घर घेणाऱ्यांमध्ये वाढतेय Millennials ची संख्या, तुम्हीही विचार करताय तर फॉलो करा या 5 टिप्स

घर घेणाऱ्यांमध्ये वाढतेय Millennials ची संख्या, तुम्हीही विचार करताय तर फॉलो करा या 5 टिप्स

छोट्या गावांमधून शहरात आलेले नोकरदार सुरुवातीला भाड्याने घर (House on rent) शोधतात, तर काही काळानंतर जेव्हा नोकरीत जम बसतो, तेव्हा शहरातच एखादं घर (buy house in city) घेण्याचा विचार करतात. अ

  • Share this:

मुंबई, 12ऑगस्ट: कामाच्या किंवा शिक्षणाच्या निमित्ताने मोठ्या शहरांमध्ये जावं लागणं ही आताच्या तरुण पिढीसाठी सामान्य बाब झाली आहे. छोट्या गावांमधून आलेले हे नोकरदार सुरुवातीला भाड्याने घर (House on rent) शोधतात, तर काही काळानंतर जेव्हा नोकरीत जम बसतो, तेव्हा शहरातच एखादं घर (buy house in city) घेण्याचा विचार करतात. असं करणाऱ्यांमध्ये सध्या मिलेनियल्सची (Working millennials in India) संख्या सर्वाधिक आहे. सध्या देशातील एकूण काम करणाऱ्या लोकसंख्येमध्ये 47 टक्के मिलेनियल्स आहेत.

मिलेनियल्स (Millennials) किंवा जनरेशन वाय (Generation Y) म्हणजे 1982 ते 2000 दरम्यान जन्मलेले लोक. सध्या भारतात या वयोगटातील लोकांची संख्या सर्वाधिक आहे. तसेच, याच वयोगटातील लोक आता शिक्षण वगैरे पूर्ण करुन नोकरीत जम बसवत आहेत. पर्यायाने त्यांचं उत्पन्नही वाढत असल्याचं डेलॉइटच्या (Deloitte) एका अहवालात समोर आलं आहे. त्यामुळेच कित्येक मिलेनियल्स सध्या मोठ्या शहरांमध्ये वास्तव्य करण्याच्या दृष्टीने विचार (Buy house in city) करत आहेत. तुम्हीदेखील असंच मोठ्या शहरात किंवा नोकरीच्या ठिकाणी घर घेण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला याबाबत काही टिप्स (House buying tips) सांगणार आहोत.

हे वाचा-याच आर्थिक वर्षात दोन सरकारी कंपन्या होणार खाजगी, काय आहे सरकारची योजना?

मिलेनियल्स एखादी गोष्ट करताना त्याबाबत संपूर्ण माहिती घेऊन, रिसर्च करुन मगच त्याबाबत निर्णय घेतात. तसेच, टेक्नॉलॉजी आणि डिजिटल मीडिया अशा गोष्टींमध्येही ते एक्सपर्ट आहेत. हे सगळं लक्षात घेऊनच आम्ही तुम्हाला घर घेताना (House buying tips for millennials) कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावं याच्या टिप्स देत आहोत.

1. घर घेताना तुम्ही एक मोठी रक्कम मोजत असता. शिवाय दिवसभरातील जवळपास एक तृतीयांश वेळ तुम्ही घरात असता. शिवाय, कदाचित तुमची पुढची पिढीही त्याच घरात राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचं घर हे बऱ्यापैकी मॉडर्न (buy modern house) असेल याकडे लक्ष द्या.

2. यासोबतच घर हे सुशोभित करणंही गरजेचं आहे. एक मिलेनियल असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे की टेक्नॉलॉजी आज किती महत्त्वाची झाली आहे. त्यामुळे घर घेताना स्मार्ट लिव्हिंगच्या (Affordable smart living) दृष्टिकोनातून घ्या. जर सोसायटीमध्ये घर घेत असाल, तर तिथे सर्व अद्ययावत सुविधा आहेत की नाही हे आवर्जून पाहा.

हे वाचा-दरमहा EPF मध्ये पैसे जमा होत असतील मिळू शकेल 1.5 कोटींपेक्षा अधिकचा फायदा

3. सोसायटीमध्ये घर घेत असाल, तर शेजारी लोक कसे आहेत हेदेखील पाहणं गरजेचं असतं. शिवाय भाड्याने घर घेत असाल, तर घरमालक जवळच राहतो, की दूर हादेखील भाग विचारात घेणे गरजेचे आहे.

4. सोसायटीमध्ये सुरक्षा व्यवस्था (Sound security system) कशी आहे हेदेखील तपासणे गरजेचे आहे. अधिक चांगली सुरक्षा व्यवस्था पुरवणाऱ्या ठिकाणी राहणं कधीही फायद्याचं ठरतं.

5. यासोबतच, तुमचे घर हे ऑफिसपासून, आणि थिएटर किंवा पार्क अशा स्थळांपासून किती दूर (Buy house near office) आहे याचाही विचार करणे गरजेचे आहे.

First published: August 12, 2021, 7:15 AM IST
Tags:

ताज्या बातम्या