मराठी बातम्या /बातम्या /religion /लक्ष्मीप्राप्तीसाठी करा तुळशीच्या पाण्याचा अनोखा उपाय; घराची होते प्रगती

लक्ष्मीप्राप्तीसाठी करा तुळशीच्या पाण्याचा अनोखा उपाय; घराची होते प्रगती

ज्या घरामध्ये तुळशीचे रोप असते, तेथे माता लक्ष्मीसोबतच भगवान विष्णूचा आशीर्वाद राहतो.

ज्या घरामध्ये तुळशीचे रोप असते, तेथे माता लक्ष्मीसोबतच भगवान विष्णूचा आशीर्वाद राहतो.

ज्या घरामध्ये तुळशीचे रोप असते, तेथे माता लक्ष्मीसोबतच भगवान विष्णूचा आशीर्वाद राहतो.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 5 फेब्रुवारी :  हिंदू धर्मात तुळशीच्या झाडाला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की, ज्या घरामध्ये तुळशीचे रोप असते, तेथे माता लक्ष्मीसोबतच भगवान विष्णूचा आशीर्वाद राहतो. दुसरीकडे, वास्तुशास्त्रानुसार, तुळशीचे रोप घरामध्ये ठेवल्याने अधिक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्यामुळे व्यक्तीच्या चांगल्या आरोग्यासोबत प्रगतीचाही मार्ग खुला होतो.

यामुळेच दररोज तुळशीच्या रोपाची पूजा करणे शुभ मानले जाते. तुळशीशी संबंधित अनेक उपाय तुम्ही ऐकलेच असतील. यापैकी एक उपाय म्हणजे तुळशीच्या पाण्याचा वापर. जाणून घ्या तुळशीचे पाणी वापरून सुख-समृद्धी कशी मिळवता येईल.

सोमवारी न चुकता शिवलिंगावर अर्पण करा या 5 गोष्टी, तुमच्या सर्व अडचणी होतील दूर

तांब्याच्या किंवा पितळाच्या भांड्यात तुळशीची काही पाने पाण्यात टाकून ठेवा. असे केल्याने पाणी पवित्र आणि शुद्ध होते. यासोबतच माता लक्ष्मीही प्रसन्न होते.

घरभर शिंपडा

वास्तुशास्त्रानुसार तुळशीला रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. यानंतर, सकाळी हे शुद्ध पाणी संपूर्ण घराच्या प्रत्येक कोपऱ्यात, पूजा घर इत्यादीमध्ये शिंपडा, असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल.

बाल गोपाळांचे स्नान करावे

भगवान विष्णूचे रूप असलेल्या श्रीकृष्णालाही तुळशी अत्यंत प्रिय आहे. अशा वेळी तांब्याच्या किंवा पितळाच्या भांड्यात थोडं पाणी टाकून तुळस ठेवा. यानंतर या पाण्याने बालगोपालांना व्यवस्थित स्नान करावे. असे केल्याने बालगोपाल लवकर सुखी होतात.

प्रगतीसाठी

जर तुम्हाला व्यवसाय आणि नोकरीमध्ये उत्तुंग यश मिळवायचे असेल तर तुम्ही तुळशीच्या पाण्याचा वापर करू शकता. यासाठी पाण्यात तुळस टाकून 2-3 दिवस राहू द्या. यानंतर हे पाणी स्वतःवर शिंपडा आणि कारखाना, दुकान, व्यवसाय, कामाच्या ठिकाणी इत्यादी ठिकाणी शिंपडा. असे केल्याने तेथे असलेली नकारात्मक ऊर्जा संपुष्टात येईल.

चांगल्या आरोग्यासाठी

निरोगी राहण्यासाठी तुळशीचे पाणीदेखील वापरले जाऊ शकते. घरातील एखादा सदस्य अधिकतर आजारी असेल तर सकाळ- संध्याकाळ पूजा केल्यानंतर त्याच्यावर तुळशीचे पाणी शिंपडावे. यासोबतच तुळशीचे पाणी उकळून त्या व्यक्तीला द्यावे.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichakra, Religion, Vastu