दिवाळी हा एक दिवसाचा नव्हे तर पाच दिवसांचा सण आहे. यंदा दिवाळीची सुरुवात 21 ऑक्टोबर वसुबारसपासून होणार आहे, तर 26 ऑक्टोबर म्हणजेच भाऊबीजेला दिवाळी संपणार आहे.
वसुबारस : दिवाळीतील सर्वात पहिला सण म्हणजे वसुबारस. या दिवशी गायीची पूजा केली जाते. शहरांपेक्षा हा सण खेड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.
धनतेरस : धनत्रयोदशीच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा केली जाते. या दिवशी सोन्याचे दागिने आणि चांदीची भांडी खरेदी करतात. असे केल्याने हा शुभ दिवस वर्षभर समृद्धीकडे आकर्षित होतो असे मानले जाते. (प्रतिमा: पीटीआय)
नरक चतुर्दशी : नरक चतुर्दशीला छोटी दिवाळीदेखील म्हणतात. पौराणिक कथेनुसार, नरक चतुर्दशीला श्रीकृष्णाच्या पत्नीने (सत्यभामा) राक्षस राजा नरकासुराचा वध केला होता. (प्रतिमा:PTI)
लक्ष्मी पूजन : लक्ष्मी पूजनाच्या दिवशीच खरी दिवाळी साजरी होते. या दिवशी शांती, समृद्धी आणि संपत्तीसाठी लक्ष्मी-गणेशाची पूजा केली जाते. लक्ष्मीपूजन झाल्यानंतरच फटाके फोडले जातात.
पाडवा : दिवाळीतील पाडवा हादेखील महत्वाचा सण आहे. प्रथेनुसार, नवविवाहित मुलींना त्यांच्या पतीसह त्यांच्या माहेरी सण साजरा करण्यासाठी आमंत्रित केले जाते. यादिवशी महिला आपल्या पतीला ओवाळतात. (प्रतिमा:PTI)
भाऊबीज : पौराणिक कथेनुसार, या दिवशी मृत्यूचे देवता यमराज खूप दिवसांनी आपली बहीण यमीला भेटायला गेले होते. यमीने कपाळावर तिलक लावून यमराजांचे उत्साहात स्वागत केले. यादिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळते. (प्रतिमा:PTI)