श्रावणात तुम्हालाही अशी स्वप्ने पडतात का? शिव महादेवाचा आशीर्वाद मिळण्याचे असतात ते संकेत

श्रावणात तुम्हालाही अशी स्वप्ने पडतात का? शिव महादेवाचा आशीर्वाद मिळण्याचे असतात ते संकेत

ज्योतिष शास्त्रानुसार श्रावण महिन्यात स्वप्नात शिवाशी संबंधित काही गोष्टी दिसल्या तर समजून घ्या की, भोलेनाथाची कृपा तुमच्यावर होणार आहे. श्रावणामध्ये स्वप्नात कोणत्या गोष्टी पाहणे शुभ मानले (Auspicious Dream in Sawan) जाते, त्याविषयी जाणून घेऊया.

  • Share this:

मुंबई, 05 ऑगस्ट : श्रावण हा देवांचा देव महादेवाचा आवडता महिना आहे. या काळात शिवालयांमध्ये शिव महादेवाला प्रसन्न करण्यासाठी भाविकांची वर्दळ असते. शिवभक्त जलाभिषेक, रुद्राभिषेक आणि मंत्रोच्चार करून महादेवाची पूजा करताना दिसतात. स्वप्नांचे जग हे खूप रहस्यमय आहे. वास्तुशास्त्रानुसार स्वप्नात दिसणार्‍या काही गोष्टींचे महत्त्व आहे. काही स्वप्ने येणार्‍या संकटाचा इशारा देतात, तर काही शुभ आणि अशुभ संकेत देतात. ज्योतिष शास्त्रानुसार श्रावण महिन्यात स्वप्नात शिवाशी संबंधित काही गोष्टी दिसल्या तर समजून घ्या की, भोलेनाथाची कृपा तुमच्यावर होणार आहे. पंडित इंद्रमणी घनश्याल यांच्याकडून जाणून घेऊया श्रावणामध्ये स्वप्नात कोणत्या गोष्टी पाहणे शुभ मानले (Auspicious Dream in Sawan) जाते.

स्वप्नात नंदी (बैल) दिसणे -

धर्मग्रंथानुसार, धार्मिक मान्यतेनुसार नंदी हा शिवाचा गण आणि त्याचे वाहन मानले जाते. असे म्हटले जाते की श्रावण महिन्यात स्वप्नात बैल दिसला तर समजून घ्या की शिव आपल्यावर कृपा करणार आहे. स्वप्नात नंदी दिसणे हे प्रत्येक कामात यश मिळवण्याचे चिन्ह आहे.

हे वाचा - डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर

त्रिशूल -

त्रिशूल हे रज, तम आणि सतगुण यांचेही प्रतीक मानले जाते. त्यांच्या संयोगाने भगवान शंकराचा त्रिशूळ तयार झाला आहे, असे म्हणतात. पौराणिक मान्यतेनुसार भगवान शिवाच्या त्रिशूळाची तीन टोके वासना, क्रोध आणि लोभ यांचे कारण मानले जातात. स्वप्नात त्रिशूल दिसणे हे चिन्ह आहे की आपली सर्व संकटे नष्ट होणार आहेत.

हे वाचा - ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा

डमरू -

शास्त्रानुसार भगवान शिव नेहमी हातात डमरू धारण करतात. डमरू हे स्थिरतेचे प्रतीक आहे. स्वप्नात शिवाचा डमरू पाहणे म्हणजे जीवनातील गोंधळ संपणार आहे. स्वप्नात डमरू पाहणे हे जीवनातील स्थिरतेचे लक्षण आहे.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

Published by: News18 Desk
First published: August 5, 2022, 11:00 PM IST

ताज्या बातम्या