मुंबई, 17 ऑक्टोबर : हिंदू धर्मातील दिव्यांचा सण दिवाळी हा सर्वात मोठा सण आहे. यंदाची दिवाळी 24 ऑक्टोबर 2022 रोजी साजरी होणार आहे. धनत्रयोदशीचा सण दिवाळीच्या 2 दिवस आधी साजरा केला जातो, जो यावर्षी 22 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे. धनत्रयोदशी अनेक प्रकारे लोकांसाठी शुभ आणि महत्त्वाची आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी बरेच लोक खरेदी करतात, म्हणून हा खरेदीचा सण देखील मानला जातो. असे मानले जाते की धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केल्याने घरातील सुख, समृद्धी आणि संपत्ती वाढते आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होते. भोपाळचे ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा सांगत आहेत या दिवशी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी. दिवाळीपूर्वीच्या धनत्रयोदशीला यशस्वी लोकांसाठी खूप महत्त्व असते. जर तुम्हालाही या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांना प्रसन्न करायचे असेल तर धनत्रयोदशीनंतर तांदळाचे 21 दाणे कुंकू किंवा हळदीने लाल कपड्यात बांधून आपल्या तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवा. असे मानले जाते की असे केल्याने घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही आणि घरात सुख-समृद्धी येते.
Diwali Shopping : धनत्रयोदशीला कोणत्या मुहूर्ताला Gold खरेदी करणं ठरेल शुभ? इथं पाहा ‘सुवर्णवेळ’धनत्रयोदशीला या गोष्टींची घ्या विशेष काळजी - धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा करताना दिशांची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. या दिवशी भगवान कुबेरची पूजा केली जाते आणि भगवान कुबेरांची दिशा उत्तरेकडे मानली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी उत्तर दिशेकडे रोख किंवा पैसे ठेवून पूजा केल्यास भगवान कुबेराचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- धनत्रयोदशीच्या दिवशी कुबेरासोबत माता लक्ष्मीचीही पूजा केली जाते, कारण संपत्तीची प्रमुख देवता देवी लक्ष्मी आहे. जर तुम्हाला लक्ष्मी मातेला प्रसन्न करायचे असेल तर या दिवशी बाजारातून नवीन झाडू खरेदी करा आणि धनत्रयोदशीला खरेदी केलेला नवीन झाडू घरी आणणे हे समृद्धीचे लक्षण आहे असे मानले जाते. - धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा करण्यापूर्वी माता लक्ष्मीचे चित्र तुमच्या घराच्या, दुकानाच्या तिजोरीवर लावा आणि त्याची पूजा करा, पण एका गोष्टीची विशेष काळजी घ्या की तुम्ही लावत असलेल्या चित्रात माता लक्ष्मी कमळामध्ये धन वर्षा करतानाच्या मुद्रेत विराजमान असावी. - धनत्रयोदशीच्या दिवशी घरामध्ये माता लक्ष्मीचे श्री यंत्र स्थापित करणे खूप शुभ मानले जाते. दिवाळीपर्यंत या यंत्राची पूजा करा, त्यानंतर घर किंवा कार्यालयात उत्तर दिशेला ठेवा. असे केल्याने लक्ष्मीची कृपा नक्कीच प्राप्त होते. दिवाळीत लक्ष्मीपूजन करताना या गोष्टी ध्यानात ठेवा, धन-धान्य कधी कमी नाही पडत - जेव्हा तुम्ही धनत्रयोदशीसाठी बाजारातून खरेदी करत असाल, तेव्हा तुम्ही 11 गोमती चक्रे खरेदी करून घरी आणू शकता. घरी आणल्यानंतर त्यावर चंदन लावून लक्ष्मीची पूजा करावी आणि माता लक्ष्मीच्या मंत्रांचा जप करावा. यानंतर घरातील पैशाच्या ठिकाणी ठेवा. असे केल्याने तुमच्या घरात सदैव लक्ष्मी मातेचा आशीर्वाद राहील.