मुंबई, 06 जून : हिंदू धर्मात पितृपक्षाला खूप महत्त्व आहे. असे मानले जाते की, पितृपक्षात आपले पूर्वज पृथ्वीतलावर येतात आणि 15 दिवस राहतात. म्हणूनच या काळात पिंडदान, तर्पण आणि श्राद्ध-विधी करणे फार महत्त्वाचे मानले जाते. पण, अनेकांना कदाचित माहीत नसेल की, घराच्या दिशा देखील पूर्वजांना समर्पित असतात. यासाठी काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते. या गोष्टींची काळजी न घेतल्यास घरामध्ये पितृदोष होऊ शकतो. पितृदोष असेल तर आजारपण, आर्थिक चणचण यांसारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात. चला जाणून घेऊया ज्योतिषी आणि वास्तुतज्ज्ञ पंडित ऋषिकांत मिश्रा यांच्याकडून, पितृदोष टाळण्याचे उपाय आणि घरात कोणते नियम पाळले पाहिजेत. पूर्वजांचा फोटो या दिशेला असावे - घरामध्ये दिशांना विशेष महत्त्व असते. वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशा अतिशय शुभ मानली जाते. ही दिशा यमाची असल्याचे मानले जाते. यामुळे या दिशेला पूर्वजांचे फोटो लावणे योग्य आहे. म्हणजे, फोटो लावताना हे लक्षात ठेवा की, पितरांचे तोंड दक्षिण दिशेला असावे, तर फोटो उत्तर दिशेला भिंतीवर लावावा.
चुकूनही या ठिकाणी नको - घराच्या बेडरूममध्ये किंवा ड्रॉईंग रूममध्ये पूर्वजांचे फोटो लावणे चुकीचे मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार या ठिकाणी फोटो लावल्याने घरातील लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. याशिवाय कुटुंबातील लोकांमध्ये विविध आजारांचा धोका वाढतो. किती फोटो घरात लावावे - वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये पितरांचे फोटो लावताना काही गोष्टींची सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. घरामध्ये पूर्वजांचे एकापेक्षा जास्त फोटो लावण्याची आवश्यकता नाही. कारण एकापेक्षा जास्त फोटो ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येण्याचा धोका वाढतो, असे सांगितले जाते. झाडुला लक्ष्मी का मानतात? वास्तुनुसार घरातील झाडूविषयी या गोष्टी महत्त्वाच्या पूर्वजांचा मिळेल आशीर्वाद - 15 दिवस चालणाऱ्या पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे. याशिवाय पूर्वजांचे वेळोवेळी त्यांचे स्मरण करणेही योग्य मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार पितरांचे श्राद्ध केल्याने ते सुखी होतात. त्यामुळे त्यांचे आशीर्वाद मिळतात आणि कुटुंबातील लोकांचे जीवन आनंदी राहते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. जूनमध्ये या 5 राशींवर बुध मेहरबान! संपत्ती वाढेल, नोकरी-व्यवसायात लाभाचे योग (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)