Home /News /real-estate /

Pune Mhada : पुण्यात म्हाडाकडून 5 हजार घरांची सोडत, ऑनलाईन नोंदणी 'या' दिवशी सुरू होईल

Pune Mhada : पुण्यात म्हाडाकडून 5 हजार घरांची सोडत, ऑनलाईन नोंदणी 'या' दिवशी सुरू होईल

पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (pune mahada) घरांची सोडत काढली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. (Pune Housing and Area Development Board)

  पुणे, ०८ जून : पुणे शहर व परिसरात म्हाडाच्या 5 हजार 68 घरांची सोडत निघणार आहे. (pune mahada) याबाबत पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (mhada) घरांची सोडत काढली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. (Pune Housing and Area Development Board) दरम्यान उद्या (09) जूनपासून ऑनलाईन नोंदणी सुरू होणार आहे.  याबाबत म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने यांनी माहिती दिली. याचबरोबर म्हाडाने घर (mhada home) खरेदी करणाऱ्यांच्या उत्पन्न मर्यादेत बदल केला आहे. गृहनिर्माण विभागाने (Department of Housing) बुधवारी (25 मे) यासंदर्भातील आदेश जारी केला आहेत.

  5 हजार 68 घरांव्यतिरिक्त म्हाडाच्या विविध गृहनिर्माण योजनांतील शिल्लक राहिलेल्या 278, बांधकाम व्यावसायिकांकडून 20 टक्के कोट्यातून उपलब्ध झालेल्या 2 हजार 845 आणि म्हाडाच्या सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील 1 हजार 945 अशा सदनिकांचा समावेश असल्याचे माने यांनी सांगितले.

  हे ही वाचा : Google Pay वापरणाऱ्यांसाठी खुशखबर! मिळणार 9000 रुपयांचा कॅशबॅक, कसा ते जाणून घ्या

  या घरांच्या सोडतीत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. या ऑनलाईन नोंदणीचा शुभारंभ येत्या गुरुवारी (ता.9) दुपारी दोन वाजता मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते केला जाणार आहे. यावेळी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.

  म्हाडाकडून घर खरेदी करणाऱ्यांच्या उत्पन्न मर्यादेत बदल

  म्हाडाकडून घर खरेदी करणाऱ्यांच्या उत्पन्न मर्यादेत बदल केला आहे. गृहनिर्माण विभागाने बुधवारी (25 मे) यासंदर्भातील आदेश जारी केला आहे. उत्पन्न मर्यादेतील बदल मुंबई महानगर क्षेत्र (MMR), पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) तसेच 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांना हा नियम लागू असेल.

  हे ही वाचा : गेमसाठी अल्पवयीन मुलाने गोळ्या झाडून केली आईची हत्या; 3 दिवस मृतदेहाजवळ बसून केलं हे काम

  अत्यल्प उत्पन्न गटासाठी ही मर्यादा आता वार्षिक 6 लाख रुपये असणार आहे तर अल्प उत्पन्न गटासाठी 6 ते 9 लाख रुपये, मध्यम गटासाठी 9 ते 12 लाख आणि उच्च गटासाठी 12 ते 18 रुपये प्रतिवर्ष असणार आहे. उत्पन्नानुसार सोडतीमध्ये घरांचे मंजूर झालेले क्षेत्रही बदलण्यात आले आहे. नवीन बदलेल्या क्षेत्रानुसार अतिशय लहान गटातील घरांसाठी 30 चौरस मीटर क्षेत्रफळ, लहान गटाच्या घरांसाठी 60 चौरस मीटर, मध्यम गटाच्या घरांसाठी 160 चौरस मीटर आणि उच्च गटासाठी 200 चौरस मीटर क्षेत्रफळ देण्यात येणार आहे.

  म्हाडाच्या सोडतीत अत्यल्प, निम्न मध्यम आणि उच्च उत्पन्न गट आहेत. या उत्पन्न गटासाठी विशिष्ट उत्पन्न मर्यादाही देण्यात आल्या आहेत. उत्पन्न मर्यादेनुसार अर्जदाराला अर्ज भरणे अत्यंत आवश्यक आहे. या उत्पन्न मर्यादेनुसार अर्जदाराला सोडतीत घरासाठी अर्ज भरावा लागतो.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Ajit pawar, Mhada 2022, Mhada lottery, Pune, Pune (City/Town/Village)

  पुढील बातम्या