जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / देवी महालक्ष्मी होईल प्रसन्न घरी आणा फक्त 100 रु.ची ही वस्तू

देवी महालक्ष्मी होईल प्रसन्न घरी आणा फक्त 100 रु.ची ही वस्तू

देवी महालक्ष्मी होईल प्रसन्न घरी आणा फक्त 100 रु.ची ही वस्तू

गोमती चक्रामुळे घरात नांदते सुखसमृद्धी !

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

 मुंबई, 06 फेब्रुवारी : आजकालच्या धकाधकीच्या जीवनात  प्रत्येकालाच सर्वात जास्त निकड ही पैशाची असते. यामुळे प्रत्येकच जण मेहनतीबरोबरच आध्यात्मिक उपायांतूनही श्रीमंतीचा मार्ग शोधत असतो.  श्रीमंत होणे कुणाला नकोय, म्हणूनच आपल्या ऋषीमुनींनी अशाच काही गोष्टींचा अभ्यास करून धनप्राप्तीचे मार्ग सांगितले आहेत. यातील एक उपाय गोमती चक्राचा आहे. कोणत्याही शुभ मुहूर्तावर महालक्ष्मीचे प्रतीक असणारे गोमती चक्र घरी आणून त्याची पूजा केल्यास देवी लक्ष्मीची भक्तावर विशेष कृपा होते.

गोमती चक्र हे गोमती नदीत आढळते. याच्या एका भागावर सुदर्शन चक्राचे चिन्ह असते, म्हणून याला काही ठिकाणी सुदर्शन चक्रदेखील म्हणून ओळखतात. गोमती चक्र घरात ठेवण्याचे अनेक फायदे आहेत. म्हणूनच धनप्राप्तीसाठी गोमती चक्र कसे उपयोगी ठरू शकते हे आपण जाणून घेऊयात.

लक्ष्मीप्राप्तीसाठी करा तुळशीच्या पाण्याचा अनोखा उपाय; घराची होते प्रगती

कोणत्याही दिवशी  तुम्ही 5, 7, 11  किंवा 21 अशा कितीही संख्येत गोमती चक्र घरी आणा.

गोमती चक्र घरात आणून नुसते ठेवले तरी त्यामुळे धनात वाढ होते, अशी मान्यता आहे. तथापि, गोमती चक्राला जर सिद्ध करून आपण देव्हाऱ्यात किंवा आपल्या तिजोरीत ठेवले, तर त्याचे 100  पट जास्त फायदे पाहायला मिळतात.

गोमती चक्र सिद्ध करण्याची विधी

एक वाटी घ्या. ही वाटी कोणत्याही धातूची असली तरी चालेल, वाटीत गोमती चक्र ठेवा. त्यावर पाणी, गंगाजल, गुलाबजल टाकून गोमती चक्र  धुवून घ्या. एका लाल रंगाच्या कपड्यावर ठेवून त्याला हळद-कुंकू, चंदन, अक्षदा वाहून फुले अर्पित करा. धूप अगरबत्ती दाखवा आणि या मंत्राचा 108  वेळा जप करा..

शास्त्रानुसार या 6 दिवशी पती-पत्नीने टाळावेत संबंध, अशी आहेत धार्मिक कारणे

ओम महालक्ष्म्ये नमः।

शास्त्रानुसार, हे सिद्ध केलेले गोमती चक्र घरात ठेवल्यास महालक्ष्मीच्या कृपेची तुम्हाला प्रचिती येते. अडकलेला पैसा मोकळा होतो, घरातून दैन्य, दारिद्र्य निघून जाते. पैशांचे अनेक मार्ग तुमच्या समोर येतात. पैशांची आवक वाढून घरात सुख-समृद्धी येते, अशी मान्यता आहे.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात