जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / ब्लेडने आठवीतील विद्यार्थीनीच्या छातीवर लिहिलं आपलं नाव; मग धमकी देत 10 लाख चोरी करायले लावले अन्,..

ब्लेडने आठवीतील विद्यार्थीनीच्या छातीवर लिहिलं आपलं नाव; मग धमकी देत 10 लाख चोरी करायले लावले अन्,..

ब्लेडने आठवीतील विद्यार्थीनीच्या छातीवर लिहिलं आपलं नाव; मग धमकी देत 10 लाख चोरी करायले लावले अन्,..

विद्यार्थिनीच्या छातीवर ब्लेडने आपलं नाव लिहून तिला धमकावलं. आरोपीने विद्यार्थिनीला घरून पैसे आणण्यास सांगितलं, नाहीतर ब्लेडने तुझा गळा चिरून टाकेल, अशी धमकी त्याने दिली.

  • -MIN READ Uttar Pradesh
  • Last Updated :

लखनऊ 18 मार्च : गुन्हेगारीच्या अनेक हादरवणाऱ्या घटना दररोज समोर येत असतात. अशीच आणखी एक घटना आता समोर आली आहे. यात उत्तर प्रदेशातील कानपूरमधील बर्रा येथे एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करून तिच्या छातीवर ब्लेडने नाव गोंदवल्याच्या घटनेतील सर्व आरोपी अद्याप पकडले गेलेले नाहीत. अशातच आता ग्वालटोली परिसरातूनही असाच प्रकार समोर आला आहे. यात आठवी इयत्तेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला वस्तीत राहणाऱ्या तरुणाने आधी प्रेमाच्या जाळ्यात अडकवल, त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. एवढंच नाही तर त्याने विद्यार्थिनीच्या छातीवर ब्लेडने आपलं नाव लिहून तिला धमकावलं. आरोपीने विद्यार्थिनीला घरून पैसे आणण्यास सांगितलं, नाहीतर ब्लेडने तुझा गळा चिरून टाकेल. तसंच बलात्काराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करेल, अशी धमकी त्याने दिली. बायको अमेरिकेत अन् मुंबईत कांड, 76 वर्षांचा वृद्ध अडकला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात आरोपीच्या धमकीने विद्यार्थिनी इतकी घाबरली की तिने ब्रीफकेसमधून घरात ठेवलेले 10.5 लाख रुपये काढून हळूहळू महिन्याभरात आरोपीला दिले. हे पैसे पीडितेच्या वडिलांनी मोठ्या मुलीच्या लग्नासाठी ठेवले होते. ब्रीफकेस रिकामी पाहून त्यांना धक्काच बसला. याबाबत वडिलांनी घरातील सर्वांना विचारले असता पीडितेनं सर्व प्रकार सांगितला. यानंतर तिच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अमन नावाच्या मुलाने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यावर अत्याचार केल्याचं विद्यार्थिनीने सांगितलं. त्यानंतर ब्लॅकमेलिंग करून आधी आईचं मंगळसूत्र मागवलं. तिने आईचं मंगळसूत्र चोरून अमनला दिल्याचं पीडितेनं सांगितलं. मात्र तो पुन्हा तिच्याकडे पैशांची मागणी करू लागला. मागणी पूर्ण न केल्यास धमक्याही देण्यास सुरुवात केली. भीतीपोटी विद्यार्थिनीने घरात ठेवलेले 10.5 लाख रुपये हळूच आरोपीच्या ताब्यात दिले. या संपूर्ण प्रकरणात अमनचे मित्रही सहभागी असल्याचं पीडितेनं सांगितलं. भावाच्या मेव्हुणीसोबत करायचं होतं लग्न, घरच्यांनी नाही सांगितलं, घडलं भयंकर पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अमन आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या अमन फरार आहे. त्याला आणि त्याच्या साथीदारांना पकडण्यासाठी पोलिसांची अनेक पथके तयार करण्यात आली आहेत. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त बी.पी.जोगदंड यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात