मुंबई, 24 ऑक्टोबर : सूर्यग्रहण ही एक भौगोलिक घटना आहे, ज्याचे धार्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही महत्त्व आहे. जेव्हाही सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण होते तेव्हा त्याचा प्रभाव राशींवर शुभ आणि अशुभ दोन्ही प्रकारे दिसून येतो. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 ऑक्टोबर 2022 रोजी वर्षातील दुसरे सूर्यग्रहण होणार आहे. तज्ज्ञांच्या मते हे आंशिक सूर्यग्रहण असेल. या ग्रहणाचा शुभ प्रभाव 5 राशींवर दिसेल. देवी लक्ष्मीची या लोकांवर विशेष कृपा असेल. या राशीच्या लोकांचा भाग्योदय होईल. त्यांना आर्थिक कौटुंबिक आणि भावनिक पातळीवर खूप फायदा होणार आहे. भोपाळ येथील ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांच्याकडून जाणून घेऊया की, कोणकोणत्या राशींवर या सूर्यग्रहणाचा चांगला आणि फायदेशीर प्रभाव पडणार आहे.
27 वर्षांनी दिवाळीत असा योगायोग; सूर्यग्रहणात काय करावं, काय टाळावं जाणून घ्यासूर्यग्रहण 2022 वेळ 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 04.28 वाजता सुरू होईल आणि 05.30 वाजता संपेल. ग्रहणाचा सुतक कालावधी 12 तास आधी सुरू होईल.
मेष ज्योतिष शास्त्रानुसार मेष राशीच्या लोकांची आर्थिक बाजू मजबूत असणार आहे. मेष राशीच्या लोकांसाठी यावेळी गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण राहील. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला जीवनात आनंदाच्या संधी मिळतील. खर्च कमी होतील, हा काळ व्यवहारासाठी चांगला मानला जातो. सिंह सिंह राशीचे लोक नवीन घर खरेदी करू शकतात. त्यांच्यावर देवी लक्ष्मीची विशेष कृपा राहील. तसेच वैवाहिक जीवन आनंदी राहील, सिंह राशीच्या लोकांना कोणतेही नवीन काम सुरू करायचे असेल तर त्यांच्यासाठी हा काळ शुभ आहे, परंतु व्यवहार करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. कन्या कन्या राशीच्या लोकांवर माता लक्ष्मीची कृपा राहील, त्यामुळे त्यांची सर्व कामे यशस्वी होतील. कन्या राशीचे लोक घर किंवा वाहन खरेदी करू शकतात. व्यवसायासाठी काळ चांगला आहे, पैसा लाभदायक असेल, परंतु खर्चावर नियंत्रण ठेवा. कन्या राशीचे लोक यावेळी व्यवहार करू शकतात. काळ अनुकूल आहे. तूळ ज्या लोकांची राशी तूळ आहे त्यांच्यासाठी हे सूर्यग्रहण फायदेशीर आहे. तूळ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल. ज्यांना गुंतवणूक करायची असेल त्यांच्यासाठी वेळ चांगली आहे. नवीन वाहन खरेदी करू शकता, देवी लक्ष्मीची कृपा राहील, त्यामुळे उत्पन्नाचे स्रोत वाढतील. दिवा विझणं खरंच अपशकुन आहे का? पूजा करताना या गोष्टींची काळजी घ्या वृश्चिक 25 ऑक्टोबरला होणारे सूर्यग्रहण वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सकारात्मक परिणाम देणार आहे. गुंतवणूक करण्याचा हा सर्वोत्तम काळ आहे. देवी लक्ष्मीची विशेष कृपा राहील, त्यामुळे धनलाभ होईल, मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. बिझनेस क्लाससाठी उत्तम काळ. नवीन वाहन किंवा घर खरेदी करू शकता.