जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'तू दुर्गंधी पसरवणारं फुटकं ड्रेनेज...' किरण मानेंना अश्लील शब्दात ट्रोल करणारा सापडला, नाव वाचून बसेल धक्का

'तू दुर्गंधी पसरवणारं फुटकं ड्रेनेज...' किरण मानेंना अश्लील शब्दात ट्रोल करणारा सापडला, नाव वाचून बसेल धक्का

किरण माने त्यांच्या अभिनया व्यतिरिक्त त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असतात.

किरण माने त्यांच्या अभिनया व्यतिरिक्त त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असतात.

अभिनेते किरण माने त्यांच्या अभिनया व्यतिरिक्त त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असतात. अनेकदा किरण माने यांना याच सोशल मीडिया पोस्टमुळे ट्रोल केलं जातं. आता या ट्रोलिंगमागचा खरा चेहरा उघडकीस आला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 14 जून- अभिनेते किरण माने त्यांच्या अभिनया व्यतिरिक्त त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असतात. अनेकदा किरण माने यांना याच सोशल मीडिया पोस्टमुळे ट्रोल केलं जातं. बिग बॉस मराठीच्या घरात असताना देखील किरण माने यांना ट्रोल करण्यात आलं होतं. पण किरण माने नेहमीचं आपल्या कामानं प्रेक्षकांचं मन जिंकत आले आहेत. पण आलीकडं सेलेब्सना ट्रोल करण्याचं प्रमाण वाढलं आहे. अनेक कलाकार या ट्रोलिंगवर बोलतात देखील. हेमांगी कवी असेल प्राजक्ता माळी असेल अशा अनेक कलाकारांना सतत कोणत्या कोणत्या कारणामुळं ट्रोल केलं जातं. किरण माने यांना देखील याचा अनुभव आलाच आहे. मात्र आता त्यांचा ट्रोलर सापडला आहे..किरण माने यांनी याबद्दल नुकताच खुलासा केला आहे. सोशल मीडियावर फेक आयडी बनवून काही लोक कलाकारांना ट्रोल करताना आढळतात. पण यामागे एक चेहरा असतो. किरण माने यांना हा चेहरा सापडाल आहे..म्हणजेच त्यांना ट्रोल करणारा व्यक्ती त्यांना सापडला आहे. त्यासाठी किरण माने यांनी त्याचं नाव उघड करत त्यांची गोड शब्दात समजूत काढली आहे..सध्या किरण माने यांची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. किरण माने यांनी सोशल मीडिया पोस्ट करत म्हटलं आहे की, सागर बर्वे. मलाही तू अतिशय घाण, अश्लील शब्दांत ट्रोल केलं होतंस. एक वर्षाच्या आत सापडलास ! तुझं खरं नांव उघड झालेलं पाहून फारसं आश्चर्य नाही वाटलं. ‘नर्मदाबाई पटवर्धन’ या फेक अकाऊंटमागे कुणीतरी भेकड माणूस असणार याची खात्री होती. पण माझा तुझ्यावर अजिबात राग नाही दोस्ता. उलट दया येते तुझी. तुला लहान भाऊ मानून तुझी समजूत काढावी वाटते. गेले कितीतरी महिने, फेक अकाऊंटमागे लपून तू खूप लोकांच्या आईवडिलांचा अत्यंत बिभत्स, किळसवाण्या शब्दांत उद्धार केलास बर्वे. तुझ्यावर संस्कार करणार्‍या तुझ्या आईवडिलांना मी दोष देणार नाही. तुझ्या बहिणीही सुस्वभावी असणार. काय चूक यांची? काहीजण तुझ्या जातीवर जातील. पण जातीचा काय संबंध रे? भारतात प्रत्येक जातीत भेदाभेद टाळून मानवतेचा संदेश देणारे महामानव जन्मलेत. चूक असलीच तर तुझ्या सडलेल्या, नासलेल्या मेंदूंची आहे बर्वे. मेंदूचा उकिरडा झाल्यानंतर असल्या किळसवाण्या शब्दांची किड पैदा होते. आईवडिलांनी आशेनं तुझं नांव ‘सागर’ ठेवलंय, तू दुर्गंधी पसरवणारं फुटकं ड्रेनेज निघालास की रे.

News18लोकमत
News18लोकमत

अजूनही जागा हो माझ्या मित्रा. सोड हे फडतूस उद्योग. माणूसकी बाळग. आपण माणसं आहोत. मतभेद असतात. असावेत. भांडूया. वाद घालूया. पण आयाबहीणींची, त्यांच्या शरीरांची वर्णनं करून अत्यंत घृणास्पद शब्दांत लक्तरं का काढायची??? याला मी तरी घाबरत नाही हे नीट लक्षात ठेव. आम्ही लढवय्यांचं रक्त अंगात सळसळणारी माणसं आहोत. सहज आठवलं म्हणून सांगतो.. ‘बिगबाॅस सिझन चार’ हा एकाच टास्कमुळं शिखरावर पोचला होता. सगळ्या टास्कचा बाप - सी साॅ टास्क ! माझा विरोधी ग्रुप, हिंस्त्र जनावरांसारखा झुंडीनं माझ्यावर - माझ्या चारीत्र्यावर चिखलफेक, कचराफेक करत होता. पाण्याचा माराही होता. एक प्रकारचं भिषण ट्रोलींगच सुरू होतं. तब्बल तीन तास मी जागचा हललो नव्हतो. संपूर्ण सिझन त्या एका भन्नाट-जबराट टास्कनं गाजवला होता. सांगायचा मुद्दा हा की माझा कुठलाही हितशत्रू, काहीही करून माझं ‘सत्व’ हलवू शकत नाही.

जाहिरात

सोशल मिडीयावर कुत्सीतपणे, अर्वाच्य, अश्लील शब्दांत कमेन्ट करणार्‍या फेक अकाऊंटस्ना घाबरत नाही मी. यांनी शिव्या दिल्या म्हणून आपला ‘रूतबा’ कमी होत नाही. आपल्यावर ते गरळ ओकतात, कारण आपल्या शब्दांना, विचारांना आणि त्या विचारांना मिळालेल्या लोकप्रियतेला ते घाबरलेले असतात. त्यामुळं त्यामुळं असे ट्रोलर्स भुंकायला लागले की खुर्चीत आणखी रेलून ऐटीत, रूबाबात बसायचं…शत्रूवर नजर रोखायची…आणि गालातल्या गालात हसायचं..‘पठाण’मधल्या शाहरूखसारखं.क्यों की हमारी ताकत का अंदाजा हमारे ज़ोर से नहीं, दुश्मन के शोर से पता चलता है !

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात