जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / रावण समजून देवीच्याच मूर्तीवर मारत असत दगड! पुरातन ठेव्याची 400 वर्षं उपेक्षा, पाहा Video

रावण समजून देवीच्याच मूर्तीवर मारत असत दगड! पुरातन ठेव्याची 400 वर्षं उपेक्षा, पाहा Video

रावण समजून देवीच्याच मूर्तीवर मारत असत दगड! पुरातन ठेव्याची 400 वर्षं उपेक्षा, पाहा Video

दशमुखी दुर्गा : अतिशय दुर्मिळ आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व प्राप्त असलेल्या या मूर्तीची सध्या अतिशय दुरवस्था झाली आहे.

  • -MIN READ Nagpur,Maharashtra
  • Last Updated :

नागपूर, 3 ऑक्टोबर :  विजयादशमीच्या दिवशी रावणाचे दहन सर्वत्र केले जाते. काही ठिकाणी रावणाच्या मुर्तीला दगड देखील मारले जातात. चंद्रपूर जिल्ह्यातील भिवापूर वॉर्डातील पाषाणातील एका मुर्तीला रावण समजून दगड मारला जात असे. पण, ही मूर्ती रावणाची नसून दुर्गादेवीची आहे, हे संशोधनातून सिद्ध झाल्यानंतर दगड मारण्याची प्रथा बंद झाली.  मुर्तीला दगड मारण्याची प्रथा तर बंद झाली पण, त्याची उपेक्षा अजूनही संपलेली नाही. काय आहे इतिहास ? चंद्रपूर जिल्ह्यातील भुगर्भात संपन्न असा खनिजसाठा आहे. त्याचप्रमाणे गोंड राजवटीच्या इतिहासाचे चंद्रपूर साक्षिदार आहे. अठराव्या शतकात गोंड राजवटीमधील राणी हिराई देवीच्या कार्यकाळात चंद्रपूरची भरभराट झाली. हिराई देवीच्या राजवटीमध्ये महाकाली मंदिराची पुनर्बांधणी मंदिराच्या आतील आणि बाहेरच्या बाजूस वेगवेगळे नक्षीदार शिल्प कोरून मंदिराच्या सौंदर्यात भर घालण्यात आली. मंदिराच्या परिसरात महादेव, समुद्रमंथन, शेषशय्या, भगवान विष्णू यांच्यासह  गोंडकालीन शिल्प आणि चित्रकला याचा अभूतपूर्व संगम पाहयला मिळतो. नागपुरात दुर्गा देवीसमोर साकारलं ‘स्वप्नलोक’, पाहा Video गोंड राजवटीत उभारण्यात आलेल्या या शिल्पकलेपासून प्रेरणा घेत बाबूपेठमध्ये राहणाऱ्या रायप्पा वैश्य यांनी भव्य मंदिराचे काम सुरू केले. हे काम प्रगतीपथावरच असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे हे काम कायमचे अपूर्ण राहिले. त्यामुळे या मंदिराला ‘अपूर्ण देवालय’, असे म्हणतात, अशी माहिती इतिहास अभ्यासक अशोक सिंह ठाकूर यांनी दिली. ऐतिहासिक मूर्तीची उपेक्षा या अपूर्ण देवालयात 23 फुट लांब आणि 18 फुट रुंद अशी एकपाषणी ही मूर्ती आहे. दहा तोंड, दहा हात आणि दहा पाय असलेली दुर्गादेवीची ही वैशिष्टपूर्ण मूर्ती आहे. दशभुजाधारी मुर्तीच्या प्रत्येक हातात शस्त्र आहे. या प्रकारातील दुर्गादेवीची मूर्ती क्वचितच कुठे पाहयला मिळते. राज्यातील ही सर्वात भव्य दुर्गादेवीची मुर्ती असल्याचं सांगितलं जातं.

अतिशय दुर्मिळ आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व प्राप्त असलेल्या या मूर्तीची सध्या अतिशय दुरवस्था झाली आहे. त्यावर योग्य उपाययोजना करून मुर्तीच्या संवर्धनासाठी सरकारनं प्रयत्न करावी अशी अपेक्षा इतिहास अभ्यासक अशोक सिंह ठाकूर यांनी केली आहे. चंद्रपुरातील दुर्गादेवीची वैशिष्ट्यपूर्ण मुर्तीची छोटेखानी प्रतिकृती नागपुरातील मध्यवर्ती संग्रहालयात ठेवण्यात आली आहे. या मूर्तीची प्रतिकृती नागपुरातील मध्यवर्ती संग्रहालयात ठेवण्यात आलेली असून खालील पत्त्याद्वारे आपण पोहचू शकता. गुगल मॅपवरून साभार संग्रहालयाची वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 6

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात