अखंड प्रताप सिंह, प्रतिनिधी कानपूर, 14 जून : उत्तर प्रदेशातील कानपूर हे संपूर्ण देशात आणि जगभरात एक पौराणिक नगर म्हणून ओळखलं जातं. याठिकाणी संस्कृतीशी निगडित अनेक रहस्य दडलेले आहेत. येथे अनेक अशी मंदिरं आहेत ज्यांच्या निर्मितीमागे आपल्या विचारांच्या पलिकडच्या कथा सांगितल्या जातात. त्यापैकीच एक म्हणजे कानपूरचं ‘जगन्नाथ मंदिर’. इंद्रदेव पाऊस पाडत असतो, असं आपण कधीतरी सहज म्हणतो. परंतु जगन्नाथांचं हे मंदिर चक्क पावसाचा अचूक अंदाज देतं, अशी मान्यता आहे. म्हणूनच या मंदिराला ‘मॉन्सून मंदिर’ असंही म्हणतात. दगडांनी बांधलेलं हे मंदिर अतिशय प्राचीन आहे असं तिथले पुजारी सांगतात. कानपूर शहरापासून जवळपास 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या घाटमपुरातील बेहटा बुजुर्ग गावात असलेल्या या मंदिराचं बांधकाम दगडांचं आहे. हे दगड जणू चमत्कारिक मानले जातात. कारण पावसाळा सुरू होण्यापूर्वीच त्यांच्यावर पाण्याचे थेंब पडतात. या थेंबांवरून कळतं की यंदाचा पाऊस कसा असेल.
दगडावर पडणारे पाण्याचे थेंब लहान असतील तर त्याचा अर्थ असा की, यंदा पाऊस कमी होईल. तर, याउलट जर हे थेंब मोठे आणि जड असतील तर ते चांगला मॉन्सून होणार असं दर्शवतात. मंदिराचे पुजारी के.पी शुक्ला यांनी सांगितलं की, हे मंदिर भारतातील प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. याच्या दगडांवर होणाऱ्या पाण्याच्या वर्षावावर संशोधन करण्यासाठी देश-विदेशातील संशोधक आले होते. मात्र त्यांना याबाबत काही माहिती मिळू शकली नाही. ‘तू दुर्गंधी पसरवणारं फुटकं ड्रेनेज…’ किरण मानेंना अश्लील शब्दात ट्रोल करणारा सापडला, नाव वाचून बसेल धक्का ‘थेंबाचा आकार सांगतो की पाऊस कसा पडेल. यंदाही पावसाळ्याच्या आगमनाचे संकेत दिले असून यावेळी पाण्याचे थेंब लहान होते. म्हणजेच यंदा पाऊस कमी पडणार असे म्हणता येईल’, असं के.पी शुक्ला यांनी सांगितलं. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)