जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Surya Grahan 2023 Date : आता सूर्यग्रहण पाहण्याचा दुर्मिळ योग पुन्हा कधी येईल; इथं पाहा तारखा

Surya Grahan 2023 Date : आता सूर्यग्रहण पाहण्याचा दुर्मिळ योग पुन्हा कधी येईल; इथं पाहा तारखा

Surya Grahan 2023 Date : आता सूर्यग्रहण पाहण्याचा दुर्मिळ योग पुन्हा कधी येईल; इथं पाहा तारखा

जेव्हा चंद्र, पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो तेव्हा ग्रहण होते. जाणून घ्या 25 ऑक्टोबर 2022 नंतर सूर्यग्रहण पुन्हा कधी दिसणार आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 25 ऑक्टोबर : हिंदू धर्मात सूर्यग्रहण अशुभ मानले जाते. या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. हिंदू कॅलेंडरनुसार, पौर्णिमेला किंवा अमावस्येला ग्रहण होते. पंडित शक्ती जोशी यांच्या मते ग्रहणापूर्वी सुतक लावले जाते आणि सुतकाशी संबंधित नियमांचेही पालन केले जाते. सूर्यग्रहण काळात खाणे-पिणेही करू नये. धार्मिक मान्यतेनुसार सूर्यग्रहण राहु-केतूमुळे होते. या दरम्यान, गर्भवती महिलांनी स्वतःची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. सूर्यग्रहणाच्या वैज्ञानिक कारणाविषयी बोलताना, जेव्हा चंद्र, पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो तेव्हा हे घडते. या वर्षी सूर्यग्रहण भारताच्या काही भागात दिसणार आहे. या वर्षी पुढील ग्रहण कधी दिसणार किंवा यापुढील ग्रहण कधी दिसणार आहे. याबद्दल आपण माहिती घेणार आहोत.

Solar Eclipse 2022 : ग्रहण काळात काहीही खाणे अशुभ का मानले जाते? जाणून घ्या कारण

2022 मधील पुढील सूर्यग्रहण कधी? या वर्षी म्हणजेच 2022 च्या शेवटच्या ग्रहणाची तारीख 25 ऑक्टोबर आहे, या तारखेनंतर २०२२ मध्ये पुन्हा सूर्यग्रहण दिसणार नाही. यानंतर आता तुम्ही थेट 2023 मध्ये पुढील सूर्यग्रहण पाहू शकाल.

News18लोकमत
News18लोकमत

2023 मध्ये पुढील सूर्य ग्रहण कधी? time and date.com नुसार, 2023 मध्ये 4 ग्रहण होतील, त्यापैकी 2 सूर्यग्रहण असतील. पहिले सूर्यग्रहण 20 एप्रिल 2023 रोजी होणार आहे. यानंतर 14 ऑक्टोबर 2023 रोजी दुसरे सूर्यग्रहण दिसणार आहे. इतर दोन चंद्रग्रहण होतील.

दिवाळी 2022 : सणासुदीला अशुभपासून रक्षण करते स्वस्तिक, जाणून घ्या बनवण्याची योग्य पद्धत आणि महत्त्व

या वर्षी झालेले शेवटचे सूर्य ग्रहण तुम्हाला पाहायचे असेल तर तुम्ही ते timeanddate.com वर पाहू शकता. ‘रॉयल ​​ऑब्झर्व्हेटरी ग्रीनविच’ या यूट्यूब चॅनलवरही तुम्ही हे ग्रहण पाहू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात