जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / वृंदावनाचा रक्षक! जाणून घ्या 'या' मंदिराचा इतिहास, चोरही झाले नतमस्तक

वृंदावनाचा रक्षक! जाणून घ्या 'या' मंदिराचा इतिहास, चोरही झाले नतमस्तक

जमीन खोदताच  हनुमानाचं मंदिर आढळलं.

जमीन खोदताच हनुमानाचं मंदिर आढळलं.

जे भाविक वृंदावन दर्शनापूर्वी या मंदिरात दर्शन घेतात. त्यांचे सर्व दुर्गुण, अडचणी हनुमान दूर करतो. म्हणूनच याठिकाणी दररोज लाखो भक्त दर्शनासाठी येतात.

  • -MIN READ Local18 Mathura,Uttar Pradesh
  • Last Updated :

सौरव पाल, प्रतिनिधी मथुरा, 4 जुलै : भगवान श्रीकृष्णामुळे मथुरेच्या भूमीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं. वृंदावनाची कृष्णाशी खास जवळीक आहे. येथील अनेक मंदिरं जगप्रसिद्ध आहेत. कृष्णभेटीसह महादेव, गजानन, मारुती, अशा अनेक देवांच्या दर्शनासाठी दरवर्षी येथे हजारो भक्त येत असतात. येथील हनुमानाचं एक मंदिरही प्रचंड लोकप्रिय आहे. खरंतर या मंदिराला वृंदावनाचा रक्षक म्हटलं जातं. मथुरा मार्गावर वसलेल्या या मंदिराला खास इतिहास लाभलाय. साल 1515 मध्ये श्री चैतन्य महाप्रभू हे पहिल्यांदाच वृंदावनात आले होते. ते या परिसराच्या जणू प्रेमातच पडले. परंतु आता ज्याठिकाणी मारुती मंदिर आहे, त्याठिकाणाहून त्यांचं पाऊल पुढे सरकतच नव्हतं. काही केल्या ते पुढे जाऊ शकत नव्हते. त्यामुळे याठिकाणी काहीतरी अद्भुत शक्ती आहे, असा आभास त्यांना झाला. त्यांनी आपल्या शिष्यांना त्याजागी खोदकाम करण्यास सांगितलं. जमीन खोदताच हनुमानाचं मंदिर आढळलं. तेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांची विधिवत पूजा केली आणि त्यांना याठिकाणी स्थापन केलं.

News18लोकमत
News18लोकमत

विशेष म्हणजे, प्राचीन काळात येथे घनदाट जंगल होतं. त्यामुळे चोरांचा सुळसुळाट असायचा. येणाऱ्या जाणाऱ्यांना ते सराईतपणे लुटायचे आणि आणि चोरीतील काही पैसे हनुमानाच्या चरणी ठेवायचे. त्यामुळेच या मंदिराला ‘लुटेरिया हनुमान’ असं नाव पडलं. यंदाचा श्रावण आहे फार कष्टाचा! ‘या’ राशीच्या व्यक्तींनी घ्यावी काळजी अशी मान्यता आहे की, जे भाविक वृंदावन दर्शनापूर्वी या मंदिरात दर्शन घेतात. त्यांचे सर्व दुर्गुण, अडचणी हनुमान दूर करतो. म्हणूनच याठिकाणी दररोज लाखो भक्त दर्शनासाठी येतात. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात