मुंबई, 14 ऑक्टोबर : या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण 25 ऑक्टोबर 2022 रोजी होणार आहे. 27 वर्षांनंतर असा योगायोग घडला आहे की, दिवाळीला सूर्यग्रहण आहे. दिवाळी आश्विन अमावस्येला साजरी केली जाते, यावेळी अमावस्येची तारीख म्हणजेच दिवाळी 24 आणि 25 ऑक्टोबर या दोन दिवशी आहे. श्री कल्लाजी वैदिक विद्यापीठाच्या ज्योतिष विभागाचे प्रमुख डॉ. मृत्युंजय तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आश्विन अमावस्या तिथी 24 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 05.27 वाजल्यापासून सुरू होईल आणि ती 25 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 04.18 पर्यंत राहील. 24 ऑक्टोबरच्या मध्यरात्री 12 तास आधी सूर्यग्रहणाचा सुतक कालावधी सुरू होईल. सूर्यग्रहण 2022 सुतक कालावधी - हे सूर्यग्रहण आंशिक सूर्यग्रहण असून या वर्षातील हे दुसरे सूर्यग्रहण आहे. त्याचा सुतक कालावधी 24 ऑक्टोबरला म्हणजेच दिवाळीच्या रात्री 02.30 मिनिटे असेल, जो दुसऱ्या दिवशी, 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 04.22 पर्यंत राहील. असा योगायोग 27 वर्षांनंतर घडतो - हे सूर्यग्रहण भारतात अंशतः दिसणार आहे. 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 02.29 वाजल्यापासून सुरू होईल आणि 06.32 पर्यंत सुरू राहील. हे सूर्यग्रहण 04 तास 3 मिनिटे चालणार आहे. अशीच परिस्थिती 27 वर्षांपूर्वी 1995 मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर सूर्यग्रहण झाली होती. या लोकांनी सूर्यग्रहण पाहु नये - हे सूर्यग्रहण तूळ राशीत आणि स्वाती नक्षत्रात होत आहे. यामुळे स्वाती नक्षत्रात जन्मलेल्या लोकांनी हे सूर्यग्रहण पाहू नये. आंशिक सूर्यग्रहण फक्त अमावास्येला होते, ज्याला कंकणाकृती सूर्यग्रहण देखील म्हणतात. ज्योतिषशास्त्रानुसार अशा ग्रहणात सूर्य आणि पृथ्वीमधील अंतर जास्त होते, सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर येण्यापूर्वी चंद्र मध्यभागी येतो, त्यामुळे सूर्याचा काही भागच दिसतो.
सुतक काळात काय करू नये - 1. सुतक काळात कोणतेही शुभ कार्य करू नका. 2. सुतक काळात खाणे वर्ज्य आहे. 3. यावेळी दात घासण्यास आणि केसांना कंघी करण्यासही मनाई आहे. 4. सुतक काळात गर्भवती महिलांनी घराबाहेर जाणे टाळावे. सूर्यग्रहण 2022 चा राशींवर परिणाम मेष: स्त्री व्यथा वृषभ : सौख्य मिथुन : चिंता कर्क राशी: दुःख सिंह: श्री. कन्या : क्षति तूळ : घात वृश्चिक : नुकसान धनु : लाभ मकर : आनंद कुंभ: मूल्य नष्ट मीन : मृत्यूसदृश दुःखाचा योग हे वाचा - दिवा विझणं खरंच अपशकुन आहे का? पूजा करताना या गोष्टींची काळजी घ्या
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)