जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / गेमसाठी अल्पवयीन मुलाने गोळ्या झाडून केली आईची हत्या; 3 दिवस मृतदेहाजवळ बसून केलं हे काम

गेमसाठी अल्पवयीन मुलाने गोळ्या झाडून केली आईची हत्या; 3 दिवस मृतदेहाजवळ बसून केलं हे काम

गेमसाठी अल्पवयीन मुलाने गोळ्या झाडून केली आईची हत्या; 3 दिवस मृतदेहाजवळ बसून केलं हे काम

या मुलाने आपल्या लहान बहिणीला एका खोलीत बंद केलं होतं. त्यानंतर मृतदेहातून दुर्गंधी येऊ लागताच आरोपीने हत्येची खोटी कथा रचून पोलिसांना माहिती दिली.

  • -MIN READ
  • Last Updated :

लखनऊ 08 जून : आजकाल अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या हातामध्ये आपल्याला मोबाईल पाहायला मिळतो. लोकांना मोबाईल वापरण्याची इतकी सवय झाली आहे की अनेकदा यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. सध्या असंच एक धक्कादायक प्रकरण उत्तर प्रदेशातील लखनऊमधून समोर आलं आहे. यात 16 वर्षीय मुलाने आपल्या आईची गोळ्या झाडून हत्या केली (Minor Son Killed Mother). त्यानंतर मृतदेह तीन दिवस घरात लपवून ठेवला. या मुलाने आपल्या लहान बहिणीला एका खोलीत बंद केलं होते. त्यानंतर मृतदेहातून दुर्गंधी येऊ लागताच आरोपीने हत्येची खोटी कथा रचून पोलिसांना माहिती दिली. अखेर चौकशीत हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. Nanded : मुलीच्या उपचारासाठी नव्हते पैसे, पित्याने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल ही घटना लखनऊच्या पीजीआय भागातील आहे. साधना (वय ४० वर्षे) या अल्डिको कॉलनीत १६ वर्षांचा मुलगा आणि १० वर्षांच्या मुलीसोबत राहत होत्या. साधनाचा नवरा कोलकाता येथे राहतो. ते लष्करी अधिकारी आहेत. साधना यांच्या मुलाला PUBG गेम खेळण्याचं व्यसन असल्याचं सांगण्यात आलं. गेम खेळण्यापासून रोखण्यास तो घरी भांडण करू लागला. ही गोष्ट त्याच्या आईला आवडली नाही. ती या गोष्टीसाठी सतत त्याला बोलत असत. रविवारी आईने पुन्हा एकदा PUBG गेम खेळणं बंद करायला सांगितल्याने रागाच्या भरात मुलाने वडिलांचा परवाना असलेला पिस्तूल उचलला आणि थेट आईच्या डोक्यात गोळी झाडली. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. यानंतर त्याने रिव्हॉल्व्हर बेडवरच टाकली. मग आरोपीने लहान बहिणीला धमकावून दुसऱ्या खोलीत बंद केलं. Yawatmal : पतीच्या निधनानंतर पत्नीला आले नैराश्य, 9 महिन्याच्या मुलीसह उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल तीन दिवसांपासून मुलगा घरात आईच्या मृतदेहासोबत राहत होता, असं पोलिसांचं म्हणणं आहे. मृतदेहाचा वास येऊ लागताच तो त्यावर रूम फ्रेशनर टाकत राहिला. मंगळवारी सायंकाळी उशिरा दुर्गंधी वाढल्याने मुलाने वडिलांना फोन करून आईच्या हत्येची माहिती दिली. त्यानंतर वडिलांनी तत्काळ पोलिसांना फोन करून माहिती दिली. पोलिसांनी सांगितलं की, मुलाकडून घटनेची माहिती घेतल्यानंतर त्याने पोलिसांची दिशाभूल केली आणि इलेक्ट्रीशियन घरी आल्याचं सांगितलं. त्यानेच आईची हत्या केली आहे, असंही तो म्हणाला. मात्र, अडीच तासांच्या तपासात संपूर्ण सत्य बाहेर आलं आणि पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतलं. आरोपी मुलाचे वडील लष्करात अधिकारी आहेत. पोलिसांनी सांगितलं की, आई अनेकदा या मुलाला मोबाईलवर गेम खेळण्यास नकार देत होती, त्यामुळे रविवारी रात्रीच अल्पवयीन मुलाने आईची गोळ्या झाडून हत्या केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात