मराठी बातम्या /बातम्या /real-estate /

Real Estate: स्वप्नातलं घर खरेदी करताय? कागदपत्रांसदर्भात अजिबात विसरू नका या 5 गोष्टी

Real Estate: स्वप्नातलं घर खरेदी करताय? कागदपत्रांसदर्भात अजिबात विसरू नका या 5 गोष्टी

घर घेतल्यानंतरही पुढे बरीच प्रक्रिया (Documentation after buying home) करावी लागते. जाणून घ्या महत्त्वाच्या पाच गोष्टी ज्या तुम्हाला कागदपत्रासंदर्भातील प्रक्रिया सोपी करण्यास मदत करतील

घर घेतल्यानंतरही पुढे बरीच प्रक्रिया (Documentation after buying home) करावी लागते. जाणून घ्या महत्त्वाच्या पाच गोष्टी ज्या तुम्हाला कागदपत्रासंदर्भातील प्रक्रिया सोपी करण्यास मदत करतील

घर घेतल्यानंतरही पुढे बरीच प्रक्रिया (Documentation after buying home) करावी लागते. जाणून घ्या महत्त्वाच्या पाच गोष्टी ज्या तुम्हाला कागदपत्रासंदर्भातील प्रक्रिया सोपी करण्यास मदत करतील

नवी दिल्ली, 04 ऑगस्ट: आपल्या मालकीचं घर असावं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कित्येकांना आपल्या आयुष्यभराची मिळकत खर्च करावी लागते. कित्येक लोक स्वतःचं घर बांधून घेतात, तर काही लोक तयार घरं विकत घेतात. घर बांधायचं झालं, तर त्याला बरीच प्रक्रिया (home buying process) करावी लागते हे आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे एखाद्या सोसायटीमधील फ्लॅट, डेव्हलपरने बांधलेला बंगला, किंवा आधीच कोणी राहत असलेले घर आयतं विकत घेण्याकडे लोकांचा कल असतो. ही प्रक्रिया तुलनेने सोपी असली, तरी असं घर घेतल्यानंतरही पुढे बरीच प्रक्रिया (Documentation after buying home) करावी लागते. मनीकंट्रोल यायाबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

प्रॉपर्टींच्या कागदपत्रांची एक फाइल बनवा

रियल इस्टेट व्यवहारांसंबधी सल्लागार आणि वकील हर्ष पाठक सांगतात, की कोणतेही घर किंवा प्रॉपर्टी विकत घेतल्यानंतर त्यासंबंधी सर्व कागदपत्रांची एक फाईल करुन ठेवणं आवश्यक आहे. रजिस्ट्रेशन पेपर्स, सेल डीड (Sale Deed), जमिनीचे रेकॉर्ड्स (name in the land records) म्हणजे सातबाराचा उतारा, बँकेच्या कर्जाची कागदपत्रं, कर्ज ज्या खात्यामध्ये आहे त्याची माहिती, बिल्डर-बायर अग्रीमेंट (builder-buyer agreement) आणि अशा बऱ्याच गोष्टींची कागदपत्रे नीट एकत्र ठेवणं आवश्यक आहे. यासोबतच, या सर्वाची स्टॅम्प ड्यूटी (stamp duty) दिली गेली आहे का हेदेखील तपासणं गरजेचं आहे. स्टॅम्प ड्यूटी दिली गेली नसेल, तर भविष्यात स्टॅम्प डिपार्टमेंटकडून रिकव्हरी नोटीस (recovery notice) येऊ शकते.

हे वाचा-Gold Price Today: खूशखबर! सोन्याच्या किंमतीत घसरण, ₹8200 ने स्वस्त मिळतंय सोनं

कागदपत्रांची True Copy जवळ ठेवा

बऱ्याच वेळा घर घेण्यासाठी आपण कर्ज घेतलेले असते. अशा वेळी बँका सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स त्यांच्या ताब्यात ठेवतात. यापूर्वी सर्व कागदपत्रांची ‘ट्रू कॉपी’ (True copy) करुन ठेवणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही तुमच्या कागदपत्रांच्या झेरॉक्स (Photo Copy) प्रती घेऊन ती मॅजिस्ट्रेट किंवा नोटरीच्या शिक्क्याने ‘ट्रू कॉपी’ (How to make true copy of documents) करुन घेऊ शकता किंवा मग ज्या ठिकाणी सेल डीड रजिस्टर (Register sale deed) करण्यात आलं आहे, त्या सब-रजिस्ट्रार कडून कागदपत्रांची कॉपी मिळवू शकता. केवळ घराचीच नाही, तर कर्ज आणि इतर संबंधित गोष्टींच्या कागदपत्रांचीही फोटोकॉपी ठेवणं गरजेचे असल्याची माहिती सार्थक अडव्होकेट्स अँड सॉलिलिटर्सच्या संतोष पांडे यांनी दिली.

घराच्या नोंदणीबाबत महत्त्वाचे

जर तुम्ही असे घर घेत असाल, जे आधीच दुसऱ्यांच्या नावावर आहे तर तुम्हाला तातडीने त्या प्रॉपर्टीचे म्युटेशन (Property mutation process) करणं गरजेचे आहे. म्हणजेच, महापालिकेच्या लँड रेव्हेन्यू रेकॉर्ड्समध्ये जुन्या मालकाऐवजी तुमच्या नावाची नोंदणी करणं. सेल टायटल डीड (Sale title deed) रजिस्टर झाल्यानंतर झाल्यानंतर ही प्रक्रिया करायची असते. तुमची प्रॉपर्टी महापालिकेच्या हद्दीत येते की नाही यावर हे अवलंबून असते. तसेच, प्रत्येक राज्यामध्ये याचे नियम (Property mutation rules) आणि प्रक्रिया थोड्याफार फरकाने वेगळी असते.जमिन जर शेतीसाठीची असेल तर त्यासंबंधी काही राज्यांत नियम आहेत त्यामुळे घर बांधण्यासाठी ती नॉन-अग्रिकल्चर करणं गरजेचं असतं. अन्यथा दंडही होऊ शकतो. म्युटेशन करणं अगदीच अनिवार्य नसलं, तरी म्युटेशन करुन (Property mutation charges) घेण्याचा सल्ला हर्ष पाठक देतात. त्यांनी सांगितले, की तुमची प्रॉपर्टी पुढे तुम्हाला विकायची (property mutation must for reselling) असेल, तर म्युटेशन केलेलं असणं आवश्यक आहे. त्याशिवाय तुम्हाला तुमचं घर किंवा प्रॉपर्टी विकता येत नाही.

हे वाचा-IRCTC ची जबरदस्त ऑफर! लेह लडाखसह या 7 सुंदर ठिकाणी द्या भेट, वाचा काय आहे पॅकेज?

पाणी-वीज कनेक्शन संदर्भात करा चौकशी

यासोबतच, महापालिकेमध्ये किंवा स्थानिक प्रशासनाकडे जाऊन पाणी, लाईट आणि गॅस अशा कनेक्शन्सची (Municipal supplies registration) कागदपत्रं आपल्या नावावर करुन घेणं आवश्यक आहे. तसंच, सोसायटीमध्ये फ्लॅट विकत घेत असाल, तर संबंधित रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशनशी (RWA) संपर्क साधणे आवश्यक आहे.

प्रॉपर्टी विकत घेतल्यानंतर ही बाब महत्त्वाची

हर्ष पाठक सांगतात, की नवी प्रॉपर्टी विकत घेतल्यानंतर आपलं मृत्यूपत्र (Will) तयार करणे; किंवा आहे त्या मृत्यूपत्रात बदल करुन घेणे आवश्यक आहे. मृत्यूपत्र नसेल तर त्या संपत्तीवरुन पुढे कुटुंबात मोठे वाद होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्या पश्चात आपल्या संपत्तीचं काय करावं, हे आधीच ठरवणं आवश्यक आहे. यासोबतच, आपले बँक रेकॉर्ड, आधार कार्ड आणि इतर आवश्यक ठिकाणी आपला नवा पत्ता अपडेट करणं गरजेचं आहे. तसेच, आपली होम लोन लाएबिलिटी कव्हर करणारी एखादी इन्शुरन्स पॉलिसी घेणंही उत्तम असल्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.

First published:

Tags: Home Loan, Real estate bill