मराठी बातम्या /बातम्या /पुणे /'चांगला पगार असून आनंद मिळत नाही' म्हणून इंजिनिअर तरुणाने 11 व्या मजल्यावरून मारली उडी

'चांगला पगार असून आनंद मिळत नाही' म्हणून इंजिनिअर तरुणाने 11 व्या मजल्यावरून मारली उडी

राहत्या घराच्या इमारतीच्या 11 व्या मजल्यावरून उडी मारून आपलं जीवन संपवलं.

राहत्या घराच्या इमारतीच्या 11 व्या मजल्यावरून उडी मारून आपलं जीवन संपवलं.

विरेन जाधव हा टाटा मोटर्समध्ये इंजिनिअर या पदावर कार्यरत होता. सध्या तो चिखली परिसरातील रिव्हर रेसिडेन्सी या सोसायटीमध्ये आपल्या आईसोबत राहत होता.

  • Local18
  • Last Updated :
  • Pune, India

गोविंद वाकडे, प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड, 18 मार्च : 'चांगल्या कंपनीत, चांगल्या पगाराची नोकरी असूनही मला आनंद मिळत नाही' असं म्हणून पिंपरी चिंचवड शहरातील एका तरुणाने इमारतीच्या 11 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली परिसरातील रिव्हर रेसिडेन्सी या सोसायटीमध्ये ही घटना आज सकाळी आठ वाजेच्या दरम्यान घडली आहे. विरेन जाधव असं आत्महत्या केलेल्या 27 वर्षाच्या अभियंता तरुणाचे नाव आहे. विरेन जाधव हा टाटा मोटर्समध्ये इंजिनिअर या पदावर कार्यरत होता. मूळचा नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असलेला विरेन जाधव हा चिखली परिसरातील रिव्हर रेसिडेन्सी या सोसायटीमध्ये आपल्या आईसोबत सध्या राहत होता.

(Video : गाडीचा धक्का लागला अन् कारचालकाची भररस्त्यात महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण)

विरेन जाधव याने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या नोटबुकमध्ये आपण आत्महत्या का करत आहे, याबद्दल लिहून ठेवलं आहे. 'मला चांगल्या कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी आहे, तरी मला आनंद मिळत नाही' असं लिहून वीरेन जाधव याने आपण आत्महत्या करत असल्याचे सांगितलं आहे. त्याने राहत्या घराच्या इमारतीच्या 11 व्या मजल्यावरून उडी मारून आपलं जीवन संपवलं.

(ब्लेडने आठवीतील विद्यार्थीनीच्या छातीवर लिहिलं आपलं नाव; मग धमकी देत 10 लाख चोरी करायले लावले अन्,..)

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. विरेनचा मृत्यदेह ताब्यात घेतला. विरेनच्या मृत्यू संदर्भात सध्या चिखली पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरेन जाधव हा मानसिक दृष्ट्या थोडा अस्वस्थ असावा, त्यामुळे त्यांनी आत्महत्या करण्यासारखं टोकाचं पाऊल उचललं असावं, अशी प्राथमिक माहिती चिखली पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

First published:

Tags: Pune, पिंपरी-चिंचवड