Home /News /pune /

पंढरीची ओढ! सरकार सांगेल ते नियम पाळू, पण पायी वारीची परवानगी द्या, वारकऱ्यांची सरकारला विनंती

पंढरीची ओढ! सरकार सांगेल ते नियम पाळू, पण पायी वारीची परवानगी द्या, वारकऱ्यांची सरकारला विनंती

Ashadhi Wari : विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमून ती समिती सर्वांशी चर्चा करून अहवाल देणार आहे. त्यानंतर याबाबत निर्णयाची शक्यता आहे. पण 14 जूनला मुक्ताईंच्या पालखीचं प्रस्थान असतं, त्यामुळं 10 जूनपर्यंत याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी वारकऱ्यांनी केली आहे.

पुढे वाचा ...
    पुणे, 04 जून : कोरोनाची राज्यातली (coronavirus) संख्या घटत असल्यानं हळू हळू निर्बंध शिथिल होत आहेत. मात्र तरीही अद्याप यंदाच्या आषाढी वारीबद्दलची (Ashadhi Wari) अनिश्चितता कमी झालेली नाही. वारकऱ्यांनी सरकारकडं यंदा पायी वारीची परवानगी देण्याची मागणी केली आहे. सरकार म्हणेल ते नियम आम्ही पाळू, असं म्हणत वारकरी संप्रदायाच्या वतीनं सरकारला तीन वेगवेगळे पर्याय देण्यात आले आहेत. (वाचा-...तेव्हापासून झोपेतून जागा होतो आणि पाहतो सरकार पडलं आहे का: अजित पवार) कोरोनाच्या वाढलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी आषाढी वारीचा पायी सोहळा रद्द करण्यात आला होता. पण यंदा मात्र पायी वारीची परवानगी देण्याची मागणी वारकरी संप्रदायाच्या वतीनं करण्यात आली आहे. राज्य सरकार सांगेल त्या सर्व नियमांचं पालन करण्याची तयारी वारकरी संप्रदायानं दाखवली आहे. एवढंच नाही तर सरकार सांगेल तेवढीच वारकऱ्यांची संख्या पायी दिंडी सोहळ्यात असेल, मात्र सरकारनं पायी दिंडी सोहळ्याला परवानगी द्यावी अशी मागणी वारकऱ्यांच्या वतीनं अभय टिळक यांनी केली आहे. (वाचा-सावधान! पुण्यात सोशल मीडियातून हनीट्रॅपमध्ये अडकवल्याच्या 150 तक्रारी दाखल) वारकऱ्यांनी दिले तीन पर्याय वारकऱ्यांना पायी दिंडी सोहळ्याची परवानगी मागताना तीन वेगवेगळे पर्याय दिले आहेत. राज्यात कोरोनाची संख्या कमी होत आहे. ही संख्या अपेक्षेप्रमाणे कमी होत गेली आणि परिस्थिती नियंत्रणात आली तर वारी सोहळ्यासाठी सरकारनं 500 वारकऱ्यांसह सोहळ्याला परवानगी द्यावी. कोरोनाचं प्रमाण कमी झालेलं पाहायला मिळालं नाही तर, 200 वारकऱ्यांना परवानगी द्यावी. एवढंच नाही तर अगदीच स्थिती बिघडली तर 100 जणांना तरी पायी दिंडी सोहळ्याची परवानगी देण्याची मागणी सरकारकडं केली आहे. वारकऱ्यांनी असे 3 पर्याय सरकारसमोर ठेवले आहेत. विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमून ती समिती सर्वांशी चर्चा करून अहवाल देणार आहे. त्यानंतर याबाबत निर्णयाची शक्यता आहे. पण 14 जूनला मुक्ताईंच्या पालखीचं प्रस्थान असतं, त्यामुळं 10 जूनपर्यंत याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी वारकऱ्यांनी केली आहे. अजित पवारांनी दिलं कुंभमेळ्याचं उदाहरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र आणखी एक बैठक झाल्यानंतरच याबाब काही ठोस सांगता येईल असं म्हटलं आहे. आषाढी वारीबाबत वारकरी प्रतिनिधींसोबत चर्चा केली. यावेळी कुंभमेळ्याचं उदाहरणही दिलं. मात्र वारकरी प्रतिनिधींनी आणखी एक संधी द्या असं म्हटलं आहे. अगदी 50 लोक पायी वारी करतील अशी मागणीही आली आहे. पण हळू हळू संख्या वाढत जाईल अशी भीती आहे. वारकरी जसं सांगतील तसं वागतीलही. मात्र इतर भक्तांचं सांगता येणार नाही. त्यामुळं बैठकीनंतर याबाबत निर्णय घेणार असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Ajit pawar, Pandharpur, Pune, Vitthal mandir pandharpur, Wari, Warkari

    पुढील बातम्या