Home /News /real-estate /

स्वप्नातलं घर खरेदी करण्याची आहे योग्य वेळ, गृहकर्जावर कमी व्याज ते सरकारी योजनांपर्यंत ही आहेत महत्त्वाची कारणं

स्वप्नातलं घर खरेदी करण्याची आहे योग्य वेळ, गृहकर्जावर कमी व्याज ते सरकारी योजनांपर्यंत ही आहेत महत्त्वाची कारणं

कोरोना काळात स्वत:चं घर असण्याकडे अनेकांचा कल वाढला आहे. जाणून घ्या सध्या घर खरेदी करण्याची योग्य वेळ का आहे?

    भारतीय अर्थव्यवस्थेत योगदान देण्यात दुसऱ्या क्रमांकावर रिअल इस्टेट क्षेत्र असून यात मोठी गुंतवणूक होते तसंच याच्याशी संबंधित अनेक क्षेत्र असल्याने रोजगार निर्माण होण्याबरोबरच अनेक फायदेही अर्थव्यवस्थेला होतात. त्यातही या क्षेत्रात संपत्ती किंवा मालमत्ता खरेदी करताना घर खरेदी करायला भारतीय लोक प्राधान्य देतात. लोकांनी घरं विकत घ्यावी यासाठी सरकार गेल्या काही वर्षांपासून अनेक प्रयत्न करत आहे त्यासाठी विविध योजनाही राबवत आहे. सरकारने केलेल्या काही नियमांमुळे घरांची मागणी आणि पुरवठा यामध्ये तोल सांभाळला गेला आहे. ग्राहकांना वरचढ ठरणाऱ्या डेव्हलपर्सना हे नियम बंधनकारक झाल्यामुळे ग्राहकांसाठी ते फायद्याचं ठरलं आहे. रिअल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट अक्ट, इनसॉल्व्हन्सी अँड बँकरप्सी कोड तसंच प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) यांची अंमलबजावणी झाल्यामुळे ग्रामीण तसंच शहरी भागांत नियमन करणाऱ्या संस्थांना बळकटी मिळाली आहे. गेल्या तीन चार वर्षांत तयार फ्लॅट पडून असल्याने छोट्या आणि मध्यम डेव्हलपर्सना लिक्विडिटीचा प्रश्न सतावतो आहे. पण अडकून पडलेली प्रोजेक्ट्स पूर्ण करण्यासाठी पैसे उपलब्ध करून देण्यासाठी मार्गही काढले जात आहेत. कोविड-19 मुळे या क्षेत्राला फटका बसला असला तरीही 2020 च्या शेवटी नवे प्रकल्प लाँच व्हायला लागले आणि आताच्या घडीला पाहिलं तर 2016 ते 2018 मध्ये लाँच झालेल्या सरासरी प्रकल्पांपर्यंत या वर्षी लाँच होणाऱ्या प्रकल्पांची संख्या पोहोचेल असं दिसतंय. या क्षेत्रात गुंतवणूक करण्याची म्हणजे घरखरेदीची हीच योग्य वेळ आहे त्याची काही कारणं आम्ही खाली देत आहोत. हे वाचा-स्वतःचं घर खरेदी करण्याचा विचार? मग हीच योग्य वेळ; 5 मुद्द्यांमध्ये घ्या जाणून सरकारने 2016 मध्ये लागू केलेल्या रेरा (RERA) कायद्यामुळे बांधकाम प्रकल्पाचा दर्जा, त्याला होणारा अर्थ पुरवठा, प्रकल्पाची वेळेत पूर्तता करणं यासंबंधी एक निश्चित प्रक्रिया तयार झाली आहे. बिल्डरना वेळेत घर देणं बंधनकारक झालं आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंचा विश्वास वाढला. याचा परिणाम असा झाला आहे की बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप व ओमिडेअर नेटवर्कने केलेल्या सर्वेक्षणात 70 टक्के ग्राहकांनी रेरा कायदा नियमकामची भूमिका बजावत असल्याचं माहीत आहे असं सांगितलं असून 76 टक्के ग्राहकांनी रेरा रजिस्टर्ड बिल्डरकडूनच घर खरेदी करणार असल्याचं सांगितलं आहे. दुसरीकडे रेरा कायद्यामुळे निर्माण झालेल्या पारदर्शकतेबद्दल 64 टक्के डेव्हलपरही समाधानी आहेत. अफोर्डेबल हाउसिंग म्हणजेच परवडणारी घरं बांधण्यासाठी सरकारने दिलेला जोरही घराच्या किमती ग्राहकांच्या आवाक्यात येण्यासाठी कारणीभूत ठरला आहे. सरकारने आपल्या योजनेअतंर्गत गृह कर्जातील व्याजदर कमी केले, अनुदान दिलं, डेव्हलपर्सनाही करात सवलत दिली आहे. त्यामुळेच डेव्हलपरही अशा प्रकारची घरं बांधत आहेत आणि ग्राहकांना या योजनेमुळे कमी किमतीत घरं मिळत आहेत. गेल्या पाच वर्षांत देशातल्या मोठ्या शहरांत तयार असलेली घरं, नियमांत झालेले बदल आणि डेव्हलपरना मिळालेली कर सवलत या घटकांनी लोकांना परवडणारी घरं उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळेच ग्राहकांची मानसिकता बदलली असून या वर्षाच्या म्हणजे 2021 शेवटापर्यंत अफोर्डेबल हाउसिंगचे नवे प्रकल्प लाँच होतीलच पण काही मायक्रो मार्केट्समध्ये रिअल इस्टेट क्षेत्राला चालना मिळेल असा अंदाज आहे. हे वाचा-कमी उत्पन्न असेल तरी नो टेन्शन! पूर्ण करता येईल स्वत:च्या घराचं स्वप्न एकाएकी बांधून तयार (Ready to Move) असलेल्या घरांची मागणी वाढली आहे. त्यामुळे मोठ्या शहरांत पडून असलेल्या घरांची संख्या कमी झाली आहे. हा ट्रेंड वाढण्याची शक्यता आहे. डेव्हलपर्सही पैसे भरण्यासाठी ग्राहकांच्या सोयीचे म्हणजे ईएमआय सारखे पर्याय उपलब्ध करून देत आहेत. तसंच बांधकाम सुरू असताना बुकिंग केलं तर 4 ते 7 टक्के डिस्काउंटही देत आहेत. गृहकर्जांचे सध्याचे व्याज दर हे गेल्या दशकातील सर्वांत कमी आहेत. आता 30 लाख रुपयांचं किंवा त्यापेक्षा कमीचं गृह कर्ज घेतलं तर त्यावर 6.75 टक्के व्याज दर आहे. एसबीआयने प्रोसेसिंग फी माफ केली आहे. घर भाड्याने घेण्यापेक्षा घर विकत घेणं परवडणारं झाल्यामुळेही घरखरेदीचं प्रमाण वाढलं आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकात सरकारने घरखरेदीवरी स्टँप ड्युटी कमी केली आहे आणि पश्चिम बंगालनेही स्टँप ड्युटी आणि सर्कल रेट कमी केले आहेत. यामुळेही घर खरेदी वाढली आहे. स्टँट ड्युटी आणि सर्कल रेट मिळून खरेदीच्या 20 टक्के द्यावा लागत होता तो कमी झाल्यामुळे सोयीचं झालं आहे. हे वाचा-स्वप्नातलं घर खरेदी करताय? कागदपत्रांसदर्भात अजिबात विसरू नका या 5 गोष्टी वर्क फ्रॉम होम सुरू झाल्यामुळे अनेकांना मोठं आणि पर्यावरणपूरक घर असावं अशी निकड भासू लागली आहे. त्यामुळेही घरखरेदी वाढली आहे. प्लॉटेड व्हिला आणि बंगले खरेदी करण्याचा ट्रेडही सध्या वाढला आहे. बेंगळुरूतलं व्हाइटफिल्ड, दिल्ली एनसीआरमधलं गुरुग्राम, अहमदाबादेतलं शिलाज, कोलकात्यातलं जोका या ठिकाणी बंगले खरेदी करण्यासाठी मिलेनियल्स खूप मोठ्या प्रमाणात उत्सुक आहेत. मिलेनियल्सना परवडणारी घरं मिळत असल्यामुळे ते लहानवयातच घर खरेदी करत आहेत. लहान मुलांना स्टडीसाठी घरातच वेगळी जागा उपलब्ध करून देण्यासारख्या युक्त्या आता डेव्हलपर आपल्या प्रोजक्टमध्ये वापरत आहेत. त्यामुळे वर्क फ्रॉम होम आणि मुलांची स्टडी रूम यासारख्या महत्त्वाच्या गोष्टींसाठीही लोक नवं आणि मोठं घर खरेदी करत आहेत. कोविडमुळे मोठी घरं असण्याची गरज अधोरेखित झाली आहे. त्यामुळे शहरांतील घरांचा एरिया मोठा असावा अशी अपेक्षा ग्राहक व्यक्त करत आहेत. एकूण काय तर घर खरेदीसंबंधीच्या नव्या नियमांमुळे या व्यवहारात एक पारदर्शकता आली असून घरखरेदी करणारे ग्राहक आता मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. अर्थ पुरवठा कमी झाल्यामुळे बंद पडलेल्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी सरकारने सुरू केलेली स्वामिह(Special Window for Affordable and Mid Income Housing (SWAMIH) Fund) योजनेची अंमलबजावणी फायदेशीर ठरत आहे. याचा फायदा एकूणात रिअल इस्टेट क्षेत्राला होत आहे. हे वाचा-घर घेणाऱ्यांमध्ये वाढतेय Millennialsची संख्या,तुमचाही विचार आहे तर वाचा या टिप्स थोडक्यात सांगायचं तर सध्या घर विक्री-खरेदी क्षेत्रात सध्या ग्राहकांना उत्तम संधी आहे. त्यामुळे जर तुम्ही आता किंवा नजीकच्या भविष्यात घर खरेदी करू इच्छित असाल तर ही सर्वोत्तम वेळ आहे. आमचा असा सल्ला आहे की ज्यांना घर घ्यायचं आहे त्यांनी या काळात घरात गुंतवणूक करावी. तरीही ग्राहकांने डेव्हलपरची सगळी माहिती घेऊन आपल्या आर्थिक स्रोतांचं नियोजन करूनच गुंतवणूक करावी असंही आम्ही सुचवतो आहोत. (या लेखाच्या लेखिका शालिन रैना या C & W रेसिडेंशियल सर्व्हिसेसच्या मॅनेजिंग डायरेक्टर आहेत.)
    First published:

    Tags: Home Loan, Home-decor

    पुढील बातम्या