भोपाळ, 31 जुलै : मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) भिंडमधील तुरुंगातील छप्पर आणि भिंत कोसळल्याचा धक्कादायक CCTV फुटेज समोर आलं आहे. शनिवार सकाळी सर्व कैदी जेव्हा आपआपल्या कामात व्यस्त होते, तेव्हा अचानक छप्पर आणि भिंत कोसळली. यादरम्यान ढिगाऱ्याखालून 21 कैदी अडकले. या दुर्घटनेनंतर तुरुंगात खळबळ उडाली. यानंतर तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आलं. आणि जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आलं. (Shocking CCTV footage of the prison roof and wall collapsing 21 prisoners seriously injured)
याबद्दल माहिती मिळाल्यानंतर सकाळी 5 वाजता कलेक्टर, एसपी, पोलीस जवान घटनास्थळी पोहोचले. दुपारी 12 वाजेपर्यंत तुरुंग पूर्णपणे रिकामी करण्यात आलं होतं. तब्बल 234 कैद्यांना ग्वाल्हेर स्थित सेंट्रल जेलमध्ये शिफ्ट करण्यात आलं. भिंत आणि छप्पर कोसळल्या प्रकरणात तुरुंगातील अधिकाऱ्यांपासून पीडब्ल्यूडीचे अधिकारीही अडकण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा तुरुंगातील परिस्थितीबाबत 2008 पासून पत्र लिहिण्यात आलं होतं. मात्र यावर काहीही उत्तर मिळालं नाही. भिंत कोसळल्यापूर्वी तुरुंगात प्लास्टर करण्याची सूचना देण्यात आली होती. कैद्यांनी सांगितलं की, सतत सुरू असलेल्या पावसामुळे जुनी भिंत कोसळण्याची शक्यता होती.
हे ही वाचा-VIDEO उधाणलेल्या पाण्यातून तरुणाला स्ट्रेचरवरुन नेताना एकाचा पाय घसरला आणि...
मध्य प्रदेशातील भिंड येथील तुरुंगातील छप्पर आणि भिंत कोसळल्याचं धक्कादायक CCTV फुटेज आलं समोर. pic.twitter.com/NukTUCYEOh
— News18Lokmat (@News18lokmat) July 31, 2021
एक कैदी गंभीर
या अपघातात जखमी 21 कैद्यांची परिस्थिती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. उदय सिंह भदौरिया येथे राहणारा निवासी जखमी झाले आहेत. या कैद्यावर प्रेयसीने बलात्काराचा आरोप लावला होता. त्याचं 21 मे रोजी लग्न झालं होतं. यानंतर प्रेयसीने त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. तेव्हापासून तरुण तुरुंगात आहे. जिल्हा रुग्णालयात कैद्यांचा वॉर्डमध्ये जागा कमी असल्यामुळे जखमी कैद्यांना ट्रॉमा सेंटरमध्ये भरती करण्यात आलं आहे. ट्रॉमा सेंटरचे कैदींना सर्जिकल वॉर्डमध्ये भरती केलं होतं. येथे पोलिसांची चौकशी वाढविण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Madhya pradesh, Prison department