मराठी बातम्या /बातम्या /religion /श्रीमंत लोकांचा यादीत तुमचा अंक येतो का? तुमच्याही जन्मदिवसाची बेरीज ही आहे का?

श्रीमंत लोकांचा यादीत तुमचा अंक येतो का? तुमच्याही जन्मदिवसाची बेरीज ही आहे का?

मूल्यांक १ ची गुणवैशिष्ट्ये कोणती

मूल्यांक १ ची गुणवैशिष्ट्ये कोणती

मूल्यांक १ ची गुणवैशिष्ट्ये कोणती

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 6 फेब्रुवारी:  जर तुमच्या जन्मदिवसाची बेरीज १ येत असेल म्हणजेच तुमचा जन्म हा कोणत्याही महिन्याच्या १ ,१०,२८,१९ या तारखेला येत असेल तर ही माहिती तुमच्यासाठी लाभ दायक सिद्ध होऊ शकते.

मूल्यांक १ : समजा जातकाचा जन्मदिनांक  १० मे १९९१ आहे तर १० या दिवसाची १ अंकी बेरीज म्हणजे या जातकाचा मूल्यांक होय .

१०= १+०=१= मूल्यांक.

जाऊन घेऊयात १ मूल्यांकाच्या लोकांची गुणवैशिष्टये:

देवी महालक्ष्मी होईल प्रसन्न घरी आणा फक्त 100 रु.ची ही वस्तू

१ या अंकाचा ग्रह सूर्य आहे

ज्या जातकाचा मूल्यांक १ आहे अशा जातकांमध्ये आत्मविश्वासाची कधीच कमतरता नसते. कमालीचा आत्मविश्वास असल्याने ते हरलेला खेळ सुद्धा सहजरित्या जिंकू शकतात. या जातकांमध्ये सूर्या पासून मिळणारी शक्ती जास्त

असल्याने हे जातक सूर्यासारखे समाजात चमकतात. त्यांना जनमाणसांमधून खूप जास्त प्रमाणात मान सन्मान प्राप्त होतो.

मूल्यांक १ ची गुणवैशिष्ट्ये :

हे जातक खूप कष्टाळू असतात, जी कोणती कामे हातात घेतात ती आत्मविश्वासाने पूर्ण करतात. हे लोक उदार असतात, चांगल्या विचारांचे असतात, कोणत्याही कामाची सुरुवात जोरदार उत्साहात करतात परंतु सरते

शेवटी त्यांचा उत्साह मावळताना दिसतो. ही त्यांच्यातील कमकुवत बाजू म्हणावी लागेल. दुसऱ्यांपेक्षा आपण कसे वेगळे काम करता येईल याकडे यांचा जास्त कल असतो. गरजू लोकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असतात. या

जातकला राग पण खूप येतो, हे लोक थोडे अहंकारी स्वभावाचे असतात. दिखावा करण्याच्या सवयीमुळे खर्च वाढवतात. उच्च शिक्षण घेण्याची तयारी असते. त्यासाठी ते परदेशी सुद्धा जातात.

लक्ष्मीप्राप्तीसाठी करा तुळशीच्या पाण्याचा अनोखा उपाय; घराची होते प्रगती

१ मूल्यांकाचा

शुभ अंक - २,३,५,९

अशुभ अंक - ८

शुभ वार - रविवार, सोमवार

शुभ रंग - लाल ,सफेद, हिरवा, पिवळा

अशुभ रंग - निळा

लाभदायी व्यवसाय - राजकारण, it, न्यूज चॅनेल

लाभकारी रत्ना - रुबी, पुखराज.

उपासना – सूर्याची उपासना करणे, सूर्याला जल देणे

मूल्यांक १ चे प्रसिद्ध व्यक्ती - धीरूभाई अंबानी, मुकेश अंबानी, नीता अंबानी, रतन टाटा, लता मंगेशकर, इंदिरा गांधी, ऐश्वर्या राय बच्चन, बिल गेट्स

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Mulank 1, Numerology, Rashibhavishya, Rashichakra, Religion