मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Video : नौकाविहाराच्या आनंदासह घ्या देवीचेही दर्शन, 20 फूट खोल तलावात माता विराजमान

Video : नौकाविहाराच्या आनंदासह घ्या देवीचेही दर्शन, 20 फूट खोल तलावात माता विराजमान

तलावाभोवती विविध रंगांची रोषणाई करून मातेच्या दरबाराला अधिक आकर्षक स्वरूप दिले आहे. आकर्षक रोषणाई आणि नौकाविहाराचा आनंद लुटण्यासाठी भाविक येत आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Wardha, India

वर्धा, 04 ऑक्टोबर :  शारदीय नवरात्र उत्सवास घटस्थापनेपासून प्रारंभ झाला आहे. यंदा नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील तळेगाव तालातुले गावात तलावाच्या मध्यभागी गावातील रहिवाशांनी माँ शेरावलीची स्थापना केली. यासह तलावाभोवती विविध रंगांची रोषणाई करून मातेच्या दरबाराला अधिक आकर्षक स्वरूप दिले आहे. तळ्यात विराजमान झालेल्या मातेची सुंदर सजावट, आकर्षक रोषणाई आणि नौकाविहाराचा आनंद लुटण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येत आहेत.

गेल्या 40 वर्षांपासून तालातुले गावातील 20 फूट खोल तलावात ग्रामस्थांकडून देवीच्या मूर्तीची स्थापना केली जात आहे. प्रत्येक वेळी गावातील रहिवासी देवीसाठी आकर्षक सजावट करीत असतात. यावेळी गावातील तलावातील गेटच्या बांधकामासाठी लाकूड व प्लास्टिक वापरण्यात आले आहे. यासह येथे आकर्षक दिवे वापरण्यात आले आहेत. भाविकांना दर्शन घेता यावे यासाठी बोट तयार करण्यात आली आहे. मातेच्या दर्शनासाठी येणारे भाविक नौकाविहाराचा आनंद घेत मातेचे दर्शन घेत आहेत.

Video : कोल्हापूरच्या अंबाबाईचे घ्या नागपुरात दर्शन, घरातच साकारला नयनरम्य देखावा

दर्शनासाठी लाकडी होड्या

तलावाच्या मध्यभागी मातेची मूर्ती बसवण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांच्या दर्शनासाठी लाकडी होड्या बांधल्या आहेत. देवीच्या दर्शनासाठी येणारे भाविक नौकाविहाराचा देखील आनंद घेत आहेत. तलावाच्या मधोमध असलेली देवीची स्थापना जिल्ह्यात एक आकर्षक केंद्रबिंदू ठरला आहे. त्यामुळे येथे दर्शनासाठी जिल्हाभरातून भाविक येत आहेत. 

Video: सर्व मनोकामना पूर्ण करणारी अग्याराम देवी, 2706 अखंड ज्योतींनी उजळले मंदिर

40 वर्षांपासूनची परंपरा

40 वर्षांपासून आमच्या मंडळात गाव तलावाच्या मध्यभागी वेगळ्या पद्धतीने देवीची स्थापना केली जाते. ज्याच्या दर्शनासाठी जिल्हाभरातून भाविकांची गर्दी होते. दोन वर्षांनंतर उत्सव साजरी होत आहे त्यामुळे यावेळी काहीतरी नवीन करण्याचा विचार केला. ज्यामध्ये पूर्वी माताजीच्या दर्शनासाठी लाकडी पूल तयार करण्यात आला होता, त्याच्या जागी प्लास्टिक आणि लाकडी फलक लावण्यात आले असून दर्शनावेळी भाविकांचा आनंद वाढला आहे, अशी माहिती मंडळ सदस्यांनी दिली. 

First published:

Tags: Navratri, Wardha, Wardha news