मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Video : गाडीचा धक्का लागला अन् कारचालकाची भररस्त्यात महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण

Video : गाडीचा धक्का लागला अन् कारचालकाची भररस्त्यात महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण

भररस्त्यात महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण

भररस्त्यात महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण

नागपुरात ओव्हरटेक करताना गाडीचा धक्का लागल्याने एका कारचालकाने महिलेला मारहाण केली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagpur, India

नागपूर, 18 मार्च : नुकतेच पुण्यात बसचा कारला धक्का लागल्याच्या किरकोळ कारणातून कार चालक महिलेने बस चालकाला जबर मारहाण केली होती. यात चालकाला डोके फुटेपर्यंत मारहाण करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच नागपूरमध्येही अशाच प्रकारची घटना समोर आली आहे. नागपूरच्या जरीपटका पोलीस स्टेशन हद्दीत गाडी ओव्हर टेक करताना धक्का लागल्याने महिलेला अश्लील शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची दखल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील घेतली आहे.

काय आहे प्रकरण?

नागपूरच्या जरीपटका पोलीस स्टेशन हद्दीत महिला आपल्या लहान मुलासह मोपेडणे जात असताना मागून येणाऱ्या कार चालकाने ओव्हर टेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी गाडीचा धक्का लागला. संतापलेल्या कार चालकाने गाडी थांबवली आणि महिलेला मारहाण करायला सुरुवात केली. नागरिकांच्या मध्यस्थीने आरोपी कार चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. मारहाण करत असल्याचा व्हिडिओ  सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जरीपटका पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कायदा सुव्यवस्थेचा धाक या राज्यात आहे की नाही? : सुप्रिया सुळे

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावरुन सरकारला लक्ष्य केलं आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांच्या शहरात महिलेला भरचौकात मारहाण करण्यापर्यंत मजल जाते. कायदा सुव्यवस्थेचा धाक या राज्यात आहे की नाही? या राज्यात महिला सुरक्षित आहे का? या प्रकरणाचा कसून तपास होऊन या व्यक्तीला कठोर शासन झालेच पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे.

पुण्यात असेच प्रकरण

मिळालेल्या माहितीनुसार, 15 मार्चला दुपारी स्वारगेट डेपोतील पीएमपीएल बसचे चालक शशांक देशमाने यांचा मार्ग क्र 2 वरती सकाळ कर्तव्यावर असताना अभिनव कॉलेज चौकात बस व कारचा किरकोळ अपघात झाला. यावरुन कारचालक महिला आणि चालक यांच्यामध्ये वाद झाला. त्या वादातून महिलेने इतर 3 साथीदारांसह चालक देशमाने यांना जबर मारहाण केली. यात चालकाचं डोकं फुटून रक्त वाहू लागलं.

First published:

Tags: Crime, Nagpur