दुसर्या राशीत जाण्यापूर्वी सूर्य प्रत्येक राशीत 1 महिना राहतो. कर्क राशीत सूर्य आणि गुरु एकमेकांपासून केंद्रस्थानी असतील. तर बुधाचा सूर्याशी संयोग झाल्यामुळे कर्क राशीतही बुधादित्य राजयोग तयार होईल. सूर्याच्या या संक्रमणामुळे कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होईल, याविषयी ज्योतिषी आणि वास्तू तज्ज्ञ पंडित हितेंद्रकुमार शर्मा यांनी दिलेली माहिती पाहुया.
कन्या - सूर्य आणि बुध यांच्या संयोगामुळे बुधादित्य राजयोग तयार होत आहे. या राजयोगाचा शुभ प्रभाव कन्या राशीवर दिसेल. कन्या राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. जुनी गुंतवणूक केली असेल तर त्यातून नफा मिळेल. संततीकडून चांगली बातमी मिळेल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती संतुलित राहील.
कर्क - कर्क राशीत सूर्य आणि बुध यांच्या संयोगामुळे बुधादित्य राजयोग तयार होत आहे. या राजयोगाच्या प्रभावामुळे कर्क राशीच्या लोकांना लाभ होईल. या काळात कर्क राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल.
कर्क राशीचे लोक भागीदारीत व्यवसाय करत असाल तर तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील. सूर्य संक्रमणाच्या काळात जीवन साथीदाराचीही प्रगती होईल. वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होतील.
मेष - कर्क राशीत तयार होत असलेल्या सूर्य आणि बुधादित्य राजयोगाचे हे संक्रमण मेष राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. मेष राशीच्या लोकांना अधिक सुख-सुविधा मिळतील. व्यवसायाशी संबंधित लोकांना फायदा होईल. या काळात वाहने जंगम आणि स्थावर मालमत्ता किंवा इतर महत्त्वाच्या गोष्टी खरेदी करू शकता. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभही मिळेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळेल.