जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / Chandra Grahan 2022 : सूर्यग्रहणानंतर आता चंद्रग्रहण; या राशींवर होणार प्रतिकूल परिणाम

Chandra Grahan 2022 : सूर्यग्रहणानंतर आता चंद्रग्रहण; या राशींवर होणार प्रतिकूल परिणाम

Chandra Grahan 2022 : सूर्यग्रहणानंतर आता चंद्रग्रहण; या राशींवर होणार प्रतिकूल परिणाम

हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. मात्र एकाच पक्षामध्ये सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण आल्यामुळे शास्त्रानुसार हे शुभ संकेत नाहीत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 26 ऑक्टोबर : या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सुरुवातीला झाले आहे. यानंतर आता कार्तिक पौर्णिमेला शुक्ल पक्षातील चंद्रग्रहणही होणार आहे. कार्तिक महिन्याच्या एकाच बाजूला सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण यांचे मिश्रण आहे. धार्मिक दृष्टिकोनातून हे चांगले लक्षण नाही. यात अनेक अशुभ संकेत आहेत, जे आपल्यासाठी त्रासदायक ठरू शकतात. या वर्षातील पहिले चंद्रग्रहण 16 मेला झाले होते. या चंद्र ग्रहणाची वेळ सकाळी 07.58 ते 11.25 वाजेपर्यंत होती. तर या वर्षातील दुसरे सूर्यग्रहण 25 ऑक्टोबरला झाले आहे. मात्र आता यावर्षीचे दुसरे चंद्रग्रहण होणार आहे. या चंद्रग्रहणाचा काही राशींवर विपरीत प्रभाव पडू शकतो. चला तर मग जाणून घेऊया पुढील चंद्रग्रहण कधी आहे आणि त्याचा कोणत्या राशींवर प्रभाव पडत आहे.

Surya Grahan 2023 Date : आता सूर्यग्रहण पाहण्याचा दुर्मिळ योग पुन्हा कधी येईल; इथं पाहा तारखा

या दिवशी होईल 2022 मधील दुसरे चंद्रग्रहण झी न्यूजने दिलेल्या माहितीप्रमाणे, 2022 सालचे दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण 8 नोव्हेंबर रोजी दुपारी 1.32 ते 7.27 पर्यंत राहील. हे संपूर्ण चंद्रग्रहण असेल. हे ग्रहण या सुतक काळात अधिक परिणामकारक असेल. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. मात्र एकाच पक्षामध्ये सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण आल्यामुळे शास्त्रानुसार हे शुभ संकेत नाहीत.

News18लोकमत
News18लोकमत

कोणत्या राशींवर परिणाम होईल वृश्चिक : वृश्चिक राशीच्या लोकांनी ग्रहणकाळात पैशाशी संबंधित कोणतेही काम करण्यापूर्वी विचार करावा. अन्यथा त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. या काळात वृश्चिक राशीच्या लोकांनी सावध राहावे. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांसाठीदेखील हे चंद्रग्रहण शुभ मानलं जात नाहीये. या ग्रहणादरम्यान वृषभ राशीच्या लोकांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच या काळात कोणत्याही नवीन कार्यास सुरवात करू नये. कन्या : कन्या राशीच्या लोकांनी कोणत्याही प्रकारच्या अनावश्यक खर्चापासून दूर राहाणे चांगले राहील. या राशीच्या वक्तींनी संपूर्ण १५ दिवस काळजी घेणे आवश्यक आहे. मिथुन : मिथुन राशीच्या लोकांचा या काळात जास्त खर्च होण्याची शक्यता आहे. या राशीवर चंद्रग्रहणाचा आर्थिक दृष्टीकोनातून वाईट परिणाम होऊ शकतो. आणि मानसिक तणावही वाढू शकतो. चंद्रग्रहणाच्या वेळी या गोष्टी लक्षात ठेवा चंद्रग्रहण काळात अन्न शिजवू नका किंवा खाऊ नका. या काळात झोपायलाही मनाई आहे. या काळात देवाची पूजा करावी. गर्भवती महिलांनीही विशेष काळजी घ्यावी. जर जेवण तयार असेल तर त्यात गंगाजल आणि तुळशीची पाने टाका, म्हणजे ते शुद्ध होते. ग्रहण संपल्यानंतर आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. मग पूजा करावी. Solar Eclipse 2022 : ग्रहण काळात काहीही खाणे अशुभ का मानले जाते? जाणून घ्या कारण चंद्र वस्तूंचे दान चंद्रग्रहण काळात पूजा करताना चंद्रदेवाच्या बीज मंत्राचा जप करा, ओम सोमाय नमः. त्यानंतर चंद्राशी संबंधित वस्तू जसे की मोती, पांढरे वस्त्र, तांदूळ, दही, साखर, पांढरी फुले इत्यादी दान करा. असे केल्याने कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते आणि चंद्र दोष दूर होतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात