जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / Shrawan 2023: दोन महिन्यांच्या श्रावणात महादेवाला अर्पण कराव्यात या गोष्टी; सुख-शांतीचे मिळेल वरदान

Shrawan 2023: दोन महिन्यांच्या श्रावणात महादेवाला अर्पण कराव्यात या गोष्टी; सुख-शांतीचे मिळेल वरदान

श्रावणात महादेवाला कोणत्या गोष्टी अर्पण कराव्या

श्रावणात महादेवाला कोणत्या गोष्टी अर्पण कराव्या

Shrawan 2023: श्रावणात शंकराला प्रसन्न करण्यासाठी पूजेच्या वेळी त्यांना प्रिय वस्तू अर्पण केल्यास शुभ फळ प्राप्त होते. त्यामुळे भोलेनाथ प्रसन्न होतात आणि माणसाची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 11 जुलै : श्रावण महिना शंभू-महादेवाला समर्पित मानला जातो. यावर्षी मलमासामुळे श्रावण 2 महिन्यांचा असेल. 18 जुलैपासून अधिक श्रावण महिना सुरू होणार आहे. श्रावणात व्रत-उपवासांना विशेष धार्मिक महत्त्व आहे. या काळात शिवभक्त भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी पूर्ण भक्तिभावाने पूजा करतात. श्रावणात शिवाची पूजा केल्याने लवकर फळ मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. असे मानले जाते की, श्रावणात शंकराला प्रसन्न करण्यासाठी पूजेच्या वेळी त्यांना प्रिय वस्तू अर्पण केल्यास शुभ फळ प्राप्त होते. त्यामुळे भोलेनाथ प्रसन्न होतात आणि माणसाची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. जाणून घेऊया श्रावणात शंकराला प्रसन्न करण्यासाठी कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात.

News18लोकमत
News18लोकमत

शंकराला श्रावणात या वस्तू अर्पण कराव्या - बेलाची पाने - शिवपुराणानुसार, बेलपत्र भगवान शिवाला खूप प्रिय आहे. श्रावण महिन्यात भगवान शंकराला बेलपत्र अर्पण केल्याने माणसाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते. लक्षात ठेवा की, बेलाचं तुटलं-कापलं गेलेलं बेलाचं पान अर्पण करू नये. धतुरा - शिवपुराणानुसार धतुराही भगवान शिवाला अतिशय प्रिय आहे. श्रावण महिन्यात शंकराला धतुरा अर्पण केल्यानं संतानसुख प्राप्त होते, असे मानले जाते. Rashi effect: श्रावण सुरू होण्याच्या आधी या 3 राशींना आर्थिक लाभाचे योग रुईची फुले - भगवान शिवाला रुईची फुले खूप आवडतात. विशेषत: भगवान शंकराच्या पूजेत रुईची फुले अर्पण केली जातात. भगवान शंकराला रुईची फुले अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो असे म्हणतात. बेलाची फुले - शिवपुराणानुसार, श्रावण महिन्यात भगवान शिवाला बेलाचे फूल अर्पण केल्याने सुंदर व कोमल वधू प्राप्त होते. तूप - शिवपुराणानुसार श्रावण महिन्यात भगवान शंकराला तुपाचा अभिषेक केल्याने शारीरिक दुर्बलता दूर होते, अनेक कामांमध्ये यश मिळते असे मानले जाते. चातुर्मासात या नियमांचे करावे पालन; भगवान विष्णूची कुंटुंबावर राहील सदैव कृपा जुहीची फुले - श्रावण महिन्यात भगवान शंकराला जुहीचे फूल अर्पण केल्याने घरात धन आणि धान्याची कमतरता भासत नाही. यासोबतच देवी अन्नपूर्णेचा आशीर्वादही प्राप्त होतो. तीळ - श्रावण महिन्यात भगवान शंकराला तीळ अर्पण केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे. तांदूळ - शिवपुराणानुसार श्रावण महिन्यात भगवान शंकराला तांदूळ अर्पण केल्याने घरात धनाची कमतरता भासत नाही. पण, तुटलेला तांदूळ अर्पण करू नये, हे लक्षात ठेवा. Pitradosh: घरात पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी ही दिशा योग्य; नाही होणार पितृदोषाचा त्रास (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात