Home /News /pune /

zika virus maharashtra : पुण्यात आढळलेल्या पहिल्या रुग्णाची माहिती आली समोर

zika virus maharashtra : पुण्यात आढळलेल्या पहिल्या रुग्णाची माहिती आली समोर

पुणे जिल्ह्यामधील पुरंदर (purandar) तालुक्यातील बेलसर (belasar) येथे झिका आजाराचा एक रुग्ण आढळून आला असून हा...

  मुंबई, 31 जुलै : कोरोनाची (corona) लाट ओसरत नाही तेच पुण्यात (pune) झिका व्हायरसचा पहिला रुग्ण आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. पुरंदर तालुक्यात एका 50 महिलेला झिका व्हायरसची (zika virus) लागण झाली आहे. मात्र, उपचाराअंती ही महिला बरी झाली आहे. अशी माहिती पुणे आरोग्य विभागाने दिली आहे. पुणे जिल्ह्यामधील पुरंदर (purandar) तालुक्यातील बेलसर (belasar) येथे झिका आजाराचा एक रुग्ण आढळून आला असून हा या आजाराचा महाराष्ट्रातील पहिला रुग्ण आहे. झिका आजाराची लागण झालेली महिला पूर्णपणे बरी झाली असून तिला तसंच कुटुंबीयांमध्येही कोणाला काही लक्षणे नाहीत, असे आरोग्य विभागामार्फत कळविण्यात आले आहे. वेळेपेक्षा अर्धा तास जास्त काम करावं लागलं तरी कंपनीला द्यावा लागणार ओव्हरटाइम बेलसर गावातील एका 50 वर्षाच्या महिलेस झिका व्हायरस आजाराची बाधा झाल्याचा निष्कर्ष 30 जुलै 2021 रोजी प्रयोगशाळेने दिला आहे. हा महाराष्ट्रामध्ये आढळलेला पहिला झिका रुग्ण आहे. सदर रुग्ण चिकनगुनिया बाधित देखील असल्याचे स्पष्ट झाल्याने हा मिश्र विषाणू संसर्ग असल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे. ३१ जुलै रोजी राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ.प्रदीप आवटे, सहाय्यक संचालक, हत्तीरोग डॉ. कमलापुरकर, राज्य कीटकशास्त्रज्ञ डॉ.महेंद्र जगताप या राज्यस्तरीय शीघ्र प्रतिसाद पथकाने बेलसर गावास भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. पथकाने सरपंच आणि  ग्रामपंचायत सदस्य, प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी,पुरंदर तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांची तातडीची बैठक घेऊन त्यांना या भागात झिका रुग्ण आढळल्याने करावयाच्या कार्यवाही बाबत सूचना दिल्या. काय आहे झिका आजार ? झिका विषाणू आजार हा एडिस इजिप्ती डासांमुळे होणारा सौम्य स्वरुपाचा आजार असून या आजारात ८० टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत. इतर रुग्णांमध्ये ताप, अंगदुखी, डोळे येणे, अंगावर पुरळ उठणे, सांधेदुखी अशी लक्षणे आढळतात.

  तुरुंगातील छप्पर आणि भिंत कोसळल्याचं धक्कादायक CCTV फुटेज; 21 कैदी गंभीर जखमी

  झिका आणि इतर कीटकजन्य आजारासाठी सर्वेक्षण सक्षम करत असतानाच कोरोना सर्वेक्षण आणि लसीकरण याकडे दुर्लक्ष होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याबाबत सर्व संबंधितांना आरोग्य विभागाने निर्देश दिले आहेत.
  Published by:sachin Salve
  First published:

  Tags: Pune

  पुढील बातम्या