मुंबई, 05 जुलै : यंदा चातुर्मास 29 जून रोजी देवशयनी एकादशीने सुरू झाला असून देवउठनी एकादशी (प्रबोधिनी एकादशी) म्हणजेच 23 नोव्हेंबर 2023 पर्यंत चालणार आहे. धार्मिक ग्रंथात चातुर्मासाचा महिमा तपशीलवार वर्णन केलेला आहे. या काळात केलेली छोटी-छोटी उपासनाही उत्तम फळ देते, असे मानले जाते. याकाळात केलेलं दान, मंत्र, जप आणि धार्मिक नियमांचे पालन केल्यानं अक्षय फळ मिळतं, असं मानलं जातं. यंदा चातुर्मासातही अधिक मास असल्याने त्याचे माहात्म्य आणखी वाढले आहे. चातुर्मासात प्रत्येक व्यक्तीने काही नियमांचे पालन करण्याचा संकल्प केला पाहिजे, असे शास्त्रात सांगितले आहे. स्कंद पुराण, पद्म पुराण इत्यादींमध्ये चातुर्मासात मानवाने पाळावे, असे अनेक नियम सांगितले आहेत. त्यातील काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. नोकरी, व्यवसाय किंवा इतर कोणत्याही कारणामुळे काही अडचण येत असेल तर किमान एखाद-दुसरा नियम पाळा आणि तुमच्या सोयीनुसार त्याचे पालन करा.
कोणते आहेत धार्मिक नियम - - घराजवळील कोणत्याही मंदिरात दररोज देवाचे दर्शन घ्या. - दररोज हरी नामाचा जप करावा, यासाठी आपल्या वेळेनुसार ध्यान करताना नियम बनवावा. - दररोज भगवद्गीतेचा एक श्लोक किंवा एक अध्याय पठण करण्याचा नियम करा. - दररोज श्रीमद भागवत महापुराण पठण करण्याचा सराव करा. - पवित्र नद्यांमध्ये दररोज स्नान करण्याचा नियम, शक्य नसल्यास अमावस्या, पौर्णिमा आणि एकादशीला स्नान करावे. - मांसाहार आणि तामसिक आहाराचा त्याग. Horoscope: सिंह राशीत मंगळ-शुक्राची यारी! महिनाभर या राशींचे नशीब राहणार जोमात - विष्णुसहस्त्रनामाचा दररोज जप करण्याचा नियम. - दररोज शिव सहस्त्रनामाचा जप करण्याचा नियम. - शिव महापुराण पठणाचे नियम बनवणे. - वड, पिंपळ, बेलपत्र इत्यादी झाडे लावा. - घरात तुळशीचे रोप नसेल तर ते लावावे. - चातुर्मासातील एकादशीचे व्रत करण्याचा नियम. - रोज संध्याकाळी दिवे दान करा - चातुर्मासात कोणत्याही एका तिर्थाचे दर्शन. Pitradosh: घरात पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी ही दिशा योग्य; नाही होणार पितृदोषाचा त्रास (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)