अंजली सिंह राजपूत, प्रतिनिधी लखनऊ, 11 जुलै : श्रावण आता काही दिवसांवर येऊन ठेपलाय. श्रावणाची चाहूल म्हणजे सणांची चाहूल. काय मग…झाली का खरेदी? नवीन साड्या, दागिने तर घेतलेच असणार? नाही काय म्हणताय? लखनऊच्या बाजारात पाहा, कशी 9 लाखांची साडी बनून तयार झाली आहे. होय! तुम्ही काहीही चुकीचं वाचलेलं नाहीये. एका साडीची किंमत तब्बल 9 लाख रुपये आहे. हजरतगंजच्या अदा फॅशन स्टोअरमध्ये एका वर्षाहून अधिक महिन्यांच्या मेहनतीनंतर ही साडी बनून तयार झालीये. विशेष म्हणजे एवढी अव्वाच्या सव्वा किंमत असली तरी ही साडी नेसायला काही खूप भरजरी नाही. तर अतिशय हलकी आणि सुंदर अशी आहे. शिवाय सोन्या-चांदीच्या तारांनी जडलेलीही नाही, तर साडीवर हिरे-माणिकांची सुरेख, सुटसुटीत नक्षी आहे. शिफॉन आणि चिकन कापडाच्या मिश्रणाने तयार झालेली ही साडी अतिशय शोभून दिसते, हिरे-माणिकांमुळे प्रचंड चमकते.
एवढी महागडी साडी नेसणार कोण?
9 लाखांच्या साडीला कुठे मागणी मिळेल, असं आपल्याला वाटत असेल, तर जरा थांबा. टीव्हीवरील अवॉर्ड सोहळे आठवा, सेलिब्रिटींची लग्न आठवा. या समारंभांमध्ये तारका ज्या सहजासहजी सर्वसामान्य दुकानांमध्ये पाहायला मिळत नाहीत, अशा साड्या नेसतात. त्या याच साड्या असतात. 9 लाखांच्या या साडीसाठी आता बुकींगही झाले आहेत. महत्त्वाचं म्हणजे बुकींगशिवाय ही साडी तयार केली जात नाही. कारण त्यासाठी एका वर्षाहून अधिक महिन्यांचा कालावधी लागतो. बिग बॉस फेम अभिनेत्यासोबत घडला धक्कादायक प्रकार, कारची काच फोडून चोरट्याने केली बॅग पसार
या एका साडीच्या किंमतीत काय-काय होऊ शकतं?
लग्न अगदी साध्या पद्धतीने करूया, असं ठरवलं तर सर्वसामान्य घरातील अनेक लग्नसोहळे उरकू शकतात. भरपूर पाहुणे बोलवूया, लग्नाचा बार उडवून देऊया, असं म्हटलं तरी मध्यमवर्गीय घरातील किमान एक लग्नसोहळा तरी नक्कीच पार पडले. 9 लाखांमध्ये नववधूला नखांपासून केसांपर्यंत हॉलमार्क सोन्याने मढवता येईल. अहो एवढंच काय, एक सेव्हन सीटर गाडीसुद्धा खरेदी करता येईल. तुमचा विश्वास बसणार नाही पण मलेशिया, कंबोडिया, श्रीलंका, सिंगापूर, संयुक्त अरब अमीरात, फिलिपिन्स, युरोप, बुल्गारिया, हंगरी, रोमानिया, इंडोनेशिया, इत्यादींपैकी कोणत्याही देशात 9 लाखांमध्ये मनसोक्त फिरत येईल. तिकडचे चॉकोलेट्स, इतर खाऊ, कपडे भारतात घेऊन येता येतील. दरम्यान, असं असलं तरी 9 लाखांच्या या साडीचं सौंदर्य अक्षरश: डोळे दिपवणारं आहे, हे नाकारता येणार नाही.