मराठी बातम्या /बातम्या /religion /

Janmashtami 2022: राशीनुसार भगवान श्रीकृष्णाची अशी करा पूजा, मनोकामना होतील पूर्ण

Janmashtami 2022: राशीनुसार भगवान श्रीकृष्णाची अशी करा पूजा, मनोकामना होतील पूर्ण

जन्माष्टमीला लोक भगवान श्रीकृष्णाच्या पालखीला सजवतात आणि भगवान श्रीकृष्णाची अनेक प्रकारे सुंदर सजावट करतात. कोणत्या राशीच्या व्यक्तीने कशी सजावट, पूजा करावी? याबद्दल भोपाळचे ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा सांगत (Janmashtami 2022) आहेत.

जन्माष्टमीला लोक भगवान श्रीकृष्णाच्या पालखीला सजवतात आणि भगवान श्रीकृष्णाची अनेक प्रकारे सुंदर सजावट करतात. कोणत्या राशीच्या व्यक्तीने कशी सजावट, पूजा करावी? याबद्दल भोपाळचे ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा सांगत (Janmashtami 2022) आहेत.

जन्माष्टमीला लोक भगवान श्रीकृष्णाच्या पालखीला सजवतात आणि भगवान श्रीकृष्णाची अनेक प्रकारे सुंदर सजावट करतात. कोणत्या राशीच्या व्यक्तीने कशी सजावट, पूजा करावी? याबद्दल भोपाळचे ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा सांगत (Janmashtami 2022) आहेत.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk
मुंबई, 16 ऑगस्ट : कृष्ण जन्माष्टमीची जय्यत तयारी सुरू झाली आहे. हिंदू धर्मात कृष्ण जन्माष्टमी हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यावर्षी कृष्ण जन्माष्टमीच्या सणावर ध्रुव आणि वृद्धी योग तयार होत आहे. या योगांमध्ये जन्माष्टमीचे व्रत पाळल्यास व नियमानुसार भगवान श्रीकृष्णाची आराधना केल्यास दुःख, त्रासांपासून मुक्ती मिळते आणि इच्छित वरदान प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे. जन्माष्टमीला लोक भगवान श्रीकृष्णाच्या पालखीला सजवतात आणि भगवान श्रीकृष्णाची अनेक प्रकारे सुंदर सजावट करतात. कोणत्या राशीच्या व्यक्तीने कशी सजावट, पूजा करावी? याबद्दल भोपाळचे ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा सांगत (Janmashtami 2022) आहेत. -मेष मेष राशीत जन्मलेल्या लोकांनी कृष्ण जन्माष्टमीला भगवान श्रीकृष्णाला लाल वस्त्रांनी सजवावे. असे मानले जाते की, कृष्णाला लाल वस्त्रांनी सजवल्याने व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात आनंद येतो आणि मानसिक तणाव दूर होतो. -वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांनी भगवान श्रीकृष्णाच्या बालगोपाल रूपाला चांदीच्या वस्तूंनी सजवावे. असे केल्याने वृषभ राशीच्या लोकांना भगवान श्रीकृष्णाची कृपा प्राप्त होते. -मिथुन मिथुन राशीच्या लोकांनी भगवान श्रीकृष्णाला लहरिया मुद्रित वस्त्रांनी सजवणे शुभ मानले जाते. असे केल्याने मिथुन राशीच्या लोकांना धैर्य आणि पराक्रम प्राप्त होतो. -कर्क कर्क राशीच्या लोकांनी श्रीकृष्णाला शुभ्र वस्त्रांनी सजवणे शुभ मानले जाते. असे केल्याने भगवान श्रीकृष्णाची कृपा प्राप्त होते आणि व्यक्तीला प्रत्येक कार्यात यश मिळते, असे मानले जाते. - सिंह सिंह राशीत जन्मलेल्या लोकांनी भगवान श्रीकृष्णाला गुलाबी रंगाच्या वस्त्रात सजवणे शुभ मानले जाते. याशिवाय सिंह राशीच्या लोकांनी पुजेत श्रीकृष्णाला अष्टगंधाचा टिळा लावा. त्यामुळे त्या व्यक्तीचा मान-सन्मान वाढतो, असे मानले जाते. -कन्या कन्या राशीच्या लोकांनी भगवान श्रीकृष्णाला हिरव्या वस्त्रांनी सजवावे असे सांगितले जाते. भगवान श्रीकृष्णाच्या सजावटीमध्ये चंदनाचाही वापर केला जाऊ शकतो. असे केल्याने कन्या राशीवर भगवान श्रीकृष्णाची कृपा कायम राहते. -तुळ राशी तूळ राशीच्या लोकांनी भगव्या रंगाच्या कपड्यांमध्ये श्रीकृष्णाचा श्रृंगार करावा. यानंतर तुम्ही भगवान श्रीकृष्णाला तूप अर्पण करू शकता. असे मानले जाते की यामुळे व्यक्तीची आर्थिक समस्या लवकर संपते. - वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या लोकांनी जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाला लाल वस्त्रांनी सजवावे. असे केल्याने भगवान श्रीकृष्ण सुख-समृद्धी देतात आणि व्यक्तीला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता वाढते. हे वाचा - श्रावणात तुम्हालाही अशी स्वप्ने पडतात का? शिव महादेवाचा आशीर्वाद मिळण्याचे असतात ते संकेत - धनु धनु राशीच्या लोकांनी जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाला पिवळ्या वस्त्रांनी सजवावे. त्यानंतर फक्त पिवळ्या रंगाची मिठाई कृष्णाला अर्पण करावी. असे केल्याने धनु राशीच्या लोकांच्या जीवनातील समस्या दूर होतात. -मकर मकर राशीच्या लोकांनी कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाला पिवळ्या आणि लाल वस्त्रांनी सजवावे. याशिवाय कान्हाला पिवळ्या किंवा लाल रंगाचे कुंडल घालू शकता. असे केल्याने कृष्णाचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि तुमच्या मनोकामना पूर्ण होतात. -कुंभ कुंभ राशीच्या लोकांसाठी कृष्णाला निळ्या वस्त्रांनी सजवणे शुभ मानले जाते. असे केल्याने कुंभ राशीच्या लोकांना त्यांच्या जीवनात प्रत्येक क्षेत्रात यश मिळते. -मीन मीन राशीच्या लोकांनी भगवान श्रीकृष्णाची पूजा पितांबर रंगाच्या वस्त्रांनी करावी. तसेच, त्यांनी पिवळ्या रंगाचे कुंडल घालावे. असे केल्याने जीवन आनंदी होते. हे वाचा - श्रावणात शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना या गोष्टींमध्ये चुकू नका; हे वार आहेत महत्त्वाचे (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
First published:

Tags: Rashibhavishya, Religion, Shri krishna janmashtami

पुढील बातम्या