वाहन घेऊ शकता. कारण पांढऱ्या रंगाचे वाहन सर्व राशीच्या लोकांसाठी शुभ असते. श्रावण सुरू होताच राशीनुसार करा या गोष्टी; शंभू-महादेव अडचणींमध्ये दाखवतील मार्ग (सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात