Home /News /money /

कमी उत्पन्न असेल तरी नो टेन्शन! पूर्ण करता येईल स्वत:च्या घराचं स्वप्न, ICICI बँक देतेय संधी

कमी उत्पन्न असेल तरी नो टेन्शन! पूर्ण करता येईल स्वत:च्या घराचं स्वप्न, ICICI बँक देतेय संधी

घर घेण्याचं स्वप्न असणाऱ्यांसाठी आयसीआयसीआय बँकेने (ICICI) एक खूशखबर दिली आहे. तुम्ही कमी उत्पन्न असेल तर स्वत:च्या घराचं स्वप्न पूर्ण करू शकता. आयसीआयसीआय होम फायनान्सने (ICICI Home Finance) एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे.

    मुंबई, 15 ऑगस्ट: घर घेण्याचं स्वप्न असणाऱ्यांसाठी आयसीआयसीआय बँकेने (ICICI) एक खूशखबर दिली आहे. तुम्ही कमी उत्पन्न असेल तर स्वत:च्या घराचं स्वप्न पूर्ण करू शकता. आयसीआयसीआय होम फायनान्सने (ICICI Home Finance) कामगार आणि मजुरांना गृहकर्ज (Home Loan) देण्यासाठी एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे. याअंतर्गत छोटे कामगार, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, शिंपी, पेंटर, ऑटो मेकॅनिक, ऑटो-टॅक्सी ड्रायव्हर इ. कमी उत्पन्न असणारे सहजगत्या कर्ज मिळवू शकतात. या सुविधेचं नाव ऑन-द-स्पॉट सरल होम लोन (On the Spot Saral Home Loan by ICICI Bank) असं आहे. या योजनेत कर्ज घेणाऱ्यांना फक्त त्यांचे पॅन कार्ड, आधार कार्ड आणि सहा महिन्यांच्या बँक खात्याचा तपशील द्यावा लागेल. स्वत:चं घर घेण्याचं स्वप्न अनेकांचं असतं. पण त्याकरता करावा लागणारा खटाटोप मोठा असतो. महत्त्वाचं म्हणजे पैशांची उभारणी करणं आवश्यक असतं. अशावेळी कमी उत्पन्न किंवा कमी पगार असणाऱ्यांसाठी आयसीआयसीआय होम फायनान्सची ही ऑन-द-स्पॉट सरल होम लोन योजना महत्त्वाची ठरेल. हे वाचा-1 लाख रुपयांच्या Lucky Winnerचा मेसेज तुम्हालाही आलाय का? PNB ने जारी केला अलर्ट ICICI होम फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध कमानी यांनी याबाबत माहिती दिली केली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने, बिग फ्रीडम मंथ दरम्यान ऑन-द-स्पॉट होम लोनला मंजुरी देण्याच्या सुविधेमध्ये विविध प्रकारची गृहकर्ज देण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली आहे.  याविषयी तुम्ही अधिक माहिती आयसीआयसीआय बँकेच्या जवळच्या शाखेत जाऊन मिळवू शकता. कमानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकेच्या प्रत्येक शाखेमध्ये स्थानिक प्रतिनिधी असतील जे कमीत कमी दस्तावेजामध्ये सरल लोन उपलब्ध करून देतील. हे वाचा-उपलब्ध होणार रोजगाराच्या संधी! PM Modi यांचा विशेष प्लॅन, 100 लाख कोटींची योजना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सबसिडी देखील कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, गृह कर्जाच्या या योजनेमध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत (PMAY)2.67 लाख रुपयांपर्यंत सबसिडी देखील मिळवता येईल. कमी उत्पन्न गटासाठी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ही कर्जाशी संलग्न सबसिडी योजना आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Bank, Bank details, Home Loan, Icici bank

    पुढील बातम्या