पुणे, 4 ऑक्टोबर : नवरात्री मधील नववा दिवस म्हणजे अश्विन शुद्ध नवमी. या दिवशी देवीची सिद्धीदात्री माता या रूपामध्ये पूजा केली जाते. सिद्धी म्हणजे आत्मिक शक्ती आणि दात्री म्हणजे देणारी. आत्मिक शक्ती देणाऱ्या सिद्धीदात्री मातेची पूजा कशी करावी याविषयीची विशेष माहिती पंडित वसंत गाडगीळ यांनी पुढील प्रमाणे सांगितले आहे. सिद्ध-गन्धर्व-यक्षाद्यैर् असुरैर् अमरैर् अपि सेव्यमाना सदा भूयात् सिद्धिदा सिद्धिदायिनी।। नवरात्राती ल शेवटचा नववा दिवस महानवमी. हिलाच खंडेनवमी म्हणजेच शस्त्र-पूजनाचा दिवस म्हणतात. दुर्गामातेची ही नववी शक्ती. सर्व प्रकारच्या 18 सिद्धी उपासकाला मिळवून देणारी म्हणून ही सिद्धिदात्री. ही सिंहवाहिनी अथवा कमलासना या दोन्ही स्वरूपात असते. या देवीच्या चार हातात गदा, चक्र, शंख आणि कमळ असते. जगावर पूर्ण विजय प्राप्त करून देणारी, अमृतत्वाकडे घेऊन जाणारी ही नवमीची दुर्गा देवी सर्व सुखदात्री, मोक्षदायिनी म्हणून सर्वांना प्रिय आहे. या देवीच्या उपासनेने नवव्या माळेने घटस्थापने पासून आश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी असे नऊ दिवस चालू असणाऱ्या नवरात्री महोत्सवाची सांगता होते. परंतु विजया दशमीचा दसरा करूनच हा महोत्सव खऱ्या अर्थाने पूर्ण होतो, असे गाडगीळ यांनी सांगितले. नौकाविहाराच्या आनंदासह घ्या देवीचेही दर्शन, 20 फूट खोल तलावात माता विराजमान कोण आहे सिद्धिदात्री देवी? माता सिद्धिदात्रीच्या कृपेने महादेवाने आठ सिद्धी प्राप्त केल्या होत्या. या सिद्धींमध्ये अनिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, इशित्व आणि वशित्व यांचा समावेश होतो. या मातेमुळे भगवान शिवाला अर्धनारीश्वर हे नाव पडले, कारण शिवाचे अर्धे शरीर सिद्धिदात्रीमुळे देवीचे झाले. हिमालयातील नंदा पर्वत हे त्यांचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. या देवीची पूजा केल्याने आठ सिद्धी आणि नवीन कोष, बुद्धी आणि बुद्धी प्राप्त होते, असे मानले जाते. आई सिद्धिदात्रीचे रूप कमळावर विराजमान असलेली चार हात असलेली माता सिद्धिदात्री लाल साडीत विराजमान आहे. त्यांच्या चार हातात सुदर्शन चक्र, शंख, गदा आणि कमळ आहे. डोक्यावर उंच मुकुट आणि चेहऱ्यावर मंद हास्य ही आई सिद्धिदात्रीची ओळख आहे. रावण समजून देवीच्याच मूर्तीवर मारत असत दगड! पुरातन ठेव्याची 400 वर्षं उपेक्षा सिद्धिदात्रीची पूजा कशी करावी? तुपाचा दिवा लावण्याबरोबरच माँ सिद्धिदात्रीला कमळाचे फूल अर्पण करणे शुभ मानले जाते. याशिवाय जे काही फळ किंवा अन्न आईला अर्पण केले जाते ते लाल कपड्यात गुंडाळा, गरिबांना जेवून घालूनच मग अन्न प्राशन करावे, अशी माहिती गाडगीळ यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.