Home /News /lifestyle /

नियत वेळेपेक्षा अर्धा तास अधिक काम करावं लागल्यासही कंपनीला द्यावा लागणार 'ओव्हरटाइम'

नियत वेळेपेक्षा अर्धा तास अधिक काम करावं लागल्यासही कंपनीला द्यावा लागणार 'ओव्हरटाइम'

कामकाजात कसे बदल होऊ शकतात, ते पाहू या...

    नवी दिल्ली, 31 जुलै: : आगामी काळात ऑफिसमध्ये कामकाजाच्या वेळेपेक्षा 30 मिनिटांहून अधिक वेळ काम करावं लागलं, तर तुम्हाला ओव्हरटाइमचे (Overtime) पैसे मिळू शकतात. वाचून आश्चर्य वाटलं असेल, पण हे खरं आहे. केंद्र सरकार एक ऑक्टोबरपासून लेबर कोडनुसार (Labour Code) म्हणजेच कामगार संहितेनुसार नियम (Rules) लागू करण्याच्या विचारात आहे. देशात हे नियम लागू झाले, तर ऑफिसमध्ये काम करण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल होऊ शकतो. हे नियम लागू झाल्यानंतर तुमच्या कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत (Working Time) वाढ होऊ शकते आणि ओव्हरटाइमचे नियमही बदलू शकतात. तुम्ही 30 मिनिटांपेक्षा अधिक वेळ काम केल्यास कंपनीला ओव्हरटाइमचे पैसे द्यावे लागतील. इतकेच नाही, तर लेबर कोडच्या नियमांनुसार कंपनीला कर्मचाऱ्यांकडून सलग 5 तासांहून अधिक काळ काम करून घेता येणार नाही. कर्मचाऱ्यांना काही वेळ ब्रेक (Break) द्यावाच लागेल. या सर्व गोष्टी पाहता कार्यालयीन कामकाजात कसे बदल होऊ शकतात, ते पाहू या... कामादरम्यान द्यावा लागेल ब्रेक लेबर कोड किंवा कामगार संहितेनुसार नियम लागू झाल्यानंतर कोणतीही कंपनी सलग 5 तासांहून अधिक काळ आपल्या कर्मचाऱ्यांकडून काम करून घेऊ शकणार नाही. कंपनीला कर्मचाऱ्यांना काही वेळेसाठी ब्रेक द्यावाच लागणार आहे. मसुद्यातील (Draft) नियमानुसार कोणत्याही कर्मचाऱ्याकडून 5 तासांपेक्षा अधिक काळ सातत्याने काम करून घेण्यास मनाई करण्यात आली आहे. यात कर्मचाऱ्यांना प्रत्येक 5 तासानंतर अर्धा तास विश्रांती घेण्यासाठी वेळ द्यावा, अशी सूचना करण्यात आली आहे. ओव्हरटाइमचे नियम बदलणार ओएचएस कोडच्या मसुद्यातील नियमांमध्ये, 15 ते 30 मिनिटांच्या दरम्यान केलेलं अतिरिक्त कामकाज 30 मिनिटं गृहीत धरून त्याचा समावेश ओव्हरटाइममध्ये करण्याची तरतूद करण्यात आली आहे. सध्याच्या नियमांनुसार, 30 मिनिटांपेक्षा कमी वेळ अतिरिक्त कामकाज केले तर तो ओव्हरटाइम म्हणून ग्राह्य धरला जात नाही. हे वाचा - कोरोनाकाळात घरबसल्या करा हे टॉप कोर्सेस आणि राहा अपडेट; मिळेल भरघोस पगार कामाचे तास वाढणार सध्या बहुतांश ऑफिसेसमध्ये 8 ते 9 तासांची शिफ्ट (Shift) आहे. मात्र नव्या लेबर कोडमध्ये कामाचे तास वाढवून ते 12 तास करण्याची तरतूद करण्यात आली आहे. नवे नियम लागू झाल्यानंतर तुम्हाला आठवड्यात 48 तास कामकाज करावे लागणार आहे. एखादी व्यक्ती दररोज 8 तास कामकाज करत असेल तर त्याला आठवड्यातील 6 दिवस काम करावं लागेल. एखादी व्यक्ती दररोज 9 तास कामकाज करत असेल तर त्यास आठवड्यातले 5 दिवस काम करावं लागेल; पण तुम्ही दररोज 12 तास कामकाज करत असाल तर तुम्हाला आठवड्यातले 3 दिवस सुट्टी (Holiday) मिळू शकणार आहे. याचाच अर्थ तुम्ही आठवड्यातले 4 दिवस म्हणजेच सोमवार ते गुरुवार दररोज 12 तास काम केलं, तर तुम्हाला शुक्रवार, शनिवार आणि रविवार अशी 3 दिवस सुट्टी मिळेल. परंतु, कामगार संघटना 12 तास काम करण्यास विरोध करीत आहेत. पीएफ वाढणार, पगार घटणार नव्या मसुद्यातील नियमांनुसार, मूळ पगार (Basic Salary) हा एकूण पगाराच्या (Total Salary) 50 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक असावा. यामुळे बहुतांश कर्मचाऱ्यांच्या पगार रचनेत बदल होणार आहे. मूळ पगारात वाढ झाल्याने पीएफ (PF) आणि ग्रॅच्युइटीसाठी कपात होणारी रक्कमदेखील वाढणार असून, यात जमा होणारा पैसा हा मूळ पगाराच्या प्रमाणात असेल. नवे नियम लागू होणार 1 ऑक्टोबरपासून सरकार नव्या लेबर कोडचे नियम 1 एप्रिल 2021 पासून लागू करणार होते. परंतु, राज्यांकडून तयारी न झाल्याने आणि एचआर पॉलिसी (HR Policy) बदलण्यासाठी अधिक वेळ द्यावा लागत असल्याने हे नियम एप्रिलपासून लागू होऊ शकले नाहीत. कामगार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सरकारला 1 जुलैपासून लेबर कोडचे नियम अधिसूचित करायचे होते, परंतु, राज्यांनी या नियमांच्या अंमलबजावणीसाठी अधिक वेळ मागितल्याने ते 1 ऑक्टोबरपर्यंत लांबणीवर टाकण्यात आले. आता कामगार मंत्रालय (Labour Ministry) आणि मोदी सरकारला (Modi Government) एक ऑक्टोबरपर्यंत लेबर कोडचे नियम अधिसूचित करायचे आहेत. ऑगस्ट 2019मध्ये संसदेनं तीन श्रम संहिता, औद्योगिक संबंध, कामाची सुरक्षा, आरोग्य आणि कामकाजाची परिस्थिती तसेच सामाजिक सुरक्षेसंबधीच्या नियमांमध्ये बदल केले. या नियमांना सप्टेंबर 2020 मध्ये मान्यता मिळाली होती.
    First published:

    Tags: Career, Jobs

    पुढील बातम्या