मराठी बातम्या /बातम्या /पुणे /पुण्यात सेक्सटॉर्शनच्या प्रकरणात वाढ; सोशल मीडियातून हनीट्रॅपमध्ये अडकवल्याच्या 150हून अधिक तक्रारी

पुण्यात सेक्सटॉर्शनच्या प्रकरणात वाढ; सोशल मीडियातून हनीट्रॅपमध्ये अडकवल्याच्या 150हून अधिक तक्रारी

नववी पास तरुणी निघाली सेक्सटॉर्शनची मास्टरमाइंड...

नववी पास तरुणी निघाली सेक्सटॉर्शनची मास्टरमाइंड...

Crime in Pune: सोशल मीडियाद्वारे (Social media) मैत्री करून हनीट्रॅपमध्ये (Honeytrap) गुंतवायचं आणि ब्लॅकमेल (Blackmail) करत पैसे उकळायचे, अशा पद्धतीने लोकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक (Fraud) केली जात आहे. त्यामुळे सायबर पोलिसांकडून इशारा देण्यात आला आहे.

पुढे वाचा ...

पुणे, 04 जून: अलीकडेच सोशल मीडियाचा (Social media) वापर करून हनीट्रॅपमध्ये (Honeytrap) गुंतवल्याबाबतचे दोन गुन्हे पुणे सायबर पोलिसांत (Pune Cyber Police) दाखल करण्यात आले आहेत. यानंतर आता आणखी 150 तक्रारी (150 complaints) सायबर पोलिसांत दाखल झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. सोशल मीडियाद्वारे मैत्री करून हनीट्रॅपमध्ये गुंतवायचं आणि ब्लॅकमेल (Blackmail) करत पैसे उकळायचे, अशा पद्धतीने लोकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक (Fraud) केली जात आहे. त्यामुळे तुम्हीही सोशल मीडिया वापरत असाल तर वेळीच सावधा व्हा, असा इशारा सायबर पोलिसांकडून देण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी पुण्यातील शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात एक तरुण तक्रार देण्यासाठी आला होता. त्याने तक्रारीत म्हटल्याप्रमाणे, लॉकडाऊन काळात घरात बसून असल्याने फेसबुकचा वापर वाढला होता. दरम्यान त्याला एका मुलीची फ्रेन्ड रिक्वेस्ट आली होती. फेसबुकवरून बोलणं झाल्यानंतर मुलीने स्वतःचा Whatsapp नंबरही दिला. कालांतराने हळूहळू व्हिडीओ कॉलवर बोलणं होऊ लागलं. आरोपी मुलीने पीडित मुलाचा विश्वास संपादन केला.

त्यानंतर फेसबुकवरील मैत्रिणीने याला नग्न होण्यास सांगितलं. फिर्यादीनेही याला प्रतिसाद दिला. यानंतर हाच व्हिडीओ वॉट्सअॅपवर येऊन धडकला आणि पैशाची मागणी होऊ लागली. पैसे देण्यास नकार दिल्यास तुझ्या फ्रेंड लिस्टमध्ये असणाऱ्या प्रत्येकाला हा व्हिडीओ शेअर केला जाईल, अशी धमकीही दिली. असाच प्रकार पुण्यातील इतर 150 हून अधिक जाणांच्यासोबतही  घडला आहे. यामध्ये प्रामुख्याने श्रीमंत कुटुंबातील मुलं, नोकरदार, व्यावसायिक, उद्योजक अशा व्यक्तींना टार्गेट केलं जात आहे.

हे ही वाचा-हनीट्रॅप गँगचा पर्दाफाश! अश्लिल व्हिडिओ शूट करून खंडणीसाठी व्यापारीला ठेवलं होतं डांबून

भीती आणि बदनामीमुळे पीडित तरुण आरोपींना पैसे देऊन मोकळे होतं आहेत. पुणे सायबर पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेतली आहे. दोन संशयित आरोपींच्या मागावर पोलीस असून लॉकडाऊन संपताच दिल्ली, मध्यप्रदेश, राजस्थान याठिकाणी कारवाईसाठी जाणार आहे, अशी माहिती सायबर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मच्छिन्द्र पंडित यांनी दिली आहे. यासोबतच सोशल मीडिया वापरत असताना नेमकी काय काळजी घ्यायची? याबद्दलही त्यांनी सांगितलं आहे.

हे ही वाचा-महिलेने 16 वर्षांच्या मुलाचे केले लैंगिक शोषण;खुलाशानंतर पतीकडून 1 लाखांची मागणी

काय काळजी घ्याल?

अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारू नका.

परिचित नसल्यास Whatsapp कॉल वर संवाद साधू नका.

व्हिडीओ, छायाचित्र पाठवताना किमान दोनवेळा विचार करा.

चुकीचं काही घडत असल्यास कुटुंबातील व्यक्तीला, मित्र-मैत्रिणीला किंवा पोलिसांशी संपर्क साधा.

सोशल माध्यमांतून सायबर गुन्हेगार सुरुवातीला तुमच्यावर पाळत ठेवतात. तुमच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतात आणि नंतर तुम्ही त्यांच्या जाळ्यात अडकतात आणि सेक्सटॉर्शनचे शिकार बनवतात. त्यामुळे सोशल मीडिया वापरताना योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला सायबर पोलिसांकडून देण्यात आला आहे.

First published:
top videos

    Tags: Crime news, Cyber crime, Pune