मुंबई, 2 नोव्हेंबर : साल 2022 चे शेवटचे सूर्यग्रहण आपण काही दिवसांपूर्वीच पाहिले आहे. आता वर्षातील शेवटचे आणि दुसरे चंद्रग्रहण 8 नोव्हेंबर 2022 रोजी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हे चंद्रग्रहण काही राशींसाठी चिंताजनक असू शकते. ज्योतिष शास्त्र मानते की 15 दिवसात दोन ग्रहण लागणे हे अशुभ चिन्ह दर्शवते. एकानंतर एक आलेल्या या ग्रहणामुळे अनेकांच्या मनात चिंता वाढली आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण वृश्चिक राशीत होते. त्याचबरोबर वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण वृषभ राशीत होणार आहे. चंद्रग्रहण जवळजवळ सर्व राशींवर परिणाम करते. पण अशा 4 राशी आहेत ज्यांवर या चंद्रग्रहणाचा सर्वात जास्त प्रभाव दिसेल. भोपाळ स्थित ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी याबद्दल माहिती दिली आहे. चला तर मग जाणून घेऊया की, वर्षातील हे शेवटचे चंद्रग्रहण कोणत्या राशींवर कसा परिणाम करेल.
Chandra Grahan 2022 : सूर्यग्रहणानंतर आता चंद्रग्रहण; या राशींवर होणार प्रतिकूल परिणाम
या राशींवर चंद्रग्रहणाचा वाईट परिणाम होईल
मेष
ज्योतिषशास्त्रानुसार, वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण मेष राशीवर नकारात्मक प्रभाव टाकू शकते. मेष राशीच्या लोकांना धनहानी आणि आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. याशिवाय तुम्ही कुठेतरी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही वेळ अजिबात योग्य नाही.
वृषभ
ज्योतिषशास्त्रानुसार, हे चंद्रग्रहण वृषभ राशीसाठी मिश्रित परिणाम आणू शकते. या राशीच्या लोकांना एकीकडे धनलाभ होण्याचे संकेत मिळत आहेत. दुसरीकडे, या राशीच्या मुलांच्या शिक्षणावर नकारात्मक परिणाम दिसून येतात. स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेतलेल्या या राशीच्या विद्यार्थ्यांना अपयशाला सामोरे जावे लागू शकते.
कन्या
कन्या राशीच्या लोकांनाही या चंद्रग्रहणाचा संमिश्र प्रभाव पाहायला मिळेल. कन्या राशीच्या लोकांना या चंद्रग्रहणानंतर नोकरीत बढती मिळू शकते, परंतु कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद होऊ शकतात. कन्या राशीचे लोक या काळात नवीन घर घेऊ शकतात.
Astrology : या ग्रहांपासून राहा सावध! राजालाही बनवू शकतात रंक
मकर
मकर राशीच्या लोकांसाठी हे चंद्रग्रहण शुभ ठरणार आहे. चंद्रग्रहणाच्या प्रभावामुळे मकर राशीच्या लोकांच्या मान-सन्मानात वाढ होऊ शकते. या काळात तुम्ही नवीन वाहन खरेदी करू शकता. याशिवाय तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्याही मिळू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Chandragrahan, Eclipse, Lifestyle, Moon, Rashibhavishya, Religion