मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

Google Pay वापरणाऱ्यांसाठी खुशखबर! मिळणार 9000 रुपयांचा कॅशबॅक, कसा ते जाणून घ्या

Google Pay वापरणाऱ्यांसाठी खुशखबर! मिळणार 9000 रुपयांचा कॅशबॅक, कसा ते जाणून घ्या

GPay App Cashback Offer: यासाठी, तुम्हाला तुमचा रेफरल कोड प्रथमच Google Pay वापरणाऱ्या कोणत्याही वापरकर्त्यासोबत शेअर करायचा आहे.

GPay App Cashback Offer: यासाठी, तुम्हाला तुमचा रेफरल कोड प्रथमच Google Pay वापरणाऱ्या कोणत्याही वापरकर्त्यासोबत शेअर करायचा आहे.

GPay App Cashback Offer: यासाठी, तुम्हाला तुमचा रेफरल कोड प्रथमच Google Pay वापरणाऱ्या कोणत्याही वापरकर्त्यासोबत शेअर करायचा आहे.

मुंबई, 7 जून : ऑनलाइन व्यवहारांना सध्या खूप मोठी गती मिळालेली आहे. फोन-पे, जी-पे, भीम अशा यूपीआय अ‍ॅप्समुळे (UPI) फोनवरून झटपट व्यवहार करणं सोपं झालं आहे. यासाठी कॅश जवळ बाळगण्याची गरज नाही. त्यामुळे यूपीआयद्वारे व्यवहार करून केली जाणारी खरेदी-विक्री वाढली आहे. सध्या मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या यूपीआय अ‍ॅप्सपैकी गुगल पे (Gpay) हे सर्वांत लोकप्रिय अ‍ॅप आहे. गुगल त्यांच्या जी-पे ग्राहकांसाठी वेळोवेळी सवलती, कॅशबॅक (Cashback) अशा योजना आणत असते. गुगलची ग्राहकांसाठी अशीच एक कॅशबॅक योजना सध्या सुरू आहे. त्यात थोड्याथोडक्या नाही, तर तब्बल 201 रुपयांची कॅशबॅक ग्राहकांना मिळेल. ती योजना काय आहे, हे जाणून घेऊ या. याबाबतचं वृत्त 'झी न्यूज हिंदी'ने प्रसिद्ध केलं आहे. गुगलकडून कॅशबॅक मिळवण्यासाठी तुमचा रेफरल कोड (Referral code) पहिल्यांदा जी-पे वापरणाऱ्याला तुम्ही शेअर करायचा आहे. म्हणजेच गुगल पेचा नवा ग्राहक असलेल्या व्यक्तीला तुम्ही रेफरल कोड द्यायचा आहे. त्या लिंकद्वारे ती व्यक्ती गुगल पे डाउनलोड करील. मग त्याचं बँक खातं गुगल पेसोबत लिंक करील. त्यानंतर जेव्हा ती व्यक्ती कोणालाही त्याच्या गुगल पे अकाउंटवरून कमीत कमी एक रुपया पाठवील, तेव्हा तुमच्या खात्यात 201 रुपयांची कॅशबॅक जमा होईल. हे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतील. तसंच तुम्ही रेफरल कोड पाठवलेल्या व्यक्तीलाही 21 रुपयांची कॅशबॅक मिळेल. ते पैसेसुद्धा त्या व्यक्तीच्या थेट बँक खात्यातच जमा होतील. तुमचं 'ड्रीम होम' स्वस्त होणार? साधारण किती पैसे वाचतील? ग्राहकांना सोयीचं व्हावं म्हणून आता गुगलनं त्यांच्या डिजिटल पेमेंटमध्ये हिंग्लिश (Hinglish) ही आणखी एक भाषा समाविष्ट केली आहे. त्याबाबत भारतात एका कार्यक्रमात गुगलनं घोषणा केली होती. आता त्याची अंमलबजावणी झाली आहे. हिंग्लिशसोबत गुगल पेमध्ये इंग्लिश, हिंदी, मराठी, बंगाली, गुजराती, कन्नड, तमीळ आणि तेलुगू या भाषाही वापरता येतात. गुगल पेद्वारे एका वर्षात जास्तीत जास्त 9000 रुपयांची कॅशबॅक एखाद्या ग्राहकाला मिळू शकते. एखाद्या व्यक्तीनं एका वर्षात जवळपास 45 जणांना रेफरल कोड दिला आणि त्यांनी तो वापरला, तर त्या व्यक्तीला 9000 रुपयांची कॅशबॅक मिळू शकते. त्यापेक्षा जास्त वेळा रेफरल कोड वापरले गेले, तरी मिळणारी कॅशबॅक मात्र वाढणार नाही. गुगल पेवरून अनेक ग्राहक कॅशबॅक व काही सवलतींचा आनंद घेत असतात. अधिकाधिक ग्राहकांना जोडून घेण्यासाठी गुगलने रेफरल कोडला 201 रुपयांच्या कॅशबॅकची ऑफर ठेवली आहे. त्यात ग्राहकांचाही फायदा होईल. डिजिटल व्यवहारांमुळे एकीकडे गैरव्यवहारांचा धोका वाढलेला असताना अनेक कंपन्या ग्राहकांना त्यांच्याकडे ओढण्यासाठी विविध योजना आणत आहेत. डिजिटल माध्यमांमधून व्यवहार करताना योग्य खबरदारी बाळगणं गरजेचं आहे.
First published:

पुढील बातम्या