जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / Diwali Shopping : धनत्रयोदशीला कोणत्या मुहूर्ताला Gold खरेदी करणं ठरेल शुभ? इथं पाहा 'सुवर्णवेळ'

Diwali Shopping : धनत्रयोदशीला कोणत्या मुहूर्ताला Gold खरेदी करणं ठरेल शुभ? इथं पाहा 'सुवर्णवेळ'

Diwali Shopping : धनत्रयोदशीला कोणत्या मुहूर्ताला Gold खरेदी करणं ठरेल शुभ? इथं पाहा 'सुवर्णवेळ'

दिवाळीतील धनत्रयोदशीचा दिवस सोन्या-चांदीसारख्या मौल्यवान धातूंच्या खरेदीसाठी शुभ मानला जातो. या दिवसाला खरेदीसाठी विशेष महत्त्व दिले जाते. मात्र, यावेळी शुभ मुहूर्त पाहून अनेकजण सोने खरेदी करतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 15 ऑक्टोबर : दिवाळी च्या आसपास सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणावर खरेदी होते. सोने-चांदी आणि इतर मौल्यवान वस्तू खरेदी करण्यासाठी लोक वर्षभर या सणाची वाट पाहत असतात. यावेळी बहुतेक लोक त्यांची वर्षभराची बचत दागिने, वाहने आणि मालमत्ता इत्यादींमध्ये गुंतवतात. दिवाळीचा मुख्य सण वसुबारस नंतर धनत्रयोदशीपासून सुरू होतो आणि पुढील पाच दिवस चालतो. धनत्रयोदशीचा दिवस सोन्या-चांदीसारख्या मौल्यवान धातूंच्या खरेदीसाठी शुभ मानला जातो. या दिवसाला खरेदीसाठी विशेष महत्त्व दिले जाते. आपल्या देशातील बहुसंख्य लोकांच्या श्रद्धा आणि आस्थेमुळे मौल्यवान वस्तूंच्या खरेदीसाठीही शुभ मुहूर्त महत्वाचा असतो.

Diwali 2022 : वसुबारस ते भाऊबीज; दिवाळीतील प्रत्येक सणाचं महत्त्व आणि तिथी एका क्लिकवर

धनत्रयोदशीला करतात धनलक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा धनत्रयोदशी हा संपत्ती आणि समृद्धीचा सण मानला जातो. या दिवशी लोक कुबेर आणि देवी लक्ष्मीची पूजा करतात. हिंदूंसाठी आणि विशेषतः व्यावसायिकांसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी संपत्ती आणि समृद्धीसाठी शुभेच्छा दिल्या जातात तसेच गुंतवणुकीसाठी या दिवसाला महत्त्व दिले जाते.

News18लोकमत
News18लोकमत

यावर्षीचा धनत्रयोदशीचा सण जवळ आल्याने देशभरातील ज्वेलर्स म्हणजेच सोने व्यापारी या सणाला मोठ्या प्रमाणात खरेदीची अपेक्षा करतात. म्हणूनच ते खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी सर्व प्रकारच्या ऑफर देत असतात. या आहेत सोनं खरेदीसाठी सर्वोत्तम वेळा यावर्षी 23 ऑक्टोबर रोजी उदयतिथीला धनत्रयोदशीचा सण साजरा केला जाणार आहे. मात्र सोने, चांदी, भांडी, कपडे आणि इतर वस्तूंच्या खरेदीचा मुहूर्त 22 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.

दिवाळीत लक्ष्मीपूजन करताना या गोष्टी ध्यानात ठेवा, धन-धान्य कधी कमी नाही पडत

शनिवार, 22 ऑक्टोबर रोजी सकाळी 5:02 ते 6:27, सायंकाळी 6:02 ते 7:20 आणि रात्री 8:55 ते मध्यरात्री 1:56 पर्यंत आहे. 23 ऑक्टोबर रोजी सोने खरेदीचा शुभ मुहूर्त सकाळी 6.27 ते सायंकाळी 6.03 पर्यंत आहे. या दिवसाचे इतर मुहूर्त सकाळी 08:02 ते दुपारी 12:23, दुपारी 1:50 ते दुपारी 3:16 आणि संध्याकाळी 5:44 ते 06:03 पर्यंत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात