वर्धा, 10 जुलै: श्रावण हा व्रतवैकल्याचा महिना म्हणून सर्वांना परिचित आहे. याच महिन्यात दर शुक्रवारी जिवती पूजन व्रत केलं जातं. जिवती ही मुख्यतः लहान मुलांची जीवनदायिनी देवी आहे असं म्हणतात. जिवती हीच या व्रताची देवता आहे. जिवती आई ही लहान मुलांचे रक्षण करणारी देवी आहे, असं सांगितलं जातं. दरवर्षी श्रावण महिना सुरू होण्याच्या आधी घरोघरी दरवाजावर आणि देवाजवळ जिवतीची प्रतिमा लावली जाते. विशेषतः सोनार समाजातील व्यक्ती घरोघरी ही जिवती लावताना दिसून येतात. आषाढातील अमावस्येला जिवती सण आषाढ महिन्याच्या अमावस्येला जिवती हा सण साजरा केला जातो. यंदा हा सण 17 जुलैला आलेला आहे. या दिवशी जिवतीच्या प्रतिमेचे पूजन केलं जातं. या दिवशी जरा-जिवंतिका पूजन सुद्धा करतात. दिवा हे ज्ञानाचं, वृद्धींचं प्रतीक आहे. दिवा अज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे जाणाऱ्या मार्गाचा मुख्य आधार आहे. या प्रतीकाचं पूजन म्हणजेच दीपपूजन होय. दुसरी पूज्य देवता म्हणजे जिवती. जिवतीची प्रतिमेच्या रूपात पूजा केली जाते. संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेच पूजन केलं जातं.
बाळाचे रक्षण करण्यासाठी प्रार्थना लहान मुलांचे औक्षण करून जिवती आईला त्यांचे रक्षण करावे, अशी मनोभावे प्रार्थना केली जाते. जिवतीची प्रतिमेच्या रूपात पूजा केली जाते. जिवती प्रतिमा दरवाजावर किंवा देवाजवळ लावली जाते. संपूर्ण श्रावण महिना मातृशक्तीकडून या प्रतिमेचं पूजन केलं जातं आणि आपल्या अपत्यांच्या मंगलतेची प्रार्थना केली जाते. बदलापूरच्या युवा उद्योजकाची कमाल, बाप्पा निघाले सातासमुद्रपार जिवती प्रतिमेत चार देवता जिवतीची पंचकोनी प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे. या एकाच प्रतिमेत चार वेगवेगळ्या देवतां आहेत. वरवर पाहता परस्परांशी संबंध नसलेल्या त्या स्वतंत्र प्रतिमा आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचं पूजन केलं जातं. यातील एकही प्रतिमा बदललेली दिसत नाही, असे भाविक सांगतात.