Home /News /maharashtra /

जावयाच्या पार्श्वभागात मिरची पावडर व कारले खोचून मारहाण, सासरच्या मंडळीचे अमानुष कृत्य

जावयाच्या पार्श्वभागात मिरची पावडर व कारले खोचून मारहाण, सासरच्या मंडळीचे अमानुष कृत्य

शिवाय शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी, केबलच्या वायरने पाठीवर व कंबरेवर अमानुषपणे मारहाण केली.

    राहुल खंदारे, प्रतिनिधी बुलडाणा, 11 जुलै : पुण्याहून (pune) पत्नीला नेण्यासाठी आलेल्या 22 वर्षीय पतीला सासरकडील मंडळीने अमानुष मारहाण केल्याचा घृणास्पद घटना बुलडाणा (buldhana) जिल्ह्यातील मोताळा येथून समोर आली आहे. जावयाच्या (son-in-law) पार्श्वभागात मिरची पावडर व कारले खोचून मारहाण करण्यात आल्याची तक्रार जावयाने बोरखेडी पोलिसात केली असून सासरकडील 11 जणांवर गुरुवारी रात्री गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यापैकी 4 जणांना अटक देखील पोलिसांनी केले आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर कबाडवाडी येथील 22 वर्षीय पीडित विवाहित युवक हा त्याच्या पत्नीला घेऊन जाण्यासाठी  बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा येथील कॉटन मार्केटनजीकच्या परिसरात आला होता. यावेळी मोताळा येथील रहिवासी आरोपी रामराव भाऊराव पवार, विजय रामराव पवार, रवी रामराव पवार, राजू रामराव पवार, विकास सर्जेराव पवार, देवकाबाई, छायाबाई, नंदाबाई, रेवाबाई, कलुबाई व देवानंद रामभाऊ मोहिते या 11 जणांनी पीडित युवकाचे हातपाय दोरीने बांधून अंगणात बांधून ठेवले. व पीडित युवकाच्या अंगातील फुलपॅन्ट व अंडरवेअर काढून त्याच्या पार्श्वभागात मिरची पावडर व कारले खोचले. ‘मी अभिनेता आहे पॉर्नस्टार नाही’; किसिंग सीनमुळे पारसचा वेब सीरिजला नकार शिवाय शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी, केबलच्या वायरने पाठीवर व कंबरेवर अमानुषपणे मारहाण केली. त्यामुळे लज्जा वाटून खूप वेदना झाल्या, अशी तक्रार पीडित युवकाने तक्रारी बोरखेडी पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी पीडित युवकाच्या तक्रारीवरून उपरोक्त 11 आरोपींविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला असून 4 जणांना अटक करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक माधवराव गरुड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अशोक रोकडे करीत आहेत. पीडित युवक व सासरकडील मंडळीत होते वाद मोताळा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ राहत असलेल्या रामभाऊ भाऊराव पवार यांच्या मुलीशी मे 2020 मध्ये लग्न झाले आहे. दरम्यान, मागील दोन ते तीन महिन्याआधीपासून पीडित युवक आणि त्याच्या पत्नीच्या वाद सुरू होते. 'हिंदू मुलानं हिंदू मुलीसोबत खोटं बोलणंही जिहादच; लवकरच आणणार कायदा' म्हणून ती तेव्हापासून मोताळा येथे माहेरी राहत होती आहे. दरम्यान काही दिवसा अगोदर पीडित युवक काही लोक सोबत घेऊन सासरीकडील मंडळीसोबत वाद केले होते. त्यानंतर पीडित पती पत्नीला घेण्यास आल्यानंतर त्याच्यात आणि सासरकडील लोकांमध्ये वाद झाले.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या