जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / पंचमुखी रुद्राक्ष धारण केल्यानं लाभते सुख-समृद्धी, मनशांतीसह या गोष्टींची येईल अनुभूती

पंचमुखी रुद्राक्ष धारण केल्यानं लाभते सुख-समृद्धी, मनशांतीसह या गोष्टींची येईल अनुभूती

रुद्राक्षाचे फायदे

रुद्राक्षाचे फायदे

धार्मिक मान्यतेनुसार, रुद्राक्षाची निर्मिती ही भगवान शंकराच्या अश्रुंतून झाली. त्यामुळे रुद्राक्ष धारण करणं शुभ मानलं जातं. ज्योतिषशास्त्रात रुद्राक्षाचे अनेक प्रकार सांगितले गेले आहेत.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 23 नोव्हेंबर : ज्योतिषशास्त्रामध्ये पंचमुखी रुद्राक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यात अनेक प्रकारचे रुद्राक्ष आहेत. पंचमुखी रुद्राक्ष कधी धारणं करायला हवं, यापासून काय लाभ प्राप्त होऊ शकतो याबद्दल अनेक महत्त्वाच्या गोष्टी ज्योतिषशास्त्रात सांगितल्या गेल्या आहेत. ‘एनडीटीव्ही इंडिया हिंदी’नं या संदर्भात वृत्त दिलं आहे. स्वयं रुद्र असलेल्या रुद्राक्षाला ज्योतिषशास्त्रात महादेवाचा अंश आणि कलाग्निचे रूप असल्याचं मानलं गेलं आहे. धार्मिक मान्यतेनुसार, रुद्राक्षाची निर्मिती ही भगवान शंकराच्या अश्रुंतून झाली. त्यामुळे रुद्राक्ष धारण करणं शुभ मानलं जातं. ज्योतिषशास्त्रात रुद्राक्षाचे अनेक प्रकार सांगितले गेले आहेत. पंचमुखी रुद्राक्ष याचाच एक भाग आहे. विधिवत रुद्राक्ष धारण केल्यास भगवान गणेश, भगवान शिव, शक्ती (देवी), भगवान विष्णू आणि सूर्यदेव या पंचब्रह्माची विशेष कृपादृष्टी होते असंही मानलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार पंचमुखी रुद्राक्ष कधी धारण करावं, त्याचा काय लाभ होतो हे जाणून घेऊयात पंचमुखी रुद्राक्ष धारण करण्याचे फायदे ज्योतिषशास्त्रानुसार, विधिवत पंचमुखी रुद्राक्ष धारण केल्यास त्यापासून मनशांती लाभते. अनावश्यक गोष्टींमुळे मन विचलित होत नाही. रुद्राक्ष धारण केल्यानंतर अध्यात्मिक शक्ती प्राप्त करण्यासाठी मदत होते. धन आणि सुख-समृद्धी मिळावी म्हणून अनेक ज्योतिषी रुद्राक्ष धारण करण्याचा सल्ला देतात. विधिवत रुद्राक्ष धारण करणाऱ्या व्यक्तीस अकाली मृत्यूचं भय राहत नाही. एखाद्या सुरक्षाकवचाप्रमाणे रुद्राक्ष काम करत असल्याचंही अनेकजण मानतात. ज्योतिषशास्त्रानुसार, गुरु ग्रहाचा अशुभ प्रभाव टाळण्यासाठी पंचमुखी रुद्राक्ष धारण करणं शुभ असतं. वैवाहिक जीवनात समृद्धी आणण्यासाठी पंचमुखी रुद्राक्ष बराच फायदेशीर आहे. पंचमुखी रुद्राक्ष असा करा धारण पंचमुखी रुद्राक्षाला धारण करण्याच्या आधी त्यावर गंगाजल शिंपडावं. यानंतर 108 वेळा ‘ॐ ऱ्हीं नम:’ या मंत्राचा जप करावा. या प्रकारे पंचमुखी रुद्राक्ष धारण केल्यास अधिक लाभ होत असल्याचे मानलं गेलं आहे. पंचमुखी रुद्राक्षाचं महत्त्व सर्वाधिक आढळणाऱ्या पंचमुखी रुद्राक्षाच्या पृष्ठभागावर 5 नैसर्गिक रेषा असतात. याला रुद्राक्षाचं मुख म्हटलं गेलं आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या रुद्राक्षाचा अधिपती (देवता) भगवान कलाग्नि आहे. कलाग्नि भगवान शिवचंच एक रूप असल्याचं मानलं जातं. विधिवत रुद्राक्ष धारण करत नियम पाळल्यास वाईट कामांपासून ती व्यक्ती दूर राहते. दैवी शक्तीमुळे हे घडत असल्याचं म्हटलं गेलं आहे. रुद्राक्ष धारण करणारी व्यक्ती शुद्ध होते व त्याचं मनही शांत होतं. शिवाय यश, प्रसिद्धीही त्या व्यक्तीला मिळते.

    News18लोकमत
    News18लोकमत

    दरम्यान, उपलब्ध माहिती आणि मान्यतेनुसार, रुद्राक्ष धारणं करण्याचे फायदे सांगितले गेले आहेत. ज्योतिषशास्त्रावर विश्वास असणाऱ्या अनेक व्यक्ती रुद्राक्ष धारणंही करतात. प्रत्येकाला यातून सारखीच अनुभूती मिळेल हे सांगता येत नाही. शेवटी हा सर्व श्रद्धा आणि आस्थेचा विषय आहे. वाचा -  हनुमानाची या रुपातील मूर्ती/फोटो घरात लावणं असतं शुभ; संकटांचा होतो नाश (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: Religion , vastu
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात