श्रावणात शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना या गोष्टींमध्ये चुकू नका; हे वार आहेत महत्त्वाचे

श्रावणात शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना या गोष्टींमध्ये चुकू नका; हे वार आहेत महत्त्वाचे

श्रावणामध्ये असे काही दिवस असतात, ज्या दिवशी बेलाची पाने तोडणे शुभ मानले जात नाही आणि या दिवसात बेलाची पाने तोडल्याने महादेव क्रोधित होतात. दिल्लीचे आचार्य गुरमीत सिंह यांच्याकडून जाणून घेऊया श्रावणातील कोणत्या 8 दिवसात बेलाची पाने तोडू नयेत

  • Share this:

मुंबई, 06 ऑगस्ट : देवांचे दैवत मानल्या जाणाऱ्या महादेवाला श्रावण महिना अतिशय प्रिय आहे, त्यामुळे शिवभक्त हा महिनाभर प्रसिद्ध मंदिरे आणि शिवालयांमध्ये पूजेसाठी दाखल होतात. शिवाच्या आवडत्या श्रावण महिन्यात त्यांच्या आवडत्या गोष्टी पूजेत अर्पण केल्या जातात. यामुळे महादेव प्रसन्न होतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात. बेलपत्र हे शिव महादेवाला खूप प्रिय आहे आणि बेलपत्र हे शंकराच्या सर्व पूजेमध्ये नक्कीच अर्पण केले जाते. कारण बेलपत्राशिवाय शिवाची पूजा अपूर्ण मानली जाते आणि पूजेचे फळ मिळत नाही. स्कंद पुराणानुसार शिवलिंगावर बेलपत्र (Belpatra) अर्पण केल्याने भक्तांची सर्व दुःख दूर होतात. शिवलिंगावर दररोज बेलपत्र अर्पण करावे, परंतु श्रावणात काही दिवशी बेलपत्र तोडणे अशुभ मानलं जातं. त्याविषयी आज जाणून घेऊया.

श्रावणामध्ये असे काही दिवस असतात, ज्या दिवशी बेलाची पाने तोडणे शुभ मानले जात नाही आणि या दिवसात बेलाची पाने तोडल्याने महादेव क्रोधित होतात. दिल्लीचे आचार्य गुरमीत सिंह यांच्याकडून जाणून घेऊया श्रावणातील कोणत्या 8 दिवसात बेलाची पाने तोडू नयेत आणि बेलाची पाने अर्पण करण्याचे महत्त्वाचे नियम कोणते आहेत?

श्रावणात या दिवशी बेलची पाने तोडू नयेत -

चतुर्थी, अष्टमी, नवमी, श्रावण अमावस्या, श्रावण पौर्णिमा, संक्रांती आणि श्रावण महिन्यातील सोमवारी देखील बेलाची पाने तोडू नयेत. यामुळे महादेव क्रोधित होऊ शकतात. श्रावण महिन्यात दररोज शिवाला बेलाची पाने अर्पण करण्याची इच्छा असल्यास बेलाची पाने वरील दिवसांच्या आदल्या दिवशी तोडावीत. म्हणजे श्रावण सोमवारी बेल अर्पण करायचे असल्यास आदल्या दिवशीच (म्हणजे वरील दिवस येत नसताना) बेल तोडून ठेवावा आणि पूजेवेळी स्वच्छ पाण्याने धुवून वापरावा.

हे वाचा - ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा

बेलाची पाने अर्पण करताना या गोष्टी लक्षात ठेवा

भगवान शंकराला अर्पण केली जाणारी बेलपत्राची पाने खराब किंवा तुटलेली असू नयेत, याकडे विशेष लक्ष द्यावे.

बेलपत्राचा वरचा म्हणजे गुळगुळीत भाग शिवलिंगाला स्पर्श करून अर्पण करावा.

त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रिधायुतम्। त्रिजन्मपापसंहारं बिल्वपत्रं शिवार्पणम्॥ या मंत्राचा जप करताना - बेलाची पाने अर्पण केल्याने भगवान शंकराचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो, असे मानले जाते.

हे वाचा - डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

Published by: News18 Desk
First published: August 6, 2022, 6:15 AM IST

ताज्या बातम्या