मुंबई, 12 मार्च: 12 मार्चला रंगपंचमी, या दिवशी राधा-कृष्णाने खेळला होता रंगोत्सव, जाणून घ्या, पौराणिक कथा होळीनंतर येणारा रंगपंचमी हा सणही देशात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. असे मानले जाते की रंगपंचमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने राधा राणीसोबत रंग खेळले होते, त्यामुळे रंगपंचमीच्या दिवशी श्रीकृष्णासोबत राधाजीचीही विशेष पूजा केली जाते. यावेळी हा उत्सव 12 मार्च, रविवारी साजरा केला जाणार आहे. मंदिरांमध्ये भजन-कीर्तनाने रंग भरला जातो. ही पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. पूजेनंतर आरतीच्या ताटात पैसे का ठेवतात, जाणून घ्या या परंपरेमागचे कारण या दिवशी श्रीकृष्ण आणि राधा राणीला रंग अर्पण केला जातो. अनेक राज्यांत रंगपंचमीच्या दिवशी मिरवणुका काढल्या जातात, त्यात अबीर-गुलालाची उधळण करतात. यावेळी हा उत्सव 12 मार्च, रविवारी साजरा केला जाणार आहे. रंगपंचमीचे महत्त्व असे मानले जाते की या दिवशी गुलालाचा वापर केल्याने माणसातील पुण्य गुण वाढतात. सोबतच प्रतिशोध किंवा वाईट गुण नष्ट होतात, म्हणून या दिवशी अबीर-गुलालाचे रंग अंगावर उधळले जातात. मित्र आणि नातेवाईकांना गुलालाची उधळण केली जाते. वाईट शक्तींवर विजयाचा दिवस महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशात रंगपंचमीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यानिमित्त घराघरांत रंग खेळण्याबरोबरच विविध प्रकारचे पदार्थ तयार करून देवाला नैवेद्य अर्पण केला जाते. अनेक ठिकाणी रंगपंचमीला गुलालाची उधळण करून मिरवणूक काढली जाते, त्याला ‘गेर’ म्हणतात. शास्त्रानुसार हा सण वाईट शक्तींवर विजय मिळवण्याचा दिवस मानला जातो.
पौराणिक कथा पौराणिक कथेनुसार, होलाष्टकच्या दिवशी, भगवान महादेवाने कामदेवाला आपल्या तपश्चर्येत अडथळा आणल्याने भस्म केले होते. तेव्हा देवलोकातील सर्वजण यामुळे दुःखी झाले, परंतु देवी रती आणि देवतांच्या प्रार्थनेवर भगवान महादेवांनी कामदेवाला पुन्हा जीवन दिले. यानंतर सर्व देवी-देवता प्रसन्न झाले आणि या आनंदात रंगोत्सव साजरा करू लागले. तेव्हापासून पंचमी तिथीला रंगपंचमी उत्सव साजरा केला जाऊ लागला.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)