जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / अपघात टळेल, प्रवास सुखाचा होईल! फक्त गाडी खरेदी करताना 'हे' लक्षात घ्या

अपघात टळेल, प्रवास सुखाचा होईल! फक्त गाडी खरेदी करताना 'हे' लक्षात घ्या

कोणत्या राशीसाठी कोणत्या रंगाची गाडी ठरेल लाभदायी?

कोणत्या राशीसाठी कोणत्या रंगाची गाडी ठरेल लाभदायी?

प्रत्येक ग्रहाचा एक विशिष्ट रंग असतो. त्यामुळे आपल्या ग्रहांना प्रिय असलेल्या रंगाची गाडी खरेदी केल्यास आपला प्रवास सुखकर झालाच म्हणून समजा.

  • -MIN READ Local18 Karauli,Rajasthan
  • Last Updated :

मोहित शर्मा, प्रतिनिधी करौली, 14 जुलै : आपला ज्योतिषशास्त्रावर विश्वास असेल, तर लक्षात घ्या आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना, आपली प्रत्येक कृती ही आपल्या ग्रह, ताऱ्यांशी संबंधित असते. गाडी चालवणंही त्यापैकीच एक. शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहाचा एक विशिष्ट रंग असतो. त्यामुळे आपण आपल्या ग्रहांना जे रंग प्रिय आहेत, त्यांचा दैनंदिन जीवनात वापर करायला हवा. गाडी खरेदी करतानासुद्धा ही बाब लक्षात घ्यायला हवी. राजस्थानच्या करौली जिल्ह्यातील ज्योतिषी अनिल शर्मा यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, आपल्या राशीच्या ग्रहांनुसार गाडी खरेदी केल्यास अपघातही टळतील. शिवाय गाडी लवकर खराबही होणार नाही. त्यामुळे आज आपण पाहूया, कोणत्या राशीसाठी कोणत्या रंगाची गाडी ठरेल लाभदायी आणि आपला प्रवास होईल सुखमय. मेष : आपल्यासाठी लाल रंगाची गाडी फायदेशीर ठरेल.

News18लोकमत
News18लोकमत

वृषभ : आपल्यासाठी पांढऱ्या रंगाची चमकणारी गाडी लाभदायी ठरेल. साडी आहे की गंमत? एवढ्या किंमतीत नव्या घराच होईल डाऊन पेमेंट, एखादी SUV कार सुद्धा कॅशमध्ये येईल! मिथुन : या राशीच्या व्यक्तींनी हिरव्या रंगाची गाडी खरेदी करावी. कर्क : आपल्यासाठी दुधाळ रंगाची गाडी फायदेशीर ठरेल. सिंह : आपल्यासाठी नारंगी किंवा लाल रंगाची गाडी लाभदायी ठरेल. कन्या : या राशीच्या व्यक्तींनी हिरव्या रंगाची गाडी खरेदी करावी. तूळ : आपल्यासाठी पांढऱ्या रंगाची चमकणारी गाडी फायदेशीर ठरेल. वृश्चिक : आपल्यासाठी लाल रंगाची गाडी लाभदायी ठरेल. धनू : या राशीच्या व्यक्तींनी पिवळ्या रंगाची गाडी खरेदी करावी. मकर : आपल्यासाठी निळ्या किंवा काळ्या रंगाची गाडी फायदेशीर ठरेल. कुंभ : मकर राशीप्रमाणे या राशीच्या व्यक्तींनी निळ्या किंवा काळ्या रंगाची गाडी खरेदी करावी. मीन : या राशीच्या व्यक्तींनी निळ्या रंगाची गाडी खरेदी करावी.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात