मराठी बातम्या /बातम्या /religion /

Astro Tips: भाग्य उजळेल! सुपारीचे हे सोपे उपाय करून पहा, नोकरी-धंद्यात होईल प्रगती

Astro Tips: भाग्य उजळेल! सुपारीचे हे सोपे उपाय करून पहा, नोकरी-धंद्यात होईल प्रगती

सुपारीचे धार्मिक महत्त्व

सुपारीचे धार्मिक महत्त्व

ज्योतिष शास्त्रात पूजेव्यतिरिक्त सुपारीशी संबंधित काही विशेष उपायही सांगण्यात आले आहेत. वेगवेगळ्या अडचणींवर सुपारीचा जालीम उपाय केला जातो. त्यामुळे आपल्या नोकरी-धंद्यात प्रगती होते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Ramesh Patil

मुंबई, 23 नोव्हेंबर : भारतात सुपारीचा वापर फक्त खाण्यासाठीच नाही तर पूजेतही केला जातो. हिंदू धर्मात सुपारीचा उपयोग पूजा, यज्ञ, हवनात केला जातो. शास्त्रात सांगितले आहे की, विघ्नहर्ता गणेशाला सुपारी अतिशय प्रिय आहे. याशिवाय भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेमध्येही सुपारीचा वापर केला जातो. ज्योतिष शास्त्रात पूजेव्यतिरिक्त सुपारीशी संबंधित काही विशेष उपायही सांगण्यात आले आहेत. वेगवेगळ्या अडचणींवर सुपारीचा जालीम उपाय केला जातो. भोपाळचे ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा त्यांच्याबद्दल सांगत आहेत. जाणून घेऊया सुपारीशी संबंधित काही खास उपाय.

- पैसा मिळवण्यासाठी

ज्योतिष शास्त्रानुसार पूजेत वापरण्यात येणारी सुपारी कापडासोबत बांधून पूजा संपल्यानंतर घरातील संपत्तीच्या ठिकाणी ठेवावी. असे केल्याने घरात सुख-समृद्धी येते असे मानले जाते. यासोबतच घराचे वैभव आणि संपत्तीही वाढते.

व्यवसाय किंवा नोकरीत यश मिळवण्यासाठी

ज्योतिष शास्त्रात असे सांगितले आहे की, व्यवसाय किंवा नोकरीमध्ये यश मिळवण्यासाठी शनिवारी सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाची पूजा करा आणि तेथे एक रुपयाचे नाणे आणि एक सुपारी ठेवा. दुसऱ्या दिवशी पिंपळाच्या झाडाचे एक पान घेऊन त्यात ती सुपारी व नाणे बांधून आपल्या संपत्तीच्या ठिकाणी ठेवावे. असे केल्याने तुम्हाला व्यवसाय आणि नोकरीमध्ये यश मिळेल.

- अडलेली कामं पूर्ण करण्यासाठी

तुमचे कोणतेही काम अडकले असेल तर त्यासाठी दोन लवंगा आणि एक सुपारी पर्समध्ये ठेवा. महत्त्वाचे काम करताना यातील लवंग तोंडात धरा आणि नंतर मंदिरात सुपारी अर्पण करा. असे केल्याने कामातील अडथळे दूर होऊन कामे लवकर पूर्ण होतील.

घरातील नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी

जर एखाद्या व्यक्तीच्या घरात कौटुंबिक कलह असेल आणि घरातील सदस्यांमध्ये तणाव असेल तर अशा स्थितीत घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला चांदीच्या भांड्यात सुपारी ठेवा. लक्षात ठेवा की सुपारी अशा ठिकाणी ठेवावी, जिथे सूर्याची किरणे थेट त्यावर पडतील. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट होते, असे मानले जाते.

वाचा - हनुमानाची या रुपातील मूर्ती/फोटो घरात लावणं असतं शुभ; संकटांचा होतो नाश

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Astrology and horoscope, Religion, Vastu